AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरेंनी मराठी कलाकारांबाबत केलेल्या त्या वक्तव्यावर तेजस्विनी पंडितची पोस्ट व्हायरल, म्हणाली…

"मराठी कलाकारांनी ऑन स्टेज एकमेकांना टोपणनावाने बोलावणं योग्य वाटत नाही. तुम्हीच जर एकमेकांना मान दिला नाही तर मग पब्लिक तुम्हाला काय मान देणार? मी मागे एकदा अशोक सराफांच्या कार्यक्रमाला गेलो होतो, त्यांना मी सरच म्हणतो. ही सर म्हणण्यासारखीच माणसं आहेत," असं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेंनी मराठी कलाकारांबाबत केलेल्या त्या वक्तव्यावर तेजस्विनी पंडितची पोस्ट व्हायरल, म्हणाली...
Raj Thackeray and Tejaswini PanditImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 08, 2024 | 12:04 PM
Share

मुंबई : 8 जानेवारी 2024 | “मी जेव्हा इतर भाषेतील कलाकारांना भेटतो तेव्हा ते एकमेकांना खूप आदराने हाक मारतात. मात्र मराठी कलाकार एकमेकांसोबत त्या अदबीने वागताना दिसत नाही. तुम्ही जर एकमेकांना मान नाही दिला तर प्रेक्षक तुमचा मान कसा राखतील? त्यामुळे एकमेकांना मान द्या अन् दुसऱ्याचा मान ठेवा,” असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी कलाकारांना दिला. शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात त्यांची मुलाखत झाली. यावेळी ते बोलत होते. राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर आता अभिनेत्री तेजस्विनी पंडितची प्रतिक्रिया समोर आली आहे. राज ठाकरे यांच्या मुलाखतीचा हा व्हिडीओ इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर करत त्यावर तिने आपलं मत मांडलं आहे.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

“पूर्वीच्या काळी मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीत अनेक सुपरस्टार होते. मात्र आता केवळ कलाकार राहिलेले आहेत. मराठी कालाकार एकमेकांशी बोलताना टोपण नावाने किंवा शॉर्ट नावाने हाक मारतो. तुम्ही एकमेकांना मान दिला नाही तर प्रेक्षक तुम्हाला मान कसा देतील? एकमेकांना मान दिला तर मराठी रंगभूमीला चांगले दिवस येतील.” असं बोलताना त्यांनी दक्षिणेकडील सुपरस्टार रजनीकांत आणि ज्येष्ठ संगीतकार इलायराजा यांचं उदाहरण दिलं. दोघं सार्वजनिक ठिकाणी बोलताना एकमेकांना सर म्हणून संबोधतात असं राज ठाकरेंनी सांगितलं.

राज ठाकरेंच्या मुलाखतीचा व्हिडीओ शेअर करत तेजस्विनी पंडितने लिहिलं, ‘थेट, परखड आणि 100 टक्के बरोबर राजसाहेब!’ तेजस्विनीने राज ठाकरेंच्या वक्तव्याशी सहमती दर्शविली आहे. “कशासाठी ही आपुलकी? ही आपुलकी तुमच्या घरात ठेवा. लोकांसमोर येता तेव्हा एकमेकांना मान द्या. तरंच या सिनेसृष्टीला अर्थ आहे. साऊथमधील नवे लोक पाहा कसे नम्र बसतात. आपल्याकडे कुणीही येतं आणि खांद्यावर हात ठेऊन बसतं,” असंही राज ठाकरे म्हणाले.

शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात आज राज ठाकरे यांची ‘ नाटक आणि मी’ या विषयावर मुलाखत झाली, अभिनेते दीपक करंजीकर यांनी राज ठाकरे यांच्याशी संवाद साधला. यावेळी १०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर, नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे कार्याध्यक्ष राजेशकुमार साकला, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, सचिन इटकर आदि मान्यवर उपस्थित होते.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.