Aai Kuthe Kay Karte | संजना आणि अरुंधती दोघींचीही होणार नवी सुरुवात, सांभाळू शकतील का नवीन जबाबदारी?

छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका सध्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करते आहे. मालिकेत सध्या अनेक घटना घडत आहेत. एकीकडे मालिकेत सण उत्सव साजरे केले जात आहेत, तर दुसरीकडे लवकरच स्त्री शक्तीचं नवं रूप प्रेक्षकांना दिसणार आहे.

Aai Kuthe Kay Karte | संजना आणि अरुंधती दोघींचीही होणार नवी सुरुवात, सांभाळू शकतील का नवीन जबाबदारी?
Aai Kuthe Kay karte

मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका सध्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करते आहे. मालिकेत सध्या अनेक घटना घडत आहेत. एकीकडे मालिकेत सण उत्सव साजरे केले जात आहेत, तर दुसरीकडे लवकरच स्त्री शक्तीचं नवं रूप प्रेक्षकांना दिसणार आहे. मालिकेच्या कथानकाने सध्या अतिशय रंजक वळण घेतलं आहे. संजनाने साम-दाम-दंड-भेद वापरून अनिरुद्धशी लग्न करून देशमुखांच्या घरात संसार थाटला आहे. यानंतर आता देशमुखांच्या कुटुंबाची सूत्र एकहाती घेण्यासाठी संजनाची धडपड सुरु आहे. मात्र, या सगळ्यात तिच्या नोकरीकडे तिचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे आता तिला देखील बेरोजगारीचा फटका सोसावा लागणार आहे.

तर दुसरीकडे नव्याने झेप घेऊ पाहणाऱ्या अरुंधतीला नोकरीचं बळ मिळणार आहे. आता संजनावर देशमुख कुटुंबाची जबाबदारी पडणार आहे, तर आरूढती या जबाबदारीतून मुक्त होऊन एका नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. आता या दोघींपैकी कोण आपली नवी जबाबदारी उत्तम पार पाडेल, याची उत्सुकता प्रेक्षकांना देखील आहे.

पाहा नवा प्रोमो :

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

मालिकेत दिसली स्त्रीशक्ती!

आपल्या विरुद्ध होणाऱ्या अन्यायाला घाबरून न जाता त्या विरोधात हिमतीने लढण्यासाठी अरुंधतीने संजनाला विश्वासाचं बळ दिलं. तर, आता आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडत संजना आणि अरुंधती मेहताला चांगलाच धडा शिकवला. मेहताचं खरं रूप जगासमोर आणण्यासाठी अरुंधती आणि देशमुख कुटुंब संजनाला साथ दिली. तर, यावेळी अरुंधतीला वाईटसाईट बोलून तिच्यावर हात उचलायला गेलेल्या मेहताला संजना जोरदार थप्पड लगावली आहे.

नेमकं काय झालं?

देशमुखांच्या घरात अनिरुद्धची नोकरी गेली आहे. तर, संजानाशी लग्न केल्यामुळे आता संजनाची देखील नोकरी गेली आहे. आपली नोकरी परत मिळवण्यासाठी संजना जीवाचा आटापिटा करत आहे. आपल्या कामाचा विचार व्हावा म्हणून कंपनीचा बॉस मेहता याला भेटायला गेलेल्या संजनाला एका वेगळ्याच प्रसंगाला समोर जावं लागतं. कामाच्या बदल्यात तू माझ्यासोबत कॉम्प्रोमाईज करावं अशी ऑफर मेहता संजनाला देतो. इतकेच नव्हे तर, तो तिच्यावर अनेक आरोप देखील करतो. या सगळ्याला घाबरून संजना घरी निघून येत. हा प्रकार अरुंधतीला कळल्यावर ती संजनाला मेहता विरोधात लढण्याचा सल्ला देते.

देशमुखांच्या घरात अनघाची एंट्री होणार!

अभिला माफ करत अनघाने पुन्हा एकदा अभिची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. आता लवकरच मालिकेत अभि आणि अनघा यांच्या लग्नाचा मोठा सोहळा दिसंरा आहे. इतकंच नव्हे तर, या लग्नाला घरातील सगळेच लोक उत्सुक आहेत. या आधी या जोडीचा साखर पुडा मोडला होता. अभिषेक आणि अनघाच्या साखरपुड्याची बातमी ऐकून संतापलेल्या अंकिताने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, साखरपुडा सुरु असतानाच ही घटना अंकिताच्या आईने अभिषेकला सांगितल्यामुले तो साखरपुडा सोडून थेट अंकिताकडे पोहोचला होता. तर, अभिची वाट बघत असलेल्या अनघाला मात्र तो थेट लग्नच करून आल्याने धक्का बसला. मात्र, अंकिता आत्महत्या करत असल्याने मला नाईलाजास्तव लग्न करावे लागल्याचे म्हटले होते.

हेही वाचा :

Anvita Phaltankar : ‘रिमझिम गिरे सावन…’, स्वीटू अर्थात अन्विता फलटणकरचं पावसात फोटोशूट

Gautami Deshpande : पाहा! गौतमी देशपांडेंचं निखळ खळखळतं हास्य अन् ब्रिटनच्या राणीसारखा लूक; चाहते म्हणतात…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI