कोरोनाशी झुंज यशस्वी, तब्बल 55 दिवसांनी अभिनेता अनिरुद्ध दवे घरी परतला!

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता अनिरुद्ध दवे (Anirudh Dave) कोरोनाची लागण झाल्यामुळे गेले कित्येक दिवस रुग्णालयात दाखल होत. सुरुवातीला त्यांची प्रकृती खूप गंभीर झाली होती, त्याला व्हेंटीलेटरवर देखील ठेवण्यात आले होते. परंतु, नंतर हळूहळू त्याची तब्येत सुधारली. आता तब्बल 55 दिवसानंतर अनिरुद्धला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोनाशी झुंज यशस्वी, तब्बल 55 दिवसांनी अभिनेता अनिरुद्ध दवे घरी परतला!
अनिरुद्ध दवे

मुंबई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेता अनिरुद्ध दवे (Anirudh Dave) कोरोनाची लागण झाल्यामुळे गेले कित्येक दिवस रुग्णालयात दाखल होत. सुरुवातीला त्यांची प्रकृती खूप गंभीर झाली होती, त्याला व्हेंटीलेटरवर देखील ठेवण्यात आले होते. परंतु, नंतर हळूहळू त्याची तब्येत सुधारली. आता तब्बल 55 दिवसानंतर अनिरुद्धला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अनिरुद्धने रुग्णालयाबाहेर उभे राहत डॉक्टर आणि कर्मचारी सदस्यांसोबतचे फोटो शेअर करून सर्वांचे आभार मानले आहेत (Actor Anirudh Dave gets discharge from hospital after 55 days).

अभिनेत्याने लिहिले की, ‘किती चांगला क्षण आहे, 55 दिवसानंतर मला चिरायू हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले आहे. आपल्या सर्वांच्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद. ऑक्सिजन नाही, आता मी स्वत: श्वास घेत आहे. जिंदगी मी पुन्हा येतोय..’ अनिरुद्धला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यामुळे त्याचे चाहते खूप आनंदित झाले आहेत. अभिनेत्याचे चाहते त्याच्या आरोग्यासाठी दीर्घकाळ प्रार्थना करत होते.

पाहा अनिरुद्धची पोस्ट :

काही दिवसांपूर्वी अनिरुद्धने म्हटले होते की, तो लवकरच घरी येणार आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले होते की, ‘अवघ्या काही दिवसानंतर लवकरच मला सोडण्यात येईल आणि मी परत माझ्या घरी परत जाईन’.

पत्नीने दिली साथ

अनिरुद्धच्या या कठीण काळात पत्नीने पूर्ण सहकार्य केले. अनिरुद्धने आपल्या पत्नीसाठी एक खास पोस्ट लिहिले आणि म्हटले की, ‘मी 30 पर्यंत सगळी आशा सोडली होती आणि जेव्हा तू 1, 2 रोजी मला भेटायला आलीस, पण त्यावेळी मी कोणालाही ओळखू शकलो नाही. परंतु, तिथल्या एकाने सांगितले की तू आयसीयूमध्ये मला भेटायला आलेलीस. मी फक्त हाच विचार करत राहिलो की, लसीकरण न करताही तू मला भेटायला आलीस, तेही आपल्या बाळाला सोडून. जेव्हा डॉक्टर म्हणाले की, परिस्थिती गंभीर आहे, तेव्हा तू आणि आपल्या मुलाने मला धैर्य दिले.’

त्याने म्हटले, सुभीने त्याला असे सांगितले की, ‘तू लवकर बरे हो आणि आपल्या मुलाला पोहणे, स्केटिंग आणि घोडेस्वारी शिकव.’

अनिरुद्धने ‘लव्ह स्टोरी’ आणि ‘पटियाला बेब्ज’ या शोमध्ये काम केले आहे आणि त्याचे काम प्रेक्षकांना खूप आवडले आहे. इतकेच नव्हे तर, आता अनिरुद्ध अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’ या चित्रपटातही झळकणार आहे.

(Actor Anirudh Dave gets discharge from hospital after 55 days)

हेही वाचा :

Devmanus | सरू आजी अंध नाही?, अजितकुमार आणणार सरू आजीचं सत्य सगळ्यांसमोर!

Shah Rukh Khan | बॉलिवूड कारकिर्दीला 30 वर्ष पूर्ण, शाहरुख खान चाहत्यांसाठी शेअर केली भावूक पोस्ट!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI