AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TMKOC | ‘मुलांनो तुम्हाला लाज वाटत नाही, तुमचे वडील…’, असं का म्हणाले जेठालाल? पाहा व्हिडीओ

TMKOC | सोशल मीडियावर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम दिलीप जोशी यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्याने मुलं आणि त्यांच्या वडिलांना उद्देशून एक मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त दिलीप जोशी यांच्या व्हिडीओची चर्चा सुरु आहे...

TMKOC | 'मुलांनो तुम्हाला लाज वाटत नाही, तुमचे वडील...', असं का म्हणाले जेठालाल? पाहा व्हिडीओ
| Updated on: Oct 01, 2023 | 11:39 AM
Share

मुंबई : 1 ऑक्टोबर 2023 | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिका गेल्या १५ वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील कलाकारांनी आपल्या विनोदबुद्धीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. आज देखील मालिका तितक्याच जोमाने चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक जण तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका तितक्याच उत्साहाने पाहतो. मालिकेतील प्रत्येक कलाकार चाहत्याचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील अनेक कलाकार सोडून गेले. पण जेठालाल ही भूमिका साकारणारे दिलीप जोशी आजही चाहत्यांचं मनोरंजन करत आहेत. दिलीप जोशी यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. त्यामुळे दिलीप जोशी अनेक कार्यक्रमांना हजेरी लावतात. आता देखील दिलीप जोशी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पुणे येथे भोसरी याठिकाणी एका कार्यक्रमात दिलीप जोशी उपस्थित होते. तेव्हा त्यांना पाहिल्यानंतर चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आणि चाहते बबिता बबिता मोठ्याने ओरडू लागले. तेव्हा दिलीप जोशी विनोदी अंदाजात चाहत्यांना म्हणाले, ‘अरे लहान लहान मुलांनो बबिता बबिता करताय, कुठेयत तुमचे वडील कुठे आहेत, की वडील पण बबिता बबिता करत आहेत…’ सध्या सर्वत्र दिलीप जोशी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सध्या व्हायरल होत असलेल्या दिलीप जोशी यांच्या व्हिडीओवर चाहते लाईक्ल आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. दरम्यान, मालिकेत जेठालाल आणि बबिता यांच्यामध्ये असणारी केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडते. बबिता हिच्यावर जेठालाल याचं असलेलं प्रेम मालिकेतील महत्त्वाचा घटत आहे. मालिकेतील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेसाठी दिलीर जोशी यांचं मानधन

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील एका एपिसोडसाठी दिलीप जोशी तब्बल १.५ कोटी मानधन घेतात. म्हणजे महिन्याला जेठालाल मालिकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावतात. मालिकेत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांमध्ये दिलीप जोशी अव्वल स्थानी आहेत.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेशिवाय दिलीप जोशी यांनी ‘कभी ये कभी वो’, ‘हम सब एक है’, ‘FIR’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. अनेक सिनेमांमध्ये देखील दिलीप जोशी यांनी महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेमुळे दिलीप जोशी यांच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?