सवतीने उचलेलं मोठं पाऊल, हेमा मालिनी यांच्यावर होणारा हल्ला आणि…
Prakash Kaur - Hema Malini : सवतीने असं काय केलं ज्यामुळे हेमा मालिनी मोठ्या संकटातून वाचल्या, धक्कादायक होती 'ती' घटना... अखेर वास्तव समोर आलंच..., सध्या सर्वत्र हेमा मालिनी यांच्या खासगी आयुष्याची चर्चा सुरु आहे...

Prakash Kaur – Hema Malini : दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या नात्याबद्दल सर्वांना माहिती आहे. कुटुंबिय आणि समाजाच्या विरोधात जात धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केलं तर खरं, पण हेमा मालिनी यांच्या नावापुढे दुसऱ्या बायकोचा टॅग लागला. अनेकांनी हेमा मालिनी यांच्यावर टीका देखील केली, चांगल घर उद्ध्वस्त केलं… असं देखील अनेक जण म्हणाले. एवढंच नाही तर, आज धर्मेंद्र नाहीत आणि हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न होऊन 45 वर्ष झालीत, पण आजपर्यंत हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या घराची पायरी चढली नाही…
धर्मेंद्र यांचा दुसऱ्या लग्नाचा निर्णय…
धर्मेंद्र यांनी जेव्हा दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा त्यांचा मोठा मुलगा म्हणजे अभिनेता सनी देओल 24 वर्षांचा होता… सनी वडिलांच्या दुसऱ्या लग्नाच्या विरोधात होता आणि प्रचंड निराश देखील होता… धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केल्याचं माहिती होताच सनी रागाने लाला झालेला… रिपोर्टनुसार, सनी देओल तेव्हा हेमा मालिनी यांच्यावर हल्ला करणार होता, पण प्रकाश कौर यांनी मुलाला शांत केलं.
एका मुलाखतीत प्रकाश कौर यांनी या सर्व अफवा असल्याचं सांगितलं होतं… प्रकाश कौर म्हणालेल्या, ‘प्रत्येक मुलाची एकच इच्छा आहे आणि ती म्हणजे, त्याच्या वडिलांनी आईवर प्रचंड प्रेम केलं पाहिजे. मी जास्त शिकलेली नाही.. पण संपूर्ण जगात मी माझ्या मुलांसाठी चांगली आई आहे…’ असं देखील प्रकाश कौर म्हणाल्या होत्या..
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर पूर्णपणे कोलमडल्या आहेत प्रकाश कौर…
24 नोव्हेंबर 2025 मध्ये धर्मेंद्र यांचं निधन झालं… धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईत शोक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं… धर्मेंद्र यांच्या निधनामुळे प्रकाश कौर पूर्णपणे कोलमडल्या आहेत… सध्या सनी आणि बॉबी देओल आईची काळजी घेत आहेत. तर दुसरीकडे हेमा मालिनी यांच्यावर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कारण हेमा मालिनी यांनी आयुष्यातील अशा व्यक्तीला गमावलं आहे, ज्यावर त्यांनी अफाट प्रेम केलं.
धर्मेंद्र यांच्या शेवटच्या क्षणांबद्दल सांगायचं झालं तर, रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. तेव्हा संपूर्ण कुटुंब धर्मेंद्र यांची काळजी घेत होतं. त्यानंतर धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देखील देण्यात आला. पण राहत्या घरी नेल्यानंतर धर्मेंद्र यांना हेमा मालिनी यांना भेटता आलं नाही.. असं देखील सांगितलं जात आहे…
