“ती आयटम जातच नाही..”; विवाहबाह्य संबंधाबद्दल गोविंदाच्या पत्नीचं वक्तव्य चर्चेत
या मुलाखतीत सुनिता विवाहबाह्य संबंधाविषयी मोकळेपणे बोलताना दिसत आहेत. कितीही प्रयत्न केले तरी ती आयटम तुमच्या आयुष्यातून जात नाही, असं ती म्हणताना दिसतेय. सुनिताच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अभिनेता गोविंदा आणि सुनिता अहुजा हे लग्नाच्या 37 वर्षांनंतर घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. एका 30 वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबत गोविंदाचं अफेअर असल्यामुळे सुनिताने विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातंय. या चर्चांमुळे गोविंदाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सुनिताने सहा महिन्यांपूर्वी गोविंदाला घटस्फोटाची नोटीस पाठवली होती, मात्र त्यानंतर दोघांनी नात्यातील दुरावा कमी करण्याचा प्रयत्न केला आहे, असा खुलासा त्यांच्या वकिलाने केला आहे. अशातच सुनिताच्या एका जुन्या मुलाखतीचा व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. ‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या या मुलाखतीत सुनिता पुरुषांच्या विवाहबाह्य संबंधाविषयी बोलताना आणि त्याबद्दल महिलांना, तरुण मुलींना सल्ला देताना दिसतेय.
या व्हिडीओमध्ये सुनिता एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबद्दल मोकळेपणे बोलताना दिसतेय. ती म्हणते, “हात जोडून मी सार्वजनिकरित्या म्हणते, मुलींना आणि पत्नींना.. आयुष्यात आपल्या बॉयफ्रेंड किंवा पतीला हे बोलू नका की ‘माझा बॉयफ्रेंड किंवा माझा पती काहीच करत नाही.’ केलं ना तर इतक्या वाईट पद्धतीने, माझ्या भाषेसाठी मी माफी मागते, इतक्या वाईट पद्धतीने हगणार, इतक्या वाईट जागी होणार ना, काढता काढता दोन वर्ष लागतील, तरी ती तुमच्या आयुष्यात जाणार नाही. तुम्ही आयुष्यातून निघून जाणार, पण ती आयटम निघून जात नाही.”
She knows.. she knows byu/Live-Pay-3527 inBollyBlindsNGossip
सुनिता तिच्या मनमोकळ्या स्वभावासाठी ओळखली जाते. त्यामुळे विविध मुलाखतींमध्येही ती बिनधास्तपणे आपली मतं मांडते. तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘मला तिच्यासाठी वाईट वाटतंय. ती फटकळ आहे पण जे आहे ते स्पष्ट बोलते’, असं एकाने लिहिलंय. तर ‘ती खरं काय ते सांगतेय’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘आता मला समजतंय. ती खूप दुखावली गेली असेल पण त्या वेदनेतून ती हसतेय,’ असेही कमेंट्स नेटकऱ्यांनी केले आहेत. सुनिताने अप्रत्यक्षरित्या गोविंदाबद्दलच हे म्हटलं असल्याचाही अंदाज काहींनी वर्तवला आहे.
गोविंदा आणि सुनिता यांना दोन मुलं आहेत. गेल्या काही वर्षांपासून हे दोघं वेगवेगळे राहत असल्याचं समजतंय. वेगवेगळं राहण्याबद्दल सुनिताने एका व्हिडीओमध्ये स्पष्ट केलं, “वेगवेगळे राहतो याचा अर्थ, जेव्हा गोविंदाने राजकारणात प्रवेश केला तेव्हा माझी मुलगी किशोरवयात होती. आमच्या घरात सतत पक्षाचे कार्यकर्ते ये-जा करायचे. घरात किशोरवयीन तरुणी शॉर्ट्समध्ये फिरत असेल तर ते बरं वाटत नाही. म्हणून घराच्या समोरच पक्षाच्या कामासाठी गोविंदाने ऑफिस घेतलं. अनेकदा कामामुळे आणि मिटींग्समुळे गोविंदाला रात्री खूप उशीर व्हायचा. मग तो तिथेच झोपायचा.” या व्हिडीओच्या शेवटी सुनिता असंही म्हणते, “मला आणि गोविंदाला कोणीच वेगळं करू शकत नाही. किसी का माई का लाल तो सामने आ जाए.”
