AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tamannaah Bhatia | अखेर तमन्नाने दिली प्रेमाची जाहीर कबुली; विजय वर्माबद्दल म्हणाली “त्याने मला..”

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तमन्ना आणि विजय यांचा गोव्यातील पार्टीमधला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये दोघं एकमेकांसोबत एंजॉय करताना, डान्स करताना आणि किस करताना दिसले. त्यानंतर दोघांना मुंबई एअरपोर्टवर एकत्र पाहिलं गेलं.

Tamannaah Bhatia | अखेर तमन्नाने दिली प्रेमाची जाहीर कबुली; विजय वर्माबद्दल म्हणाली त्याने मला..
Tamannaah Bhatia and Vijay VarmaImage Credit source: Vogue
Follow us
| Updated on: Jun 13, 2023 | 9:10 AM

मुंबई : अभिनेत्री तमन्ना भाटियाने अखेर तिच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून तमन्ना आणि अभिनेता विजय वर्मा यांच्या डेटिंगच्या चर्चा जोरदार होत्या. या दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तमन्ना विजयसोबतच्या रिलेशनशिपविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. ‘बाहुबली’ फेम तमन्नाने या मुलाखतीत विजय वर्माबद्दलचं प्रेम जाहीरपणे व्यक्त केलं आहे. हे दोघं लवकरच ‘लस्ट स्टोरीज 2’ या अँथॉलॉजी चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. दोघांचा एकत्र हा पहिलाच प्रोजेक्ट आहे. त्याआधी नवीन वर्षाच्या सुरुवातीला तमन्ना आणि विजयला गोव्यातील एका पार्टीदरम्यान एकमेकांना किस करताना पाहिलं गेलं होतं. किसिंगचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

‘फिल्म कम्पॅनियन’ला दिलेल्या मुलाखतीत तमन्ना विजयबद्दल म्हणाली, “मला वाटत नाही की तुम्ही एखाद्याकडे यासाठी आकर्षित होऊ शकता कारण तो तुमचा सहकलाकार आहे. माझे अनेक सहकलाकार होते. माझ्या मते एखाद्याच्या प्रेमात पडणं किंवा एखाद्यासाठी मनात काही भावना येणं ही नक्कीच अत्यंत वैयक्तीत बाब आहे. ते काय काम करतात, याच्याशी त्याचं काहीच घेणं-देणं नाही. एखाद्याची नोकरी किंवा व्यवसाय पाहून प्रेम केलं जात नाही.”

हे सुद्धा वाचा

“ती एक अशी व्यक्ती आहे ज्याच्याकडे मी खरंच सकारात्मकतेने पाहते. त्याच्याशी माझी मैत्री अत्यंत सहजपणे झाली. तोसुद्धा अत्यंत सहजपणे माझ्याकडे आला होता. त्यामुळे मलासुद्धा कसलीच पर्वा न करता या मैत्रीची सुरुवात करता आली. ज्या महिलांनी करिअरमध्ये खूप काही यश संपादित केलेलं असतं, त्यांच्याबाबत एक समस्या असते. आम्हाला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीसाठी खूप मेहनत केली पाहिजे. पण जर एखादी गोष्ट खूप साधी असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत करण्याची गरजच नाही. तुम्ही जसे आहात तसेच राहा. भारतात अशी लोकांची विचारसरणी आहे की एखाद्या व्यक्तीसाठी महिलेला तिचं संपूर्ण आयुष्य बदलावं लागतं. जोडीदारासाठी तुम्हाला तुमचं घर सोडावं लागतं, त्या व्यक्तीसाठी बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. पण माझ्यासाठी मी एक विश्व तयार केलं आहे आणि ही (विजय वर्मा) एक अशी व्यक्ती आहे ज्याने माझ्या कोणत्याही विशेष प्रयत्नांशिवाय मला आणि माझ्या विश्वाला समजून घेतलंय. त्या व्यक्तीची मी खूप काळजी घेते. तो माझ्या आनंदाचं कारण बनला आहे”, अशा शब्दांत ती पुढे व्यक्त झाली.

33 वर्षीय तमन्नाने 2005 मध्ये ‘चांद सा रोशन चेहरा’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. तेलुगू आणि तमिळ चित्रपटसृष्टीतील ती यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘बाहुबली’ या चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली होती. तर 36 वर्षीय विजयने 2012 मध्ये ‘चटगांव’ या चित्रपटातून कारकिर्दीची सुरुवात केली. गली बॉय या चित्रपटातून त्याला लोकप्रियता मिळाली.

16 तारखेपासून अन्नत्यागच नाहीतर तर आता... बच्चू कडूंची मोठी घोषणा काय?
16 तारखेपासून अन्नत्यागच नाहीतर तर आता... बच्चू कडूंची मोठी घोषणा काय?.
मी काय येडगावहून आलोय? नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर भुजबळ भडकले
मी काय येडगावहून आलोय? नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर भुजबळ भडकले.
विमान दुर्घटनेनंतर राऊतांकडून शंका; सायबर हल्ल्याच्या माध्यमातून...
विमान दुर्घटनेनंतर राऊतांकडून शंका; सायबर हल्ल्याच्या माध्यमातून....
दोन दिवसांपूर्वी कोर्ट मॅरेज, लंडनला जात असताना... घटनेनं बाप हादरला
दोन दिवसांपूर्वी कोर्ट मॅरेज, लंडनला जात असताना... घटनेनं बाप हादरला.
कोणाला 10 मिनिट लेट, कोणी स्वतःला..मृत्यूला चकवा देणारे 'ते' तिघं कोण?
कोणाला 10 मिनिट लेट, कोणी स्वतःला..मृत्यूला चकवा देणारे 'ते' तिघं कोण?.
40 सेकंदात कुठं चूक झाली? लंडनला जाणाऱ्या विमान अपघाताची कारणं काय?
40 सेकंदात कुठं चूक झाली? लंडनला जाणाऱ्या विमान अपघाताची कारणं काय?.
लकी नंबरच्या तारखेलाच मृत्यू, विजय रूपाणींच्या 1206 अंकाचा योगायोग काय
लकी नंबरच्या तारखेलाच मृत्यू, विजय रूपाणींच्या 1206 अंकाचा योगायोग काय.
पवारांची राष्ट्रवादी हा एक मोठा पक्ष सोडून कुणाशीही युती करण्यास तयार?
पवारांची राष्ट्रवादी हा एक मोठा पक्ष सोडून कुणाशीही युती करण्यास तयार?.
बावनकुळेंनी घेतली बच्चू कडूंची भेट तर फोनवरून फडणवीसांचं मोठं आश्वासन
बावनकुळेंनी घेतली बच्चू कडूंची भेट तर फोनवरून फडणवीसांचं मोठं आश्वासन.
अपघातात वडिलांचा मृत्यू, ओळख पटवण्यासाठी 8 महिन्याच्या बाळाचे DNA
अपघातात वडिलांचा मृत्यू, ओळख पटवण्यासाठी 8 महिन्याच्या बाळाचे DNA.