AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Swara Bhasker clarification: मला शिव्या द्यायच्या आहेत तर द्या पण… स्वरा भास्करचा यूटर्न, थेट व्हिडीओ शेअर करत दिले उत्तर

Swara Bhasker clarification: सध्या सर्वत्र बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर चांगलीच चर्चेत आहे. तिने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये केलेल्या वक्तव्याने नवा वाद पेटला आहे. आता यावर प्रतिक्रिया देत स्वराभे ती नेमकं कोणत्या उद्देशाने सर्व काही म्हणाली होती हे सांगितले आहे.

Swara Bhasker clarification: मला शिव्या द्यायच्या आहेत तर द्या पण... स्वरा भास्करचा यूटर्न, थेट व्हिडीओ शेअर करत दिले उत्तर
Swara Bhaskar VideoImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 02, 2026 | 9:09 AM
Share

अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे तिला तीव्र ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. व्हिडिओमध्ये स्वराने दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथे आयोजित ‘वुमन लाइफ फ्रीडम’ टॉकदरम्यान पद्मावतच्या ‘जौहर’बाबत वादग्रस्त विधान केले. त्यानंतर स्वरावर टीका केली जात आहे. इतकेच नव्हे तर स्वराने दीपिका पादुकोणच्या ‘पद्मावत’ चित्रपटात दाखवलेल्या ‘जौहर प्रथा’ दृश्याबाबत संजय लीला भन्सालींना एक ओपन लेटरही लिहिले होते. आता यावर स्वराने प्रतिक्रिया दिली आहे. तिथे एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

स्वरा भास्करने ‘पद्मावत’ चित्रपटाच्या क्लायमॅक्स दृश्याबाबत आपले मत मांडले. ती म्हणाल्या की, जेव्हा ती चित्रपटात शेकडो महिलांना आगीत उड्या मारताना पाहत होती, तेव्हा तिच्या मनात एक विचित्र भीती निर्माण झाली. स्वराने विचार केला की, एखाद्या मुलीसोबत काहीतरी चुकीचे घडले तर समाज तिला जगण्याचा हक्क देणार नाही का? स्वतःचा जीव न देणे हा कमकुवतपणा किंवा कायरता ठरते का? तिच्या मते अशा गोष्टी पाहून असे वाटते की कोणत्याही परिस्थितीत आत्महत्या करणे हाच एकमेव मार्ग आहे.

‘पद्मावत’च्या ‘जौहर’बाबत स्वराची भूमिका

‘पद्मावत’मधील त्या दृश्याबाबत स्वरा खुलेपणाने बोलली. एक गर्भवती महिला आगीत उडी मारायला जात असते हे दृश्य पाहून ती आतून हादरली आणि तिला खूप रागही आला. तिच्या मते गर्भात वाढणाऱ्या बाळाला या जगात येण्याचा हक्क नाही का? स्वराचे हे विधान समोर आल्यानंतर सोशल मीडियावर लोकांचा संताप पाहायला मिळाला. अनेक युजर्सनी त्यांच्यावर इतिहास आणि हिंदू संस्कृतीचा अपमान केल्याचा आरोप केला. लोकांनी म्हटले की ‘जौहर’सारख्या परंपरा आणि राजपूत राण्यांच्या आत्मसन्मानाला चुकीच्या नजरेने पाहणे योग्य नाही.

View this post on Instagram

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

विधान तोडमोड करून सादर केल्याचा आरोप

सतत होत असलेल्या ट्रोलिंगमुळे स्वराने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करून संपूर्ण प्रकरणाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. तिने स्पष्ट शब्दांत सांगितले की, तिचे शब्द चुकीच्या पद्धतीने सादर केले गेले. तिने कधीही इतिहासातील वीरांगनांना किंवा राणी पद्मावतीच्या त्यागाला कायरता म्हटले नाही. अभिनेत्रीचे म्हणणे आहे की काही लोक अर्धवट क्लिप पाहून निर्कारण द्वेष पसरवत आहेत. तिने लोकांना विनंती केली की शिवीगाळ करण्यापूर्वी किंवा राग काढण्यापूर्वी संपूर्ण अर्थाचा विचार करावा. विचार न करता कोणाचेही विधान चुकीच्या पद्धतीने सादर करू नये.

पीडितांच्या जगण्याच्या हक्कावर प्रश्न

स्वराने पुढे स्पष्ट केले की, तिचा संपूर्ण विरोध त्या विचारसरणीला आहे, जी आजच्या काळातही स्त्रियांवर लादली जाते. तिने प्रश्न उपस्थित केला की, एखाद्या स्त्रीचे आयुष्य तिच्या देहापेक्षा कमी मौल्यवान असते का? समाजात असा चुकीचा संदेश जाऊ नये की एखाद्या दुर्घटनेनंतर आयुष्य संपते. एखादी मुलगी जर अत्याचाराला बळी ठरली तर तिचे जिवंत राहणे ही लाजिरवाणी गोष्ट नाही. तिला मान उंच करून जगण्याचा पूर्ण हक्क आहे. चित्रपट आणि कथा अशा संदेश देऊ नयेत, ज्यामुळे कोणाच्या मनात जगण्यापेक्षा मरणे चांगले आहे असा विचार येईल.

‘निर्भया’च्या धैर्याची आठवण

स्वराने दिल्लीच्या ‘निर्भया’ प्रकरणाचे उदाहरण दिले आहे. ती म्हणाली की, इतक्या मोठ्या अत्याचार आणि क्रौर्यानंतरही त्या धाडसी मुलीने शेवटच्या श्वासापर्यंत आयुष्याची लढाई लढली होती. तिच्यात असलेली जगण्याची अद्भुत ताकदच प्रत्येक मुलीचे खरे धैर्य आहे. कोणत्याही दुर्घटनेनंतर कोणालाही असे वाटू नये की तिचे सर्वकाही संपले आहे. स्वराचे मत आहे की प्रत्येक माणसाचे आयुष्य अत्यंत अनमोल आहे आणि कोणत्याही परिस्थितीत आयुष्याची दोरी सोडणे योग्य ठरवता येणार नाही. स्त्रीची ताकद तिच्या जिवंत राहण्यात आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच