Aai Kuthe Kay Karte | अनिरुद्धला न सांगताच अरुंधती स्वीकारणार आशुतोषची ऑफर, आता नव्या वादाला सामोरं जाणार देशमुखांचं घर!

अरुंधतीच्या महाविद्यालयीन जीवनातील हा मित्र पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात आला आहे. यासोबतच मालिकेत एक नवा ट्वीस्ट पाहायला मिळतो आहे.

Aai Kuthe Kay Karte | अनिरुद्धला न सांगताच अरुंधती स्वीकारणार आशुतोषची ऑफर, आता नव्या वादाला सामोरं जाणार देशमुखांचं घर!
Aai Kuthe Kay Karte


मुंबई : छोट्या पडद्यावरची ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका प्रचंड गाजते आहे. मालिकेचं भावनिक कथानक आणि एका आईची गगनभरारी असा आशय घेऊन पुढे चाललेली ही मालिका प्रेक्षकांना देखील प्रचंड भावते आहे. मात्र, आता मालिकेत एक नवं वळण आलं आहे. घटस्फोट झाल्यानंतर आता आई अर्थात ‘अरुंधती’च्या आयुष्यात एका नव्या व्यक्तीची एन्ट्री झाली आहे. हा व्यक्ती आता अरुंधतीच्या स्वप्नांना नवं बळ देणार आहे.

अभिनेता ओंकार गोवर्धन याची या मालिकेत एन्ट्री झाली आहे. ओंकार या मालिकेत अरुंधतीचा मित्र ‘आशुतोष केळकर म्हणून दिसतो आहे. अरुंधतीच्या महाविद्यालयीन जीवनातील हा मित्र पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात आला आहे. यासोबतच मालिकेत एक नवा ट्वीस्ट पाहायला मिळतो आहे.

यशचा वाचवला जीव

मालिकेत यश देखील लंडनवरून परतला आहे. मात्र, यश मालिकेत परतल्यावर आता गौरी काहीकाळासाठी बाहेर गेली आहे. यानंतर यश गौरीवर रागवला आहे. रस्त्यावर वाद घालत चालत असताना यश एका गाडीच्यासमोर येतो. त्यावेळी नेमका तिथे उपस्थित असलेला आशुतोष यशचा जीव वाचवतो. यानंतर आशुतोष यशला त्याच्या घरी आणून सोडतो. तेव्हा, संजना त्याला घरी येऊन चहा घेण्याचा आग्रह करते. यावेळी तो अरुंधतीला त्याच्या नव्या म्युझिक अल्बममध्ये गाण्याची ऑफर देतो. अरुंधतीला दिलेली ही ऑफर ऐकताच संजनाने तिचा पाण उतारा करण्याचा प्रयत्न करते. मात्र, नेमक्यावेळी आशुतोषने मध्ये पडत त्यांची बोलती बंद करतो.

अरुंधती स्वीकारणार आशुतोषची ऑफर

आशुतोष निघून गेल्यानंतर अनिरुद्ध अरुंधतीला तू काय ठरवलं आहेस? असं विचारतो. मात्र, मी अजून विचार केला नाही म्हणत अरुंधती उत्तर देणं टाळते. तर, दुसरीकडे संजना घराचं डील करण्यासाठी अनिरुद्धला सोबत घेऊन आशुतोषच्या ऑफिसमध्ये पोहते. ते तिथे पोहचण्याच्या काही वेळानंतर अरुंधतीदेखील आशुतोषच्या ऑफिसमध्ये येत. यावेळी ती का आलीये, असा प्रश्न विचारताच आशुतोष म्हणतो, तिने माझी विनंती स्वीकार केली आहे. अरुंधती माझ्या अल्बममध्ये दोन गाणी गाणार आहे.

अनिरुद्धचा होणार संताप

घरातून निघताना अरुंधतीने उत्तर देणे टाळल्याने आणि इथे येऊन ऑफर स्वीकारल्याने अनिरुद्धचा चांगलाच जळफळात होणार आहे. त्यात भर म्हणजे, आशुतोषने अरुंधतीला गाण्याचे आगाऊ मानधन म्हणून एक लाख रुपये दिल्याने आता तिच्यावरील कर्जाचा बोजा देखील निघून जाणार आहे. यामुळे आता देशमुख कुटुंबात एक नवा वाद पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा :

सोनाली कुलकर्णी आणि भाऊ कदमांची जोडी, एकाहून एक धम्माल गाण्यांनी सज्ज ‘पांडू’  चित्रपटाचे संगीत प्रकाशित!

रुसवे-फुगवे, प्रेम आणि प्रेमातील तरलता, तरीही ललित प्रभाकर, गौतमी देशपांडे म्हणताहेत आम्ही ‘जस्ट फ्रेंड’!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI