Aai Kuthe Kay Karte | अभिच्या आयुष्यात अनघा पुन्हा परतणार? देशमुखांच्या कुटुंबात कोण घेणार अरुंधतीची जागा?

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 10, 2021 | 9:08 AM

लवकरच अभिषेकच्या आयुष्यात अनघा येणार आहे. अनघा परत आल्याने देशमुख कुटुंबाला एक भक्कम आधार मिळू शकणार आहे. अभिने केलेल्या चुकांमुळे दुखावलेली अनघा, अरुंधतीच्या माहेरी जाण्याने देशमुखांच्या काळजीत गर्क झाली आहे.

Aai Kuthe Kay Karte | अभिच्या आयुष्यात अनघा पुन्हा परतणार? देशमुखांच्या कुटुंबात कोण घेणार अरुंधतीची जागा?
अरुंधती-अनघा
Follow us

मुंबई : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत सध्या अतिशय दुःखद कथानक सुरु आहे. मालिकेत नुकताच अनिरुद्ध आणि अरुंधतीचा घटस्फोट दाखवण्यात आला आहे. यानंतर आता कथानकात पुढे काय घडणार याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान अभिषेकच्या आयुष्यात पुन्हा एकदा अनघाची एंट्री होण्याचे संकेत आहेत.

नुकत्याच एका सोशल मीडिया सेशनमध्ये या गोष्टीचा खुलासा झाला आहे. माहितीनुसार लवकरच अभिषेकच्या आयुष्यात अनघा येणार आहे. अनघा परत आल्याने देशमुख कुटुंबाला एक भक्कम आधार मिळू शकणार आहे. अभिने केलेल्या चुकांमुळे दुखावलेली अनघा, अरुंधतीच्या माहेरी जाण्याने देशमुखांच्या काळजीत गर्क झाली आहे.

अंकिताशी लग्न करत अभिने दिला धोका!

अभिच्या साखरपुड्याच्या निमित्ताने देशमुख कुटुंब गावातील घरी राहायला गेले होते. आधी देशमुखांच्या घरात संजना येऊन धडकली असताना, नंतर अंकिताच्या रुपाने नवीन वादळ धडकलं होतं. अभि-अनघाचं लग्न मोडत अंकिताने अभिषेकला आपल्याशी लग्न करायला भाग पाडलं होतं. या दरम्यान गायब झालेली अनघा पुन्हा एकदा मालिकेत दिसली आहे.

अभिषेक आणि अनघाच्या साखरपुड्याची बातमी ऐकून संतापलेल्या अंकिताने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, साखरपुडा सुरु असतानाच ही घटना अंकिताच्या आईने अभिषेकला सांगितल्यामुले तो साखरपुडा सोडून थेट अंकिताकडे पोहोचला होता. तर, अभिची वाट बघत असलेल्या अनघाला मात्र तो थेट लग्नच करून आल्याने धक्का बसला. मात्र, अंकिता आत्महत्या करत असल्याने मला नाईलाजास्तव लग्न करावे लागल्याचे म्हटले होते.

अंकिताचा बनाव उघड

देशमुख कुटुंबासमोर अंकिताचा बनव उघड झाल्याने आता तिची देशमुखांच्या घरातून हकालपट्टी झाली आहे. त्यामुळे अभिषेकच्या आयुष्यातील हे अंकिता नावाचं वादळ आता पूर्णपणे शमलं आहे. त्यामुळे आता अभिषेक पुन्हा एकदा अनघाची समजूत घालण्याचा प्रयत्न करणार आहे. यानंतर आता अनघा नक्की काय निर्णय घेणार, याबद्दल प्रेक्षकांमध्येही कमालीची उत्सुकता आहे. एकीकडे अरुंधती घर सोडून गेल्याने आता अनघाने तरी देशमुख घरात येऊन अरुंधतीची उणीव भरून काढावी, अशी प्रेक्षकांची इच्छा आहे.

अरुंधतीचा लूक बदलणार?

मालिकेत एकीकडे अनिरुद्ध-अरुंधतीचा घटस्फोट दाखवला जात आहे, तर दुसरीकडे ‘अरुंधती’ साकारणाऱ्या मधुराणी प्रभुलकर हिने सोशल मीडियावर नवा लूक शेअर केला आहे. या लूकमध्ये मधुराणी अतिशय शॉर्ट केसांसह नव्या लूकमध्ये दिसली आहे. या फोटोंमुळे सोशल मीडियावर अरुंधतीच्या बदलत्या लूकची चर्चा होत आहे.

(Aai Kuthe Kay Karte update Angha will forgive Abhishek Deshmukh and will marry him soon)

हेही वाचा :

अद्वैत दादरकर म्हणतोय ‘सोहम कुलकर्णी मला तुझी आठवण येईल…’, ‘अग्गंबाई सूनबाई’ अल्पावधीतच प्रेक्षकांचा निरोप घेणार!

‘कमिंग बॅक होम वाली फीलिंग’, ‘फुलपाखरू’ फेम हृता दुर्गुळेचं पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन!

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI