AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shah Rukh Khan | बॉलिवूड कारकिर्दीला 30 वर्ष पूर्ण, शाहरुख खान चाहत्यांसाठी शेअर केली भावूक पोस्ट!

25 जून 1992 रोजी शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने ‘दीवाना’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात शाहरुखबरोबर ऋषी कपूर (Rishi Kapoor) आणि दिव्या भारती (Divya Bharti) मुख्य भूमिकेत होते. टीव्हीमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवल्यानंतर शाहरुखने या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाऊल ठेवले होते.

Shah Rukh Khan | बॉलिवूड कारकिर्दीला 30 वर्ष पूर्ण, शाहरुख खान चाहत्यांसाठी शेअर केली भावूक पोस्ट!
शाहरुख खान
| Edited By: | Updated on: Jun 25, 2021 | 12:00 PM
Share

मुंबई : 25 जून 1992 रोजी शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने ‘दीवाना’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात शाहरुखबरोबर ऋषी कपूर (Rishi Kapoor) आणि दिव्या भारती (Divya Bharti) मुख्य भूमिकेत होते. टीव्हीमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवल्यानंतर शाहरुखने या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाऊल ठेवले. त्याचा ‘दीवाना’ चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटानंतर शाहरुखने केलेले अद्भुत काम आजतागायत सुरूच आहे. शाहरुखला आज बॉलिवूडचा ‘बादशहा’ म्हटले जाते. बॉलिवूडमध्ये 30 वर्षे पूर्ण झाल्यानंतर, आता शाहरुख खानने आपल्या चाहत्यांसाठी एक खास संदेश लिहिला होता (Shah Rukh Khan completes 30 glorious years in Bollywood industry).

शाहरुखने लिहिले की, ‘तुम्हाला तुमचे प्रेम 30 वर्षांपासून मिळत आहे आणि आजही तुमचे ही प्रेम अबाधित आहे. माझ्या आयुष्याच्या अर्ध्याहून अधिक काळ मी तुम्हा सर्वांचे मनोरंजन केले आहे, हे आज लक्षात आले. मी वेळात वेळ काढून सर्वांचे आभार मानणार आहे. तुम्हा सर्वांच्या प्रेमाची खूप गरज आहे…’

पाहा शाहरुख खानची पोस्ट

शाहरुख खान शेवट 2018मध्ये ‘झिरो’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात शाहरुखसोबत अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत होत्या. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. यानंतर शाहरुखने ब्रेक घेतला. आता शाहरुख ‘पठाण’ या चित्रपटात दिसणार आहे.

शाहरुख लवकरच ‘पठाण’मधून आपला पहिला लूक शेअर करणार आहे. या चित्रपटामध्ये शाहरुखसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम दिसणार आहेत. शाहरुखला बर्‍याच दिवसांपासून मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. जॉन अब्राहम त्यात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याने, शाहरुख जॉनबरोबर या चित्रपटात भिडताना दिसणार आहे.

तसे, जॉन आणि शाहरुख या चित्रपटाद्वारे प्रथमच एकत्र काम करत आहेत. त्याचबरोबर दीपिका आणि शाहरुखने यापूर्वीही काम केले आहे. याशिवाय या चित्रपटात सलमान खानचा एक कॅमिओ देखील आहे.

लवकरच सुरू होईल शूटिंग

‘पठाण’चे शूटिंग यापूर्वी सुरू झाले होते, पण कोरोना लॉकडाऊन आणि वाढत्या कोरोना संसर्गामुळे शूटिंग थांबवण्यात आले. पण, आता अशी बातमी येत आहे की, लवकरच शाहरुख या चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, चित्रपटाची टीम बायो बबलमध्ये शूट करणार आहे आणि केवळ त्या लोकांनाच चित्रपटाच्या सेट्सवर लस देण्यात आली आहे. दहा दिवसांच्या वेळापत्रकांचे शूटिंग मुंबईत पूर्ण होणार आहे. तथापि, अद्याप चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय वेळापत्रकांविषयी माहिती समोर आलेली नाही.

(Shah Rukh Khan completes 30 glorious years in Bollywood industry)

हेही वाचा :

Happy Birthday Karisma Kapoor | ‘बच्चन’ घराण्याची सून बनणार होती करिश्मा कपूर, ‘या’ कारणामुळे तुटला अभिषेकसोबतचा साखरपुडा!

Birthday Special : ‘बहु हमारी रजनीकांत’ फेम रिधिमा पंडितचा हॉट अवतार, पाहा फोटो

राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.
भाजपात नाराजी, कुणाला डावललं तर कुणाचं तिकीट कापल्यानं डोळ्यात पाणी
भाजपात नाराजी, कुणाला डावललं तर कुणाचं तिकीट कापल्यानं डोळ्यात पाणी.
भाजपात AB फॉर्मवरून नाराजी, कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्षांचा पाठलाग
भाजपात AB फॉर्मवरून नाराजी, कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्षांचा पाठलाग.
भाजपचे प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर निवडणुकीच्या रिंगणात
भाजपचे प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर निवडणुकीच्या रिंगणात.
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.