50 व्या वर्षी अपूर्व अग्निहोत्री झाला बाप, लग्नाच्या 18 वर्षांनंतर घरी आली नन्ही परी…

शितल मुंडे, Tv9 मराठी

Updated on: Dec 03, 2022 | 4:40 PM

अपूर्व आणि शिल्पा यांच्या लग्नानंतर 18 वर्षांनी त्यांच्या घरात पाळणा हलला.

 50 व्या वर्षी अपूर्व अग्निहोत्री झाला बाप, लग्नाच्या 18 वर्षांनंतर घरी आली नन्ही परी...

मुंबई : अभिनेता अपूर्व अग्निहोत्री आणि अभिनेत्री शिल्पा सकलानी यांच्या घरी नुकताच नन्ही परीने जन्म घेतलाय. अपूर्व आणि शिल्पा यांच्या लग्नानंतर 18 वर्षांनी त्यांच्या घरात पाळणा हलला. मुलीच्या जन्मानंतर अपूर्व आणि शिल्पा दोघेही खूप आनंदात आहेत. यापूर्वी पडद्यावरील या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडलीये. अपूर्व अग्निहोत्री वयाच्या 50 व्या वर्षी बाप झालाय, ही बातमी चाहत्यांसोबत शेअर करताना अपूर्वने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केलाय.

अपूर्व आणि शिल्पा यांचे लग्न 2004 मध्ये झाले होते. 18 वर्षांनंतर यांच्या घरी मुलीचे आगमन झाले आहे. अपूर्व याने अनेक मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. तर शिल्पा बिग बाॅसमध्येही सहभागी झाली होती.

अपूर्व अग्निहोत्री याने सोशल मीडियावर खास व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांना मुलगी झाल्याचे सांगितले आहे. या व्हिडीओमध्ये अपूर्व, शिल्पा आणि त्यांची मुलगी दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

या व्हिडीओमध्ये अपूर्व अग्निहोत्री याने आपल्या मुलीला घेतलेले दिसत आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ शेअर करताना त्याने आपल्या मुलीच्या नावाची घोषणा देखील केलीये. या व्हिडीओला खूप सारे प्रेम आणि आर्शिवाद द्या, असेही अपूर्वने म्हटले आहे.

शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये अपूर्व आणि शिल्पाने मुलीसोबत वेगवेगळ्या पोज देखील दिल्या आहेत. अपूर्वच्या या व्हिडीओवर अनेक कलाकारांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI