AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोविंदाचं चालू होतं अफेअर, म्हणूनच गुडघ्याला लागली गोळी? पत्नी सुनीता आहुजाच्या विधानामुळे खळबळ!

सुनीता आहुजा यांंनी लाफ्टर शेफ्स-3 मध्ये सहभाग नोंदवला. यावेळी त्या हसत हसत बोलताना दिसत आहेत. याच कार्यक्रमात कृष्णा अभिषेक आणि त्याची पत्नी कश्मिरा हे दोघेही दिसत आहेत. प्रसिद्ध कन्टेंट क्रिएटर एल्विश यादवही दिसतोय.

गोविंदाचं चालू होतं अफेअर, म्हणूनच गुडघ्याला लागली गोळी? पत्नी सुनीता आहुजाच्या विधानामुळे खळबळ!
govinda and sunita ahujaImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 03, 2026 | 10:03 PM
Share

Govinda And Sunita Ahuja : अभिनेता गोविंदा यांची पत्नी सुनीता आहुजा या नेहमीच आपल्या बिनधास्त स्वभावामुळे नेहमी ओळखल्या जातात. त्यांनी अनेकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यावर तसेच बॉलिवुडमधील चुकीच्या गोष्टींवर दिलखुलासपणे मत व्यक्त केलं आहे. सुनीता आहुजा या सोशल मीडियावरही चांगल्याच सक्रीय असतात. त्या अनेकदा सोशल मीडियावर आपल्या वैयक्तिक आयुष्यात काय चाललं आहे, हे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत असतात. दरम्यान, आता त्यांनी ‘लाफ्टर शेफ्स-3’ या कार्यक्रमात केलेल्या एका विधानाची खूपच चर्चा होत आहे. आहुजा यांचे हे विधान अभिनेता गोविंदा याच्या गुडघ्याला लागलेल्या गोळीशी जोडले जात आहे. गोविदांचे चाहते आता वेगवेगळे तर्क काढत आहेत.

लाफ्टर शेफ्स-3 मध्ये झाल्या सहभागी

सुनीता आहुजा यांंनी लाफ्टर शेफ्स-3 मध्ये सहभाग नोंदवला. यावेळी त्या हसत हसत बोलताना दिसत आहेत. याच कार्यक्रमात कृष्णा अभिषेक आणि त्याची पत्नी कश्मिरा हे दोघेही दिसत आहेत. प्रसिद्ध कन्टेंट क्रिएटर एल्विश यादवही दिसतोय. याच वेळी सुनीता आहुजा यांनी विवाहबाह्य संबंधावर भाष्य केले आहे. त्यांनी एका प्रकारे गोविंदा यांच्यावरच टिप्पणी केल्याचे बोलले जात आहे. सुनीता यांच्या या विधानामुळे गोविंदाला 2024 साली लागलेल्या बंदुकीच्या गोळीच्या घटनेची आठवण काढली जात आहे.

सुनीता आहुजा नेमकं काय म्हणाल्या?

या कार्यक्रमात सुनीता आहुजा या कश्मिराला उद्देशून बोलत आहेत. “कश्मिरा मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. जो पुरुष आपल्या पत्नीचा सन्मान करते, तोच व्यक्ती खरा हिरो असतो. जो पुरुष ‘अखियों से गोली मारे’ असं करतो आणि ही बाब तिसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचते तेव्हा मात्र पुरुषावर गुडघ्यावर गोळी मारण्याची वेळ येते,” असं सुनीता आहुजा म्हणाल्या आहेत.

दरम्यान, 2024 साली गोंविदा यांना त्यांच्या मुंबईच्या राहत्या घरी गुडघ्यात बंदुकीची गोळी लागली होती. कोलकात्याला निघण्यापूर्वी गोविंदा बंदुक कपाटात ठेवत होते. तेव्हाच गोविंदा यांना गोळी लागली होती. दुर्घटनेनंतर गोविंदा यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी