AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुशांत सिंग राजपूतने ज्याठिकाणी घेतला शेवटचा श्वास, ‘त्या’ घराला मिळणार नवा भाडेकरू

सुशांतने 'ज्या' घरात आत्महत्या केली, त्याठिकाणी नवा भाडेकरू येणार रहायला; इतकं असेल महिन्याचं भाडं

सुशांत सिंग राजपूतने ज्याठिकाणी घेतला शेवटचा श्वास, 'त्या' घराला मिळणार नवा भाडेकरू
सुशांत सिंग राजपूतने ज्याठिकाणी घेतला शेवटचा श्वास, 'त्या' घराला मिळणार नवा भाडेकरू
| Updated on: Jan 04, 2023 | 5:49 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या घरात मृत अवस्थेत आढळला होता. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा ‘मॉन्ट ब्लँक’ अपार्टमेंटमधील फ्लॅट हा तपासणीचा एक भाग बनला होता. अभिनेत्याच्या आत्महत्येनंतर या आलिशान फ्लॅटमध्ये कोणीही राहत नव्हतं. पण आता या भव्य घरात नवा भाडूकरू रहायला येणार असल्याची चर्चा रंगत आहे. त्यामुळे आता या फ्लॅटमध्ये कोण रहायला येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुशांत रहात असलेल्या फ्लॅटचे मालक परदेशात राहतात. आता त्यांनी पुन्हा घर भाडेतत्त्वावर देण्याचा विचार केल्याची माहिती समोर येत आहे. महत्त्वाचं म्हणजे वांद्रे स्थित घरात रहायला येणाऱ्या भाडेकरूला एका महिन्यासाठी तब्बल ५ लाख रुपये भाडे मोजावे लागणार आहे.

रिपोर्टनुसार, जी व्यक्ती या घरात रहायला येणार आहे, ती व्यक्ती घर मालकासोबत करार करण्यासाठी तयारी करत आहे. वांद्रे याठिकाणी असलेल्या सुशांतचं हे घर खूपच सुंदर आहे. हा फ्लॅट सी व्ह्यू असून, दुसर्‍या मजल्यावर आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुशांत घरासाठी महिन्याला तब्बव चार लाख रुपये मोजत होता.

सुशांत सिंह राजपूतसोबत अभिनेत्री रिया चक्रवर्ती, फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठाणी आणि घरातील सहकारी नीरज आणि केशव या अपार्टमेंटमध्ये राहत होते. सुशांतने हे घर 2019 मध्ये भाड्याने घेतले होते, आणि डिसेंबर 2022 पर्यंत तो या घरात राहणार होता.

sushant singh rajput

सुशांत या अपार्टमेंटचे भाडे 3 टप्प्यात देत असे, असेही अहवालात सांगण्यात आले. पहिल्या वर्षी तो दरमहा 4.3 लाख रुपये द्यायचा, दुसर्‍या वर्षी तो 4.51 लाख रुपये आणि तिसर्‍या वर्षी 4.74 लाख रुपये दरमहा देणार होता.

सुशांतच्या आत्महत्येनंतर या घरात जवळपास दोन वर्ष एकही भाडेकरू फिरकला नव्हता. आता लवकरच सुशांतने आत्महत्या केलेल्या घरात नवा भाडेकरू रहायला येणार असल्याच्या चर्चांनी जोर घरला आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.