‘गोविंदा माझ्यापेक्षा अभिनेत्रींसोबत जास्त वेळ घालवायचा’; सुनीताने स्पष्टच सांगत व्यक्त केली खंत
गोविंदा आणि पत्नी सुनिता नेहमी त्यांच्या कौटुंबिक कारणाने चर्चेत असतात. सुनिताचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात तिने हिरोची पत्नी असण्याची खंत काय असते ती व्यक्त केली आहे.

अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. कधी त्यांच्यातील वाद, तर कधी त्यांचा घटस्फोट यावरून नेहमीच काहीना काही चर्चा सुरुच असते. सुनिताने अनेकदा त्यांच्या नात्याची बरीच गुपिते अगदी मोकळेपणाने सांगितली आहेत.आताही तिच्या मुलाखतीतील एक व्हिडीओ व्हायरल होतं आहे ज्यात तिने एक खंत व्यक्त केली आहे.
तिच्या आणि गोविंदाच्या नात्याबद्दल महत्त्वाच्या गोष्टी
90 च्या दशकात बॉलीवूड अभिनेता गोविंदाने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने लोकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले. त्याने अनेक हिट चित्रपट दिले आणि आजही त्याच्या चाहत्यांची संख्या खूप मोठी आहे. त्याने पडद्यावर त्यने जितके हास्य दाखवले आहे तितकेच त्याच्या कौटुंबिक जीवनात संघर्षही आला आहे. जे पाहून असे वाटते की अभिनेत्याचे जीवन दिसते तसे नसते. त्यांच्या कुटुंबियांनाही अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा हिने तिच्या आणि गोविंदाच्या नात्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी शेअर केल्या आहेत.
हिरोची पत्नी असण्याची खंत काय?
सुनीता एका मुलाखतीत म्हणाली, “एखाद्या नायकाची पत्नी असण्याचा अर्थ असा आहे की तुमचे हृदय दगडाचे असले पाहिजे. तुम्ही पाहता, नायक बहुतेकदा पत्नीपेक्षा त्याच्या नायिकांसोबत जास्त वेळ घालवतो.” सुनीता यांच्या मते, नायकाचा बहुतेक वेळ इतर नायिका आणि इतर लोकांसोबत जास्त जातो. याबाबत तिने खंतही व्यक्त केली आहे. गोविंदाचा हवा तेवढा सहवास तिला मिळाला नसल्याची खंत तिने व्यक्त केली आहे.
तर आयुष्य उद्ध्वस्त होईल…
या संभाषणात सुनीताने तिच्या नातेसंबंधातील विश्वासाचे महत्त्व देखील स्पष्ट केले आहे. ती म्हणाली की, “जर जोडीदारावर विश्वास नसेल तर आयुष्य उद्ध्वस्त होईल. वैवाहिक जीवनात असुरक्षिततेला वर्चस्व गाजवू देऊ नये” असेही तिने सांगितले.
सासूकडून शिकलेले धडे
यासोबतच सुनीताने असेही सांगितले की जेव्हा ती आई होणार होती तेव्हा गोविंदा तिच्यासोबत नव्हता. तो शूटिंगसाठी बाहेर असायचा. त्यावेळी सुनीतासोबत तिच्या सासूबाई होत्या. सुनीताने सांगितले की तिला गोविंदाच्या आईकडून कुटुंबाचे महत्त्व समजावून घेता आले. तिने सांगितले की गोविंदा त्याच्या आईवर खूप प्रेम करतो आणि त्याने आयुष्यात कधीही काहीही आईच्या मनाविरुद्ध केले नाही.