AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ साऊथ सेलिब्रिटींची सुपरहिट लव्हस्टोरी; चाहत्यांना कायम देतात Relationship Lessons

लव्हस्टोरी असावी तर, 'या' साऊथ सेलिब्रिटींसारखी; प्रेम केलं... भांडले पण कधीही विभक्त होण्याचा विचारही नाही केला... चाहत्यांना कायम दिले कपल गोल्स

'या' साऊथ सेलिब्रिटींची सुपरहिट लव्हस्टोरी; चाहत्यांना कायम देतात Relationship Lessons
| Updated on: Feb 19, 2023 | 4:26 PM
Share

Relationship Lessons : प्रेम हा शब्द बघायला आणि ऐकायला लहान असला तरी, त्याचा अर्थ फार मोठा आहे. काही कपल असे असतात जे कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. साऊथ सिनेविश्वातील अनेक अभिनेते आहेत, जे कायम चाहत्यांना प्रेमाचं नवीन उदाहरण देत असतात. बॉलीवूड नही तर साऊथ इंडस्ट्रीतील अनेक लोकप्रिय जोडप्यांची प्रेमकहाणी आज चाहत्यांमध्ये चर्चेत असते. साऊथ सेलिब्रिटींची सुपरहिट लव्हस्टोरीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. आज अशाच सेलिब्रिटींच्या लव्हस्टोरीबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

अभिनेता राम चरण आणि उपासना सुपरस्टार राम चरण (Ram charan) हा फक्त प्रसिद्ध अभिनेता नसून उत्तम पती देखील आहे. राम चरण याची लव्हस्टोरी देखील त्याच्यासारखीच खास आणि वेगळी आहे. राम चरण आणि उपासना यांची ओळख कॉलेजमध्ये झाली होती. कॉलेजमध्ये असताना त्याचे अनेकदा वाद झाले. वाद टोकाला पोहोचल्यानंतर दोघे वेगळे झाले. त्यानंतर दोघांना विभक्त होण्याची किंमत कळाली. अखरे दोघांना प्रेम झालं आणि त्यांनी लग्न केलं. आज त्यांची लव्हस्टोरी चाहत्यांना कपल गोल्स देते. (Super hit love story)

अभिनेता अल्लू अर्जुन आणि स्नेहा ‘पुष्पा’ सिनेमामुळे अभिनेता अल्लू अर्जुन (allu arjun) याच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. अल्लूच्या लोकप्रियते प्रमाणे अभिनत्याची लव्हस्टोरी देखील प्रचंड खास आहे. मित्राच्या लग्नात अल्लू पहिल्यांदा स्नेहा हिला भेटला होता. पहिल्या नजरेतच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. लग्नात दोघांनी एकमेकांचा फोननंबर देखील घेतले. त्यावेळी अल्लूने तेलुगू फिल्म इंडस्ट्रीत स्वतःचं स्थान भक्कम करत होता. दोघांनी त्यांचं नातं फार गुपित ठेवलं.

अल्लू अर्जुन आणि स्नेहा यांच्या नात्याला सुरुवातीला दोघांचे आई – वडील विरोध करत होते. पण अल्लू अर्जुन आणि स्नेहा यांनी कधीही एकमेकांची साथ सोडली नाही. आयुष्यात अनेक संकटांचा सामना केल्यानंतर अल्लू अर्जुन आणि स्नेहा दोघे आनंदाने आयुष्य जगत आहेत. (Super hit love story of south celebrities)

अभिनेते रजनीकांत आणि लता अभिनेते रजनीकांत यांची लव्हस्टोरी प्रचंड भन्नाट आहे. जेव्हा लता रंगाचारी एका कॉलेज मॅगझीनसाठी रजनीकांत यांची मुलाखत घेण्यासाठी आल्या होत्या. तेव्हा मुलाखती दरम्यान रजनीकांत लता यांच्या प्रेमात पडले आणि मुलाखत संपल्यानंतर लता यांना लग्नासाठी मागणी घातली. एवढ्या मोठ्या सुपरस्टारने आपल्याला लग्नासाठी मागणी घातल्यानंतर लता थक्क झाल्या. त्यानंतर २६ फेब्रुवारी १९८१ साली रजनीकांत आणि लता यांनी लग्न केलं. आजही रजनीकांत आणि लता यांच्यातील प्रेम कमी झालेलं नाही.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.