AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suryaa First Look : वाढलेली दाढी, इंटेन्स लूक अन् दमदार अंदाज! सनी देओलच्या ‘सूर्या’ची पहिली झलक

सनी देओलने त्याच्या 'सूर्या: अंत से आरंभ तक' या नव्या फिल्मचं मोशन पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. त्याचा गंभीर, इंटेन्स लूक उत्सुकता वाढवणार असून चित्रपटाची रिलीज डेटही समोर आली आहे.

Suryaa First Look : वाढलेली दाढी, इंटेन्स लूक अन् दमदार अंदाज! सनी देओलच्या ‘सूर्या’ची पहिली झलक
| Updated on: Oct 12, 2026 | 2:30 PM
Share

बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आपल्या दमदार अभिनयाने आणि अ‍ॅक्शनने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बंटवारा 1947’ नंतर सनी देओल पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर आपली छाप पाडण्यासाठी सज्ज आहे. त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. सोमवारी सनी देओलने इन्स्टाग्रामवर आपल्या नव्या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला. सनी देओलच्या आगामी ‘सूर्या’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर आता प्रदर्शित झाले असून, त्यासोबतच निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

सनी देओलच्या नव्या चित्रपटाची घोषणा

मोशन पोस्टरमध्ये सनी देओलची पहिली झलक पाहायला मिळाली असून, त्याचा अंदाज अत्यंत दमदार दिसत आहे. या चित्रपटाचा व्हिडीओही समोर आला आहे. यामध्ये सनी देओलचा इंटेन्स लूक पाहायला मिळतो. तो सिगारेट ओढताना दिसत आहेत. वाढलेली दाढी आणि चेहऱ्यावरील रुबाब यामुळे त्याचा लूक अधिकच प्रभावी झाला आहे. त्याच्या भारदस्त आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाची झलक या व्हिडीओत पाहायला मिळते. व्हिडीओमध्ये त्याचे पात्र भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांच्यात अडकलेले असून, ते सत्याच्या शोधात असल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र, चित्रपटाबाबत निर्मात्यांनी अद्याप अधिक माहिती उघड केलेली नाही.

सनी देओलचा दमदार लूक पाहून चाहतेही प्रभावित झाले आहेत. सोशल मीडियावर अनेकांनी हा चित्रपट जबरदस्त असेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. एका चाहत्याने तर सनी देओलला ‘आंतरराष्ट्रीय हिरो’ म्हटले आहे. त्यामुळे या नव्या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

कधी रिलीज होणार मूव्ही ?

हा चित्रपट 20 नोव्हेंबर 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. एम. पद्मकुमार या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत, तर कमल मुकुट या चित्रपटाचे सादरकर्ते आहेत. या चित्रपटात सनी देओल यांच्यासोबत रवी किशन आणि प्रज्ञा जैस्वाल हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol)

‘गदर 2’ या चित्रपटाद्वारे सनी देओलने शानदार कमबॅक केला होता. मात्र, त्यानंतर प्रदर्शित झालेल्या त्याच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर विशेष यश मिळू शकले नाही. राजकुमार संतोषी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘बंटवारा 1947’ या ऐतिहासिक चित्रपटालाही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. समीक्षकांनी या चित्रपटाचे कौतुक केले असले, तरी बॉक्स ऑफिसवर त्याला फारशी कमाई करता आली नाही. या चित्रपटात सनी देओलने सिकंदर मिर्झा ही भूमिका साकारली होती.

नोव्हेंबरमध्ये सनीचा डबल धमाका

सर्वात विशेष गोष्ट म्हणजे नोव्हेंबरमध्ये सनीचा डबल धमाक आहे, कारण याच महिन्यात त्याचा आणखी एक मोठा चित्रपट येणार आहे. नितेश तिवारीच्या दिग्दर्शनाखाली बनलेली ‘रामायण’ ही फिल्म देखील नोव्हेंबरमध्ये रिलीज होणार आहे. रणबीर कपूर आणि साई पल्लवी, यश यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात सनी देओल हा, हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. पहिल्या भागात सनी देओल फारसा दिसणार नाही, मात्र दुसऱ्या भागात फोकस त्याच्या कॅरेक्टरवर असेल. सनी देओलचे लागोपाठ दोन चित्रपट येणं हे चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट असून त्याचा मोठ्या प़डद्यावर पाहण्यासाठी सगळेचउत्सुक आहेत. सध्या तर सगळे, सूर्या चित्रपटाचा ट्रेलरची वाट बघत आहेत. ‘सूर्या’ या आगामी चित्रपटातून सनी देओल पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर दमदार पुनरागमन करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
Rahul Gandhi | इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...