तू माझ्यासाठी काहीच नाही; मॉडेलने ‘ते’ रील शेअर करत स्वत:ला संपवले
एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. यामध्ये मॉडेलने स्वत:चे आयुष्य संपवण्यापूर्वी एक रील शेअर केले आहे.

मॉडेलिंग आणि चित्रपटसृष्टी जितकी ग्लॅमरस व चमकदार दिसते, तितकी ती नसते. सूरतमधील एका प्रसिद्ध मॉडेलने आपलं आयुष्य संपवलं आहे. एका महिन्यात सूरतमध्ये दुसऱ्या मॉडेलचा मृत्यू झाला आहे. या घटनेने केवळ सूरतकरांनाच नव्हे, तर संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. प्रत्येकजण फक्त हे जाणून घ्यायला उत्सुक आहे की, इतकी सुंदर आणि स्वतःचं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मॉडेलने मृत्यूला का कवटाळलं?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मॉडेलचं नाव अंजली वरमोरा आहे. ती फक्त 23 वर्षांची होती आणि तिने सूरज येथील नवसारी बाजारात असलेल्या तिच्या खोलीत आत्महत्या केली. प्राथमिक तपासात मानसिक तणाव आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित बाबी समोर येत आहेत. पण अद्याप अंजली वरमोराच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही.
वाचा: काका, आय लव्ह यू, तुझ्याशिवाय…; पुतण्यासोबत शारिरीक संबंध, भावाला कळाल्यानंतर.. पोलिसही हादरले
View this post on Instagram
सूरतच्या मॉडेलने मृत्यूला कवटाळलं
अंजली वरमोरा मॉडेलिंगसोबतच सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय होत होती. ती यूट्यूबवर व्हीलॉग्सच्या माध्यमातून आपल्या आयुष्याबद्दल अपडेट्स देत होती. इन्स्टाग्रामवर तिचे 37 हजारांहून अधिक फॉलोअर्स होते.
मृत्यूच्या आधी अंजलीचं पोस्ट
अंजली वरमोराने मृत्यूच्या एक दिवस आधीच एक पोस्ट शेअर केली होती. त्यात तिने एका भावनिक गुजराती गाण्याचा वापर केला होता. इन्स्टाग्राम पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं होतं की, ‘आज मला जाणवलं की तू माझ्यासाठी काहीच नाही.’ सोशल मीडियावर अंजलीने लिहिलेल्या अशा गोष्टी वाचून लोक नानाविध तर्क लावत आहेत.
अनेकदा केल्या वेदनादायी पोस्ट
अंजली वरमोराने इन्स्टाग्रामवर अनेकदा असे तुटलेल्या मनाने पोस्ट शेअर केल्या होत्या. तिच्या एका रीलवर लिहिलेलं आढळलं की, ‘जेव्हा तुम्ही सर्वकाही गमावता तेव्हा तुम्हाला कसलीही फिकीर नसते. पण जेव्हा तुमचं प्रेम हरवतं तेव्हा हृदय दुखतं.’
अंजली वरमोरा प्रकरणाचा तपास सुरू
सध्या पोलिस सूरतची मॉडेल अंजलीच्या प्रकरणाचा तपास सुरु आहे. पोलिसांना अद्याप कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. सध्या पोलिसांनी मृतकेचा फोन, सोशल मीडिया अकाउंट आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी ताब्यात घेतल्या आहेत. तसेच, कुटुंबीय आणि ओळखीच्या व्यक्तींकडूनही चौकशी करत आहेत.
