AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 16 | प्रियंका चाैधरी आणि अर्चना गाैतम यांना शिव ठाकरे, एमसी स्टॅनला टार्गेट करणे पडले महागात

बिग बाॅस १६ मधून आता टीना दत्ता बेघर झालीये. फिनालेला काही दिवस शिल्लक असताना टीना दत्ता बिग बाॅसच्या घराबाहेर पडल्याने तिच्या चाहत्यांमध्ये निराशा बघायला मिळत आहे.

Bigg Boss 16 | प्रियंका चाैधरी आणि अर्चना गाैतम यांना शिव ठाकरे, एमसी स्टॅनला टार्गेट करणे पडले महागात
| Updated on: Jan 29, 2023 | 5:56 PM
Share

मुंबई : बिग बाॅस १६ मध्ये मोठा हंगामा होताना दिसत आहे. फिनाले विक जवळ आल्याने बिग बाॅसच्या (Bigg Boss 16)  घरातील सदस्यांमध्ये एक स्पर्धा बघायला मिळत आहे. विकेंडच्या वारमध्ये या आठवड्यात सलमान खान याच्याऐवजी फराह खान दिसली. फराह खान हिने देखील घरातील सदस्यांचा चांगला क्लास लावला. यावेळी फराह खान (Farah Khan) हिच्या निशाण्यार टीना दत्ता होती. टीना दत्ता आणि प्रियंका चाैधरी यांनी मागील आठवड्यामध्ये शालिन भनोट याला टार्गेट करत अनेक गोष्टी सुनावल्या होत्या. विशेष म्हणजे या दरम्यान शालिन भनोट याची तब्येत खराब होती. बिग बाॅस १६ मधून आता टीना दत्ता बेघर झालीये. फिनालेला काही दिवस शिल्लक असताना टीना दत्ता बिग बाॅसच्या घराबाहेर पडल्याने तिच्या चाहत्यांमध्ये निराशा बघायला मिळत आहे.

टीना दत्ता, प्रियंका चाैधरी आणि अर्चना गाैतम यांचा एक ग्रुप होता. मात्र, आता यामधून टीना बेघर झाल्याने प्रियंका आणि अर्चना काय धमाल करतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे. कारण नसताना देखील अनेकदा अर्चना घरातील सदस्यांसोबत भांडणे करताना दिसते.

नुकताच सोशल मीडियावर एक प्रोमो व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये प्रियंका चाैधरी, अर्चना गाैतम, शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन यांच्यामध्ये जोरदार भांडणे होताना दिसत आहेत.

टीना दत्ता ही बिग बाॅसच्या घराबाहेर पडल्यानंतर प्रियंका चाैधरी आणि अर्चना गाैतम या एमसी स्टॅन आणि शिव ठाकरेला टार्गेट करत अनेक गोष्टी सुनावतात. यामुळे यांच्यामध्ये भांडणास सुरूवात होते.

या भांडणामध्ये प्रियंका चाैधरी काहीतरी अपशब्द बोलते, जे ऐकून शिव ठाकरे याचा पारा चढतो आणि तो प्रियंकाला काय म्हटले…काय म्हटले हे विचारण्यास जातो…हे प्रोमोमध्ये दिसत आहे.

शिव ठाकरे याला सुरूवातीपासूनच प्रियंका चाैधरी ही टार्गेट करते. आता अर्चना गाैतम हिच्या निशाण्यावर एमसी स्टॅन हा आहे. आता पुढील काही दिवस बिग बाॅसच्या घरात का धमाका होतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?