AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: ‘चला हवा येऊ द्या’मध्ये रंगणार अशोक मामांच्या 50 वर्षांच्या कारकिर्दीचा सदाबहार सोहळा

अशोक सराफ यांचा 4 जून रोजी वाढदिवसदेखील असतो आणि या महान विनोदवीराने आपल्या अभिनय क्षेत्रातील अफाट योगदानाने प्रेक्षकांचं पाच दशकं मनोरंजन केलं. त्यामुळे चला हवा येऊ द्याच्या मंचावर हा दिवस सोहळा म्हणून साजरा केला जाणार आहे.

Video: 'चला हवा येऊ द्या'मध्ये रंगणार अशोक मामांच्या 50 वर्षांच्या कारकिर्दीचा सदाबहार सोहळा
Ashok Saraf special episodeImage Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: May 30, 2022 | 6:01 PM
Share
कसे आहात मंडळी, मजेत ना? आणि हसताय ना? असं आपुलकीने विचारत वर्षानुवर्षे प्रेक्षकांचा अविरत आणि सातत्याने भरभरून मनोरंजन करणारी टीम म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya). डॉक्टर निलेश साबळे, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, सागर कारंडे, कुशल बद्रिके हे सहा अवलिया इतर कलाकारांसोबत अनेक विनोदी स्किट सादर करत आज पर्यंत प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनले आहेत. या मंचावर प्रेक्षकांचे आवडते कलाकार देखील हास्याचा डोस अनुभवण्यासाठी सज्ज होतात. या आठवड्यात अशोक सराफ (Ashok Saraf) आणि त्यांच्यासोबत काम केलेले सिनेसृष्टीतील त्यांचे सहकलाकार या मंचावर सज्ज होणार आहेत. निमित्त आहे अशोक मामांच्या ५० वर्षांच्या कारकिर्दीचा सोहळा.
अशोक सराफ यांचा 4 जून रोजी वाढदिवसदेखील असतो आणि या महान विनोदवीराने आपल्या अभिनय क्षेत्रातील अफाट योगदानाने प्रेक्षकांचं पाच दशकं मनोरंजन केलं. त्यामुळे चला हवा येऊ द्याच्या मंचावर हा दिवस सोहळा म्हणून साजरा केला जाणार आहे. अशोक मामा यांच्यासोबत त्यांच्या पत्नी  निवेदिता सराफ, आणि त्यांच्यासोबत मोठा पडदा गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजेच किशोरी शहाणे, प्रिया बेर्डे, अलका कुबल, निशिगंधा वाड या देखील उपस्थित होत्या.

पहा प्रोमो-

या कलाकारांच्या उपस्थितीत चला हवा येऊ द्याच्या विनोदवीरांनी कल्ला केला आणि अशोक मामांच्या चित्रपटावर आधारित एक प्रहसन सादर करून सगळ्यांना लोटपोट केलं. ही धमाल मजा मस्ती प्रेक्षकांना आज आणि उद्या रात्री 9.30 वाजता झी मराठी वाहिनीवर पहायला मिळेल.

Follow Us
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला;
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला; म्हणाले, 'वातावरण खराब होऊ नये...
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
Ratnagiri Ganeshotsav | हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
Rajapur | राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला; अपघातात 8 ते 10 जण गंभीर जखमी, नेमकं घडलं काय?
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी...
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी प्रकरणात एकाला अटक
भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
Bhopal | भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन
संजय गायकवाड अडचणीत! महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी...
Sanjay Gaikwad | आमदार संजय गायकवाड अडचणीत! श्वेता महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बुलढाणा पोलिसांत गुन्हा दाखल