Bigg Boss OTT | सलमान खानच्या शोमध्ये रंगणार धमाल, टीव्ही विश्वातील प्रसिद्ध ‘बहू’ बनणार ‘बिग बॉस’चा हिस्सा!

‘बिग बॉस’ हा लोकप्रिय रिअॅलिटी शो नवीन सीझनसह परत येणार आहे. प्रेक्षक या शोची आतुरतेने वाट पाहत आहेत. यावेळी ‘बिग बॉस’ खूप खास असणार आहे.

Bigg Boss OTT | सलमान खानच्या शोमध्ये रंगणार धमाल, टीव्ही विश्वातील प्रसिद्ध ‘बहू’ बनणार ‘बिग बॉस’चा हिस्सा!
Bigg Boss OTT

मुंबई : ‘बिग बॉस’ हा लोकप्रिय रिअॅलिटी शो नवीन सीझनसह परत येणार आहे. प्रेक्षक या शोची आतुरतेने वाट पाहत आहेत. यावेळी ‘बिग बॉस’ खूप खास असणार आहे. यावेळी बिग बॉसचा प्रीमियर टीव्हीसह ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील होणार आहे. हा शो पहिल्या 6 आठवड्यांसाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवला जाईल. ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये सहभागी झालेल्या अनेक सेलेबल्सची नावे पुढे येत आहेत. माध्यम अहवालांनुसार आता या शोमध्ये टीव्हीच्या 2 प्रसिद्ध सुना स्पर्धक असणार आहेत.

अभिनेत्री दिव्या अग्रवाल या शोचा एक भाग असल्याची बातमी बर्‍याच दिवसांपासून समोर येत होती. आता टीव्हीच्या आणखी 2 सूनांची नावेही यात जोडली गेली आहेत. माध्यमांच्या अहवालानुसार अभिनेत्री रिद्धिमा पंडित आणि नेहा मर्दादेखील या कार्यक्रमाचा एक भाग होऊ शकतात.

दिव्याने अनेक शोमध्ये काम केले आहे!

अभिनेत्री दिव्या अग्रवाल यापूर्वी देखील दोन रिअॅलिटी शोचा एक भाग बनली होती. ती स्प्लिट्सविला आणि ‘अॅस ऑफ स्पेस सीझन 1’चा भाग राहिली आहे. त्याचवेळी रिद्धिमा पंडित आणि नेहा मर्दासाठी हा पहिला रिअॅलिटी शो असणार आहे. रिद्धिमा ‘बहु हमारी रजनीकांत’ आणि नेहा ‘रिश्तों की कट्टी बट्टी’मध्ये दिसली होती.

करण जोहर होस्ट करणार शो

करण जोहर ‘बिग बॉस’चा ओटीटी व्हर्जन होस्ट करणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्याने याबाबत माहिती दिली आहे. रिपोर्ट्सनुसार, प्रथम सिद्धार्थ शुक्ला हा ओटीटी व्हर्जन होस्ट करणार होते, पण त्यानंतर करण जोहरच्या नावाची घोषणा झाली.

‘बिग बॉस 13’ फेम शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्लासुद्धा या कार्यक्रमाचा एक भाग होऊ शकतात. ते खास पाहुणे म्हणून या शोमध्ये येऊ शकतात. जर अहवालांवर विश्वास ठेवला गेला, तर निर्माते या दोघांशी चर्चा करत आहेत. दोघांनी शोमध्ये येण्यासाठी हो म्हटलं तर चाहत्यांना पुन्हा एकदा ‘सिदनाज’ एकत्र धमाल करताना पाहायला मिळतील.

सामान्य लोकांची एंट्री

व्हूटने काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते की, बिग बॉस ओटीटीचा प्रीमिअर होईल आणि चाहते 24 तासांमधून कधीही हा शो पाहू शकतात. अलीकडेच सलमानने शोचा पहिला प्रोमोही शेअर केला होता, ज्यामध्ये तो स्वत: खूप हसतो आणि प्रेक्षकांना सांगतो की, हा सीझन खूप खतरनाक होणार आहे. या वेळी शोमध्ये सामान्य लोकही येणार आहेत, ज्यांची सेलेब्सशी तगडी स्पर्धा होणार आहे. निर्मात्यांनी आश्वासन दिले आहे की, हा हंगाम मनोरंजन आणि इमोशन्सनी परिपूर्ण असेल, म्हणून त्यांनी बिग बॉस ओटीटीची मजा सर्वात आधी व्हूटवर दिसणार आहे.

(Bigg Boss OTT update riddhima Pandit and Neha Marda will be join show as contestant)

हेही वाचा :

20 सप्टेंबरपर्यंत कोणतीही कठोर कारवाई केली जाणार नाही, शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांना हायकोर्टाकडून मोठा दिलासा!

अभिनेत्री श्वेता तिवारीने शेअर केले ग्लॅमरस फोटो, वयाच्या 40व्या वर्षीही सुंदर दिसते अभिनेत्री!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI