AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोक मला कुचका-मेला म्हणतात, दगडाने ठेचून मारण्याची धमकी देतात..; मराठी अभिनेत्यावर का आली अशी वेळ?

'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या या अभिनेत्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांविषयीचा खुलासा केला. प्रेक्षकांकडून अक्षरश: शिव्यांचे मेसेज यायचे, असं त्यांनी सांगितलं.

लोक मला कुचका-मेला म्हणतात, दगडाने ठेचून मारण्याची धमकी देतात..; मराठी अभिनेत्यावर का आली अशी वेळ?
Mahesh KokateImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 22, 2026 | 9:51 AM
Share

पडद्यावर नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना अनेकदा खऱ्या आयुष्यातही प्रेक्षकांच्या रागाला सामोरं जावं लागतं. परंतु एका अर्थी हीच त्यांच्या उत्तम कामाची पोचपावती असते. अभिनेते महेश कोकाटे हे ‘मी सावित्रीबाई जोतिराव फुले’ या मालिकेत गंगाधर शास्त्रींच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. याआधी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या गाजलेल्या मालिकेत त्यांनी अनाजीपंतांची भूमिका साकारली होती. या नकारात्मक भूमिकेमुळे त्यांना प्रेक्षकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी याचा खुलासा केला. “लोक मला बघितल्यानंतर शिव्या घालतात, कुचका-मेला म्हणतात, पण हाच माझ्यासाठी पुरस्कार आहे,” असं ते म्हणाले. महेश कोकाटे यांनी विविध मराठी मालिकांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत.

‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत महेश कोकाटे म्हणाले, “शिव्या हेच माझ्या कामाचं सर्टिफिकेट आहे. लोक मला बघितल्यानंतर शिव्या घालतात, कुचका-मेला म्हणतात, हाच माझा अवॉर्ड आहे. अनाजीपंतांच्या भूमिकेपासून मला ही सवय झालीच आहे. माझ्या आयुष्यातली पहिली निगेटिव्हि भूमिका ही ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील अनाजीपंतांचीच होती. त्यानंतर ‘अगंबाई सासूबाई’मध्येही माझी नकारात्मक भूमिका होती. त्यानंतरही दोन-तीन मालिकांमध्ये तशाच पद्धतीच्या भूमिका झाल्या. तेव्हा मला जाणवलं की अरे मी खूपच निगेटिव्ह भूमिका करू लागलो आहे. त्यानंतर मध्यंतरी अबोली या मालिकेत सकारात्मक भूमिका साकारली, पण त्यानंतर पुन्हा खलनायकी भूमिकांकडे वळलो.”

“निगेटिव्ह भूमिकेसाठी अभिनेत्याचा खूप कस लागतो. कारण खूप विचार करावा लागतो. अती केल्यानेही ती भूमिका चांगली होऊ शकत नाही. खूप त्रासही होतो आणि तेवढीच मेहनतसुद्धा घ्यावी लागते. मालिकेच्या प्रत्येक एपिसोडवरून प्रेक्षकांचे मेसेज यायचे. ‘तू फक्त पगडी घालून बाहेर ये, तुला दगडाने चेचलं नाही तर बघ..’ अशा शब्दांत ते राग व्यक्त करायचे. काहीजण तर अक्षरश: शिवीगाळ करायचे. अभिनेत्री अश्विनी महांगडेनं तर मला सांगितलं होतं की, तुम्ही साताऱ्याला जाऊ नका. तिकडची लोकं तर तुम्हाला दगडाने चेचणार आहेत,” अशा शब्दांत त्यांनी अनुभव सांगितला.

Follow Us
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? निकालाआधी राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
Sanjay Raut - Naresh Mhaske | सुप्रीम कोर्टाबाहेर राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया