दिवसाला 100 सिगारेट ओढायचा कपूर घराण्याचा हा सुपरस्टार; पण एका घटनेनं सगळंच बदललं
बॉलिवूडमध्ये कपूर घराण्याची एक वेगळं स्थान आहे. या कुटुंबातील प्रत्येकजण स्टार आहे. पण हे फार कमी जणांना माहित असेल की कपूर घराण्यातील एक सुपरस्टार व्यसनाच्या एवढा आहारी गेला होती की, हा अभिनेता दिवसाला 100 सिगारेट ओढत असे. पण एका घटनेनं आयुष्यचं बदललं.

बॉलिवूडमध्ये कपूर घराण्याची एक वेगळं स्थान आहे, एक वेगळी ओळख आहे. या घराण्यातील प्रत्येक पिढीने चित्रपटसृष्टी गाजवली आहे. कपूर घराण्यातील स्टार हे चित्रपटांच्याबाबत जसे चर्चेत असायचे तसेच ते वैयक्तिक गोष्टींबद्दलही चर्चेत असतात. हे फार कमी जणांना माहित असेल की कपूर कुटुंबातील एक स्टार अभिनेता प्रचंड व्यसनांच्या आहारी गेला होता. दारू, सिगारेटच प्रचंड व्यसन लागलं होतं. असंही म्हटलं जातं की हा अभिनेता दिवसाला 100 सिगारेट प्यायचा. मांसाहार देखील त्यांना रोज लागायचा. पण यामुळे त्यांचा स्वभावही रागीट होत चालला होता.हा सुपरस्टार म्हणजे प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते शम्मी कपूर.
घराण्याचा हा सुपरस्टार दिवसाला 100 सिगारेट ओढायचा
प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता शम्मी कपूर यांना दारू, सिगारेटच प्रचंड व्यसन होतं. ते दिवसाला जवळपास 100 सिगारेट ओढायचे. तेवढंच त्यांना दारूचंही व्यसन लागलं होतं. पण एका व्यक्तीने त्यांचं आयुष्यच बदलून टाकलं आणि त्यांना अध्यात्माच्या आणि साधेपणाच्या मार्गावर नेले.
आध्यात्मिक उत्सुकता जागृत झाली.
1974 मध्ये, शम्मी यांच्या पत्नीच्या कुटुंबाने योगी हैदखान बाबा यांना त्यांच्या घरी आमंत्रित केले होते. सुरुवातीला, शम्मी यांना त्यांना भेटण्यात काहीही रस नव्हता. ते अनिच्छेने भेटण्यास आले होते. एका एवढंच नाही तर कोपऱ्यात बसून ते गुपचूप बाबांचे फोटो काढत होते तेव्हा त्यांना बाबांची नजर त्यांच्यावर असलेली जाणवली. त्या क्षणी त्याच्या आत खोलवर काहीतरी स्पर्श झाला आणि त्याची आध्यात्मिक उत्सुकता जागृत झाली.
आश्रमाला भेट आणि आश्चर्यकारक परिवर्तन
बाबांच्या त्या ऊर्जेला प्रभावित होऊन शम्मी नैनीताल येथील हैदखान बाबांच्या आश्रमात गेले. त्यांनी त्यावेळी दारू, मांसाहारी जेवण आणि संगीताचा पुरेपूर साठा घेऊन गेले होते. कारण त्यांनी वाटले की ते या सर्वांशिवाय तिथे एक दिवसही जगू शकणार नाही. पण आश्रमात आल्यावर बाबा हसले आणि म्हणाले, “महात्माजी आले आहेत!” हे एक वाक्य त्याच्या हृदयाला भिडले. आश्रमातील शांत वातावरण आणि बाबांच्या उपस्थितीचा त्याच्यावर इतका खोलवर परिणाम झाला की 12 दिवस त्यांनी दारूला स्पर्श केला नाही, मांस खाल्ले नाही आणि त्याची गरजही वाटली नाही. हळूहळू, त्यांनी दारू आणि सिगारेट पूर्णपणे सोडून दिली आणि अध्यात्माकडे वळाले.
सिगारेट , दारू सगळं बंद केलं.
शम्मी यांची पत्नी नीला देवी यांनी देखील याबाबत एक गोष्ट सांगितली, “गुरुजींनी शम्मीवर कधीही काहीही जबरदस्ती केली नाही. ते स्वतःहून अध्यात्माच्या मार्गात सामील झाले.” एवढंच नाही तर शम्मी बाबांसोबत प्रवास करू लागले आणि आध्यात्मिक साधनेत मग्न झाले. नीला यांनी पुढे सांगितले की, “शम्मीने सुरुवातीला लहान भूमिका स्वीकारण्यास नकार दिला, परंतु बाबांच्या प्रभावाखाली ते इतके नम्र झाले आणि सहाय्यक भूमिका घेऊ लागले. एक काळ असा होता की ते दिवसाला 100 सिगारेट ओढत असे, परंतु हळूहळू ती सवय सोडून दिली.” शम्मी यांच्यावर हैदखान बाबांचा प्रभाव इतका पडला की त्यांनी बाबांना समर्पित एक वेबसाइट तयार केली आणि “शम्मी कपूर अनप्लग्ड” सारख्या कार्यक्रमांमध्ये त्यांचे अनुभव शेअर केले.”
