AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दयाबेन नसल्याचा जेठालालला फायदा, थेट बबिताजींसोबत..; सीन पाहून चाहतेही खुश

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये जेठालालचं आयुष्य अनेकदा अनपेक्षित संकटांमध्ये अडकतं आणि त्यातून विनोदी परिस्थिती निर्माण होते. सध्या मालिकेच्या कथानकातही बबिताजी आणि जेठालाल यांच्याशी संबंधित मजेशीर प्रसंग दाखवले जात आहेत.

दयाबेन नसल्याचा जेठालालला फायदा, थेट बबिताजींसोबत..; सीन पाहून चाहतेही खुश
दिलीप जोशी, मुनमुन दत्ता, दिशा वकानीImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 18, 2026 | 9:27 AM
Share

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील गोकुळधाम सोसायटीतील पात्रांमधील नोकझोक, मैत्री आणि मजेशीर प्रसंग प्रेक्षकांना विशेष आवडतात. यामध्ये जेठालाल आणि बबिताजी यांच्यातील मजेशीर केमिस्ट्री नेहमीच चर्चेत राहिली आहे. आता या दोघांचा एक रोमँटिक अंदाज असलेला सीन पुन्हा चर्चेत आला आहे. जेठालाल आणि बबिताजी यांची भूमिका दिलीप जोशी आणि मुनमुन दत्ता साकारतात. मालिकेच्या कथानकात बबिताजी अय्यर यांच्या पत्नी आहेत, तर जेठालाल दयाचे पती आहेत. त्यामुळे दोघांमधील प्रसंग हे मालिकेच्या विनोदी शैलीतच दाखवले जातात.

जेठालालचं बबिता जींवरील आकर्षण हा मालिकेतील जुन्या आणि प्रेक्षकांना परिचित असलेल्या विनोदी ट्रॅकपैकी एक आहे. बबिताजी दिसल्या की जेठालालचा अंदाज बदलतो आणि त्यातून अनेकदा मजेशीर प्रसंग निर्माण होतात. मात्र यावेळी समोर आलेल्या सीनमुळे दोन्ही पात्रांमधील केमिस्ट्री पुन्हा चर्चेचा विषय ठरली आहे. मालिकेच्या विविध भागांमध्ये जेठालाल आणि बबिता यांच्याभोवती अनेक विनोदी प्रसंग पाहायला मिळत आहेत. नुकतंच निर्मात्यांनी मालिकेच्या ताज्या भागातील मजेशीर क्लिप्स शेअर केले आहेत. या क्लिपमध्ये घरातील काम करताना बबिताचा पाय घसरतो आणि तिचा तोल जातो. बबिताला पडताना पाहून जवळच उभा असलेला जेठालाल क्षणभरही न थांबता पुढे धावतो आणि तिला मिठीत पकडतो. यावेळी दोघांमध्ये क्षणभर एक नाट्यमय प्रसंग घडतो.

पहा व्हिडीओ-

स्वत:ला सावरल्यावर बबिता थोडी संकोचते आणि नंतर जेठालालचे आभार मानते. “तुम्ही इथे नसता तर मला गंभीर दुखापत झाली असती”, असं ती जेठालालला म्हणते. तेव्हा जेठालाल तिला आराम करण्यास सांगतो. जेठालाल आणि बबिता जींची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडण्यामागे कलाकारांचा अभिनयही महत्त्वाचा आहे. काही महिन्यांपूर्वी मुनमुन दत्ताने दिलीप जोशी यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला होता. दोघांमध्ये चांगला बॉन्ड असून दिलीप जोशी हे ज्येष्ठ कलाकार असल्याने त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळतं, असं तिने सांगितलं होतं. त्यांच्या डायलॉग आणि एक्सप्रेशन्सना प्रतिसाद देताना अनेकदा छोट्या-छोट्या गोष्टी बदलत असल्याचंही तिने नमूद केलं होतं.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...