Devmanus : देवमाणसाला शिक्षा द्यायला नव्या ‘मॅडम’ची एन्ट्री, पाहा कोण आहे ‘ही’ अभिनेत्री

अशात आता देवीसिंगला तुरुगांत धाडण्यासाठी सरकारी वकिल म्हणून आर्या देशमुख हिची मालिकेत एन्ट्री झाली आहे. (New Character's entry to punish Devmanus, see who is 'this' actress)

Devmanus : देवमाणसाला शिक्षा द्यायला नव्या 'मॅडम'ची एन्ट्री, पाहा कोण आहे 'ही' अभिनेत्री

मुंबई : एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते मात्र त्याचा खरा चेहरा वेगळाच असतो. चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी ‘देवमाणूस’ ही मालिका झी मराठीवर आली, आणि अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. ‘देवमाणूस’ (Devmanus) ही मालिका सध्या चर्चेचा विषय होतेय. कारण, या मालिकेतील अनेक पात्र प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालतायत.

अशात आता मालिकेत देवीसिंगला तुरुगांत धाडण्यासाठी सरकारी वकिल म्हणून आर्या देशमुख हिची मालिकेत एन्ट्री झाली आहे. ‘वैजू नं 1’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी सोनाली पाटील आता देवमाणूस या मालिकेत काय करणार या सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. सध्या आर्या सरकारी वकील असल्याचं दिसतय.

एवढंच नाही तर सोनाली पाटीलनं सोशल मीडियावरही काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना याबद्दल माहिती दिली आहे. तिनं कॅप्शनमध्ये म्हटलंय, ‘मी येतेय पुन्हा एका नव्या रूपात…’

पाहा पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonali Patil (@sonalipatil_official)

कोण आहे सोनाली पाटील

सोनाली पाटील ही मुळची कोल्हापूरची आहे. महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर तिनं कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम केलं. ते करत असतानाच सोनालीला ‘जुळता जुळता जुळतंय की’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली आणि तिचा अभिनय क्षेत्रातील प्रवास सुरु झाला. त्यानंतर ती ‘घाडगे अँड सून’, ‘देव पावला’ अशा मालिकांमध्ये झळकली. घाडगे अँड सून मालिकेचं शूट संपताच तिचं ‘वैजू नं 1’ मालिकेसाठी सिलेक्शन झालं. शिवाय सोनालीचा टिकटॉकवरही मोठा चाहता वर्ग होता. तिच्या व्हिडीओंना चाहत्यांची खास पसंती मिळते.

संबंधित बातम्या

Photo : नोरा फतेहीचं अनोख्या कपड्यांमध्ये फोटोशूट, चाहते म्हणाले रणवीर सिंगला सोडलं मागे…

Photo : ‘मिलियन डॉलर व्हेगन’ संस्थेने भारतातील गरजूंची भूक भागवली, सनी लिओनीचा विशेष सहभाग

Sonali Bendre: वेळ लवकर निघून जाते… ‘कॅन्सर सर्व्हायव्हर्स डे’ निमित्त सोनाली बेंद्रेची काळजाला हात घालणारी पोस्ट

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI