पोटगीच्या पैशांचा गैरवापर? पूर्व पत्नीवर कारवाई करणार सुष्मिता सेनचा भाऊ? दिली धमकी
अभिनेत्री सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन अनेकदा त्याच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असतो. नुकताच त्याने एक व्लॉग अपलोड करत त्याच्या पूर्व पत्नीवर आरोप केले आहेत. पोटगीच्या पैशांचा गैरवापर करत असल्याचं त्याने म्हटलंय.

अभिनेत्री सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन आणि त्याची पूर्व पत्नी चारू असोपा यांच्यातील कौटुंबिक वाद सतत चव्हाट्यावर आले आहेत. घटस्फोटानंतरही हे दोघं अनेकदा एकमेकांवर निशाणा साधताना दिसतात. चारूने तिच्या युट्यूब चॅनलवर एक व्लॉग अपलोड करत पूर्व पती राजीववर काही आरोप केले होते. आई आणि वहिनीसोबत मिळून तिने राजीववर टीका केली होती. त्यानंतर आता तिच्या आरोपांवर राजीवने प्रत्युत्तर दिलं आहे. राजीवनेही व्लॉग अपलोड करून या सर्व प्रकरणावर मौन सोडलं आहे. त्याने चारूवर पोटगीच्या पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. इतकंच नव्हे तर तिच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचीही धमकी त्याने दिली आहे.
“चारूकडून माझ्या पैशांचा गैरवापर होतोय अशी मला भीती आहे. तिने त्या पैशांचा वापर मुलीच्या शिक्षणासाठी करावा अशी माझी इच्छा आहे”, असं तो म्हणाला. राजीव इथे त्याच्या पैशांबद्दल म्हणजे घटस्फोटाच्या वेळी पोटगी म्हणून दिलेल्या रकमेबद्दल बोलत असावा, असा अंदाज नेटकऱ्यांनी लावला. त्यानंतर चारूला उद्देशून तो म्हणाला, “तू माझ्याविरुद्ध इतक्या मुलाखती दिल्या आहेस, तेव्हासुद्धा मी काहीही बोललो नाही. पण आता मी गप्प बसणार नाही. माझ्याबद्दल चुकीचं बोलणं बंद कर. माझ्याबद्दल एक जरी गोष्ट सांगितली तर मी त्याचं सडेतोड उत्तर द्यायला तयार आहे. मला नेहमीपासून हीच भीती होती की माझ्या पैशांचा योग्य वापर व्हायला हवा. जियानाच्या (मुलगी) शिक्षणावर ते पैसे खर्च व्हायला हवेत. पण गोष्ट पुढे न्यायचीच असेल तर मीसुद्धा तयार आहे. यातून कंटेट काढायचा असेल तर नक्कीच काढा. आता निर्णय थर्ड पार्टी करणार.”




View this post on Instagram
“चारूने तिच्या व्लॉगमध्ये माझ्यावर आरोप केले की मी गरोदरपणात तिची साथ दिली नाही. परंतु हे सत्य नाही. मी पूर्ण वेळ तिच्यासोबत होतो. ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे व्लॉग्स आहेत. मी चार महिन्यांसाठी निघून गेलो नव्हतो. तीच माझ्यापासून दूर पळत होती. माझ्यावर खोटे आरोप करू नकोस. हे अजिबात खरं नाही”, अशा शब्दांत राजीवने आपली बाजू मांडली.
“आमची भांडणं मी न्यायालयात जाऊ नये यासाठी खूप संयम ठेवला. परंतु आता त्याशिवाय दुसरा कोणता मार्गच उरला नाही, असं दिसतंय. जर मी सुरुवात केली तर मी थांबणार नाही. कारण मला खूप त्रास सहन करावा लागला आहे. माझ्या कुटुंबीयांनीही खूप त्रास सहन केला आहे”, असा इशाराच राजीवने चारूला दिला आहे.