AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanchita Ugale : एक्स बॉयफ्रेंडमुळे तणावात?,संचिता उगले त्यातून बाहेर आलीच नाही..सहकलाकाराचा दावा

Ujjawal Sharma On Sanchita Ugale: टीव्ही मालिकेतील अभिनेत्री संचिता उगले हीच्या मृत्यूनंतर तिने असे टोकाचे पाऊल उचलल्याने अनेक प्रश्न केले जात आहेत. एका व्यक्तीशी तिचे नाव जोडले जात होते. मात्र,त्याने आता समोर येत वेगळीच माहिती दिली आहे.

Sanchita Ugale :  एक्स बॉयफ्रेंडमुळे तणावात?,संचिता उगले त्यातून बाहेर आलीच नाही..सहकलाकाराचा दावा
Ujjawal Sharma On Sanchita Ugale
| Updated on: Jun 15, 2026 | 10:13 PM
Share

Ujjawal Sharma On Sanchita Ugale: टीव्ही मालिकेतील उदयोन्मुख अभिनेत्री संचिता उगले हीच्या मृत्यूने तिच्या चाहत्यांना प्रचंड धक्का बसला आहे. केवळ २२ वर्षाच्या वयात तिने जगाचा निरोप घेतल्याने चाहते आणि जवळच्या व्यक्तींना हा धक्का सहन होण्या पलिकडचा आहे. एकीकडे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असताना आता दुसरीकडे तिच्या खाजगी जीवनाविषयी देखील निरनिराळ्या चर्चा सुरु आहेत. या दरम्यान संचिता हीच्या सोबत ‘साजन घर’ मालिकेत सह कलाकार म्हणून काम करणाऱ्या एका अभिनेत्याने एक मोठा खुलासा केला आहे.

संचिता आणि मी…काय म्हणाला उज्वल शर्मा?

संचित उगले ही टीव्ही मालिकेतील प्रसिद्धीच्या शिखरावरील अभिनेत्री होती. तिने ‘कुमकुम भाग्य’, ‘दिलवाली दुल्हा ले जाएगी’ आणि अनेक मालिकेत आपली छाप पाडून प्रेक्षकांची मने जिंकली होती.तिच्या मृत्यूने अनेकजण आता सोशल मीडियावर विविध चर्चा करत आहेत. यात सर्वाधिक चर्चा तिच्या कथित अफेअरची होत आहे. तिचे नाव आता तिचा को-स्टार उज्वल शर्मा याच्या सोबत जोडले जात आहे, मात्र उज्वल शर्मा याने त्यास नकार दिला आहे.

लिव-इन मध्ये रहात असल्याचा दावा

टेली चक्करशी बोलताना शर्मा याने स्पष्ट केले की माझ्यात आणि संचिता असे कोणतेही नाते नव्हते. उज्वल शर्मा पुढे म्हणाले की नात्याची अफवा आहे. यात काही सत्य नाही. आमचे कोणतेही नाते नव्हते. वास्तविक ती कोणा अन्य व्यक्तीला डेट करत होती आणि उघडपणे त्याच्या सोबत रहात होती. मी तिच्याशी खूप काळ झाला बोललेलो नाही. जवळपास दोन ते अडीच महिन्यांपासून संपर्कात नाही. ती तिच्या एक्स बॉयफ्रेंडमुळे चिंतेत होती आणि या प्रकरणात मदत देखील घेत होती. प्रोडक्शन हाऊसने देखील तिला उपचारासाठी मदत केल्याचे त्याने म्हटले आहे.

डिप्रेशनशचा सामना

संचिता उगले हिच्या खाजगी जीवनासंदर्भात कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तिची मैत्रिण आणि सहकारी अभिनेत्री मेघा शर्मा हीने देखील दावा केला की संचिता गेल्याकाही दिवसांपासून डिप्रेशनचा सामना करत होती आणि ती मानसोपचार घेत होती. मेघा हीने सांगितले की ती अनेकदा मानसिक तणावाने जीव देण्याच्या गोष्टी करायची. मात्र, तिच्या जवळच्या व्यक्तींना वाटायचे की ती यातून बाहेर पडेल. पोलिसांना प्राथमिक तपासात कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. कुटुंबाने कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा