AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तारक मेहता..’मधील ‘बाघा’वर कोसळला दु:खाचा डोंगर; अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत बाघाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता तन्मय वेकारियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अत्यंत जवळच्या व्यक्तीच्या निधनाने तन्मय पूर्णपणे खचला आहे.

'तारक मेहता..'मधील 'बाघा'वर कोसळला दु:खाचा डोंगर; अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन
तन्मय वेकारियाImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 24, 2026 | 3:25 PM
Share

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत बाघाची भूमिका साकारणारा अभिनेता तन्मय वेकारियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तन्मयचे वडील अरविंद वेकारिया यांचं निधन झालं आहे. अरविंद वेकारिया हे गुजराती थिएटर आणि चित्रपट अभिनेते होते. त्यांनी ‘तारक मेहता..’ या मालिकेतही पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. तन्मयसाठी हा काळ अत्यंत कठीण आणि दु:खद आहे. आठ महिन्यांपूर्वीच त्याच्या आईचं निधन झालं होतं. आता वडिलांच्या निधनानंतर तो पूर्णपणे खचला आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये तन्मयच्या आईने या जगाचा अखेरचा निरोप घेतला होता.

कोण होते अरविंद वेकारिया?

अरविंद वेकारिया हे गुजराती रंगभूमीवरील कलाकार होते. त्यांनी गुजराती चित्रपटांमध्येही काम केलं होतं. ‘योशोदा’ आणि ‘छन्नू चमाकलो’मधील भूमिकांसाठी ते ओळखले जातात. ते ‘रुपियो नाच नचावे’ या गुजराती चित्रपटातही झळकले होते. इतकंच नव्हे तर मुकेश खन्ना यांच्या ‘शक्तीमान’ या अत्यंत गाजलेल्या मालिकेतही त्यांनी भूमिका साकारली होती. अरविंद यांनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत एका ज्वेलरची भूमिका साकारली होती. या मालिकेत दाखवण्यात आलं होतं की आत्माराम भिडेला पैशांची गरज असते तेव्हा तो पत्नी माधवीचे दागिने गहाण ठेवतो. ज्या ज्वेलरकडे तो दागिने गहाण ठेवतो, त्याचीच भूमिका तन्मयच्या वडिलांनी साकारली होती.

तन्मयचा सेटवरील व्हिडीओ-

तन्मय वेकारिया त्याच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढउतारांचा सामना करत आहे. काही दिवसांपूर्वीच तो मालिकेच्या शूटिंगदरम्यान अचानक भावूक झाला होता. आईच्या आठवणीत तो ढसाढसा रडू लागला होता. त्याची ही अवस्था पाहून निर्मात्यांनी मालिकेचं शूटिंग थांबवलं होतं. निर्माते असित कुमार मोदी यांनी तन्मयला सावरण्याचा आणि समजावण्याचा प्रयत्न केला होता.

तन्मयला रडताना पाहून सेटवरील इतर कलाकारांच्या आणि क्रू मेंबर्सच्या डोळ्यांतही पाणी आलं होतं. यावेळी तन्मय त्याच्या आईबद्दल म्हणाला की, ‘बाघा’च्या प्रत्येक भागाची त्याचा आई खूप आतुरतेने वाट पाहत असायची. जेव्हा प्रेक्षक त्याच्या अभिनयाचं कौतुक करायचे, तेव्हा त्याची आई खूप आनंदी व्हायची. आईनंतर आता तन्मयच्या डोक्यावरून वडिलांचंही छत्र हरपलं आहे.

Follow Us
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं?
2018चे बदल आयोगाला कळवले, पोचपावतीही आहे; सिब्बलांचा कोर्टात दावा
Shivsena Supreme Court Hearing | 2018चे बदल आयोगाला कळवले, पोचपावतीही आहे; कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा दावा
शिवसेनेचं धनुष्यबाण नेमकं कुणाचं? कपिल सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर..
शिवसेनेचं धनुष्यबाण नेमकं कुणाचं? कपिल सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तीवाद; म्हणाले, आमच्याकडे आयोगाची पोचपावती...