AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 19 : आम्हाला त्यापासून दूर ठेवा; तान्या मित्तलच्या आईवडिलांची हात जोडून विनंती, म्हणाले ‘वाटलं नव्हतं की असं होईल’

'बिग बॉस 19'मधील सर्वाधिक चर्चेत असलेली स्पर्धक तान्या मित्तलच्या आईवडिलांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी ट्रोलर्सना विनंती केली आहे. आम्हाला त्यापासून दूर ठेवा, अशी विनंती त्यांनी केली आहे.

Bigg Boss 19 : आम्हाला त्यापासून दूर ठेवा; तान्या मित्तलच्या आईवडिलांची हात जोडून विनंती, म्हणाले 'वाटलं नव्हतं की असं होईल'
Tanya Mittal Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 05, 2025 | 10:30 AM
Share

प्रयागराजच्या महाकुंभमधून चर्चेत आलेली मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तान्या मित्तल सध्या ‘बिग बॉस 19’च्या घरात कैद आहे. बिग बॉसच्या घरात ती सतत तिच्या आलिशान लाइफस्टाइलविषयी बडेजाव करताना दिसते. यावरून सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोल करण्यात येतंय. या ट्रोलिंगला वैतागून आता तिच्या आईवडिलांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. तान्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरच त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. आपल्या मुलीबद्दल लोकांना बरंवाईट बोलताना पाहून अत्यंत दु:ख होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्याचसोबत त्यांनी नेटकऱ्यांना हात जोडून एक विनंतीसुद्धा केली आहे.

तान्याच्या कुटुंबीयांची पोस्ट-

‘देशातील सर्वांत मोठ्या रिॲलिटी शोमध्ये तान्याला पाहून ज्या मिश्र भावना आमच्या मनात आहेत, त्या आम्ही शब्दांत मांडू शकत नाही. एक पालक म्हणून तिला प्रेक्षकांची मनं जिंकताना पाहणं अत्यंत अभिमानास्पद आहे. पण त्याच वेळी, लोकांकडून तिला खाली खेचलं जाताना, लक्ष्य बनवताना आणि जे तिला नीट ओळखतही नाहीत, अशांकडून तिच्याबद्दल क्रूर भाषा वापरताना पाहणं फार दु:खदायक आहे,’ असं त्यांनी लिहिलं.

या पोस्टमध्ये ते पुढे म्हणाले, ‘तिच्याबद्दल प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना किंवा आरोप करणाऱ्यांना आमची एकच विनंती आहे की, कोणतीही मतं बनवण्यापूर्वी तिचा प्रवास पूर्ण होईपर्यंतची प्रतीक्षा करा. किमान एवढा तरी तिचा हक्क आहे. तुमचे रील्स, आरोप कदाचित लोकांचं लक्ष वेधून घेऊ शकतात, पण त्यामुळे काहींच्या मनावर आयुष्यभरासाठी जखमा होतात. आम्ही हात जोडून विनंती करतो की कृपया आम्हाला, तिच्या कुटुंबाला यापासून दूर ठेवा. आमच्यासाठी हा खूप कठीण काळ आहे. आम्ही कधीच याची कल्पना केली नव्हती की आमची मुलगी, जिला आम्ही खूप प्रेमाने वाढवलं, तिला इतक्या नकारात्मकतेचा सामना करावा लागेल. तिच्यासाठी वापरला जाणारा प्रत्येक कठोर शब्द आम्हालाही इतका त्रास देतो की त्याची कल्पना तुम्ही कधीच करू शकणार नाही.’

‘आम्ही फक्त आशा करतो की मानवता आणि दयाळूपणा कायम राहील. तोपर्यंत, आम्ही आमच्या तान्याच्या पाठिशी प्रेमाने आणि विश्वासाने उभं राहू. आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो. जसं आम्ही तुला वाढवलंय, तसं बॉससारखं खंबीर राहा,’ असा संदेश त्यांनी तान्यासाठी दिला आहे.

तान्या मित्तलच्या आईवडिलांकडून जारी केलेल्या या निवेदनावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात काहींनी तान्याला पाठिंबा दिला आहे, तिचं कौतुक केलं आहे. तर काहींनी तिच्या वागण्याला ‘फेक’ म्हणजेच खोटं म्हटलंय.

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.