Bigg Boss Marathi 3 | एकटं फिरण्यावरही बंधन येणार, ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘जोडी की बेडी’चा नवा खेळ रंगणार!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 27, 2021 | 4:18 PM

पहिल्याच आठवड्याच्या दिवशी महेश मांजेरकर यांनी स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली. ‘बा’च्या चावडीवर स्पर्धकांना शब्दांचा चांगलाच मार खावा लागला. मात्र, पहिल्याच आठवड्यातील एलिमिनेशन रद्द झाल्याने स्पर्धक देखील आनंदी झाले.

Bigg Boss Marathi 3 | एकटं फिरण्यावरही बंधन येणार, ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘जोडी की बेडी’चा नवा खेळ रंगणार!
Bigg Boss Marathi
Follow us

मुंबई : बहुचर्चित ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi 3) तिसऱ्या पर्वाची सुरुवात झाली आहे. आपल्या खास शैलीत ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्यांची शाळा घेणारे दिग्गज अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकरच यंदाही सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसत आहेत. ‘कलर्स मराठी’वरील या धमाकेदार रिअॅलिटी शोचे शानदार प्रोमो प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतले होते. आता या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. यावेळी घरात पहिल्याच दिवसापासून वाद पाहायला मिळत आहेत. नुकताच या घरात स्पर्धकांचा पहिला आठवडा पार पडला.

पहिल्याच आठवड्याच्या दिवशी महेश मांजेरकर यांनी स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली. ‘बा’च्या चावडीवर स्पर्धकांना शब्दांचा चांगलाच मार खावा लागला. मात्र, पहिल्याच आठवड्यातील एलिमिनेशन रद्द झाल्याने स्पर्धक देखील आनंदी झाले. पण, आता या आनंदावर लवकरच विरजण पडणार असं दिसतंय. याला कारणीभूत ठरणार आहे येत्या आठवड्यातील नवा टास्क. ‘जोडी की बेडी’ असं या नव्या टास्कचं नाव असणार आहे.

पाहा प्रोमो :

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi Official Page (@colorsmarathiofficial)

या प्रोमोत दिसत आहे की, आता स्पर्धकांना चक्क या घरात एकटं फिरता देखील येणार नाहीये. येत्या आठवड्यातील हा कठीण टास्क संपूर्ण आठवडाभर चालणार आहे. यामुळेच आता स्पर्धकांना एकटं नाही तर, ‘बिग बॉस’ने निवडून दिलेल्या जोडीदारासोबतच घरात वावरावं लागणार आहे. यामुळे आता त्यांची जोडी नेमकी कोणासोबत बांधली जातेय आणि या खेळात नेमकं काय काय आव्हान असणार आहे, या विचाराने स्पर्धक देखील चिंतेत पाडलेल आहेत.

‘महिला, महिला आणि भांडायला पहिला…’

बिग बॉस आणि वाद हे तसं नवं समीकरण नाही. यावेळी ‘बिग बॉस मराठी 3’च्या घरात सामाजिक कार्यकर्त्या आणि स्पर्धक तृप्ती देसाई, अभिनेत्री सोनाली पाटील हिला ‘माझ्याशी असं बोलायचं नाही, नीट बोलायचं’, असं चढ्या आवाजात म्हणताना दिसल्या. यानंतर सोनाली देखील त्यांच्याशी भांडताना दिसली. यावेळी तिने ‘महिला’ हा विषय उचलून धरला होता. या महिलांच्या हक्कांसाठी भांडतात आणि इथे महिलांवरच कुरघोडी करतात अशा आशयाचे बोल बोलत ‘महिला, महिला, महिला आणि भांडायला पहिला…’ असा खोचक टोला तृप्ती देसाई यांना लगावला.

मराठी मनोरंजन विश्वातील 15 चर्चित नाव या घरात नांदणार आहेत. विशाल निकम, उत्कर्ष शिंदे, संतोष चौधरी, विकास पाटील, अविष्कार दारव्हेकर, मीरा जगन्नाथ, मीनल शाह, तृप्ती देसाई, गायत्री दातार, स्नेहा वाघ, जय दुधाने, सुरेखा कुडची, शिवलीला पाटील, सोनाली पाटील, अक्षय वाघमारे यांनी यंदा घरात प्रवेश केला आहे.

हेही वाचा :

Shruti Marathe : श्रुती मराठेच्या ‘गोड गोजिरी अदा….’, फोटो पाहून तुम्ही देखील व्हाल फिदा!

Milind Soman | तब्बल 26 वर्षानंतर मिलिंद सोमण पुन्हा रॅम्प अवतरला, अभिनेत्याच्या लूक पाहून मलायका झाली अवाक्!

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI