Devmanus | सरू आजी अंध नाही?, अजितकुमार आणणार सरू आजीचं सत्य सगळ्यांसमोर!

झी मराठीवरील 'देवमाणूस' (Devmanus) या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला नेली आहे. एसीपी दिव्याने भर लग्नमंडपातून अजितला अटक करत, त्याला फरफटत पोलीस ठाण्याच्या दिशेने वरात काढली होती. दिव्याने अशा पद्धतीने अटक केल्याने अजित भलताच संतप्त झालाय.

Devmanus | सरू आजी अंध नाही?, अजितकुमार आणणार सरू आजीचं सत्य सगळ्यांसमोर!
सरू आजी
Follow us
| Updated on: Jun 25, 2021 | 1:17 PM

मुंबई : झी मराठीवरील ‘देवमाणूस’ (Devmanus) या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला नेली आहे. एसीपी दिव्याने भर लग्नमंडपातून अजितला अटक करत, त्याला फरफटत पोलीस ठाण्याच्या दिशेने वरात काढली होती. दिव्याने अशा पद्धतीने अटक केल्याने अजित भलताच संतप्त झाला. आपली झालेली नाचक्की आणि अपमान तो सहन करू शकला नाही. या अटकेनंतर झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी अजितच्या डोक्यात नवी समीकरण शिजू लागली आहेत (Devmanus Latest Update Saru Aaji is not blind Devi singh will prove that in court).

सध्या मालिकेत डॉक्टर अजितकुमार देव याची कोर्टात केस चालू आहे आणि सरकारी वकील आर्या यांच्या विरुद्ध अजित स्वतःची केस स्वतः लढतोय. खूप चतुराईने अजित सगळ्यांची साक्ष घेऊन आपण कसे निर्दोष आहोत हे सिद्ध करण्यात कुठेतरी यशस्वी होताना दिसतोय.

सरू आजी अंध नाही?

या मालिकेत सुरुवातीपासून सगळ्यांना पडलेला मोठा प्रश्न म्हणजे सरू आजींना नक्की दिसतं कि नाही? आता आगामी भागात अजितकुमार सरू आजींची साक्ष घेणार आहे आणि यात तो सिद्ध करणार आहे कि सरू आजी अंध नसून त्यांना सर्व काही स्पष्ट दिसतं. सरू आजींना दिसतं हे सिद्ध झाल्यावर त्यांची साक्ष कोर्टात ग्राह्य धरली जाईल का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

तपासात आणखी नवा व्यक्ती येणार!

तसंच आता मालिकेत एसीपी दिव्या सिंग हिच्या हाताखाली नवीन पोलिस अधिकारी इन्स्पेक्टर शिंदे देखील या केसमध्ये लक्ष घालणार आहेत. त्यामुळे आता एसीपी दिव्या, इन्स्पेक्टर शिंदे आणि ऍडव्होकेट आर्या हे तिघे मिळून अजितकुमारला फासावर लटकवण्यात यशस्वी होतील का हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

आर्या देशमुखची एंट्री!

मालिकेत देवीसिंगला तुरुगांत धाडण्यासाठी सरकारी वकिल म्हणून आर्या देशमुख हिची मालिकेत एन्ट्री झाली आहे. ‘वैजू नं 1’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी सोनाली पाटील आता देवमाणूस या मालिकेत काय करणार या सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. सध्या आर्या सरकारी वकील असल्याचं दिसतय. सोनाली पाटीलनं सोशल मीडियावरही काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना याबद्दल माहिती दिली आहे. तिनं कॅप्शनमध्ये म्हटलंय, ‘मी येतेय पुन्हा एका नव्या रूपात…’

कोण आहे सोनाली पाटील?

सोनाली पाटील ही मुळची कोल्हापूरची आहे. महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर तिनं कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम केलं. ते करत असतानाच सोनालीला ‘जुळता जुळता जुळतंय की’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली आणि तिचा अभिनय क्षेत्रातील प्रवास सुरु झाला. त्यानंतर ती ‘घाडगे अँड सून’, ‘देव पावला’ अशा मालिकांमध्ये झळकली. घाडगे अँड सून मालिकेचं शूट संपताच तिचं ‘वैजू नं 1’ मालिकेसाठी सिलेक्शन झालं. शिवाय सोनालीचा टिकटॉकवरही मोठा चाहता वर्ग होता. तिच्या व्हिडीओंना चाहत्यांची खास पसंती मिळते.

(Devmanus Latest Update Saru Aaji is not blind Devi singh will prove that in court)

हेही वाचा :

Love story | नेहमीच हीना खानचा आधार बनला बॉयफ्रेंड रॉकी जयस्वाल, नॅशनल टीव्हीवर केलं प्रपोज!

Throwback | ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलंत का? कारकीर्दीच्या पहिल्या फोटोशूटमधील फोटो पाहून चाहतेही अवाक्!

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.