Love Story | कॉलेजमध्ये झाली पहिली भेट, मैत्रीचे झाले प्रेमात रुपांतर! वाचा गिन्नी-कपिल शर्माची लव्हस्टोरी!

Love Story | कॉलेजमध्ये झाली पहिली भेट, मैत्रीचे झाले प्रेमात रुपांतर! वाचा गिन्नी-कपिल शर्माची लव्हस्टोरी!
कपिल-गिन्नी

कपिल आपल्या व्यावसायिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. तथापि, त्याचे लव्ह लाईफ फारसे प्रकाशझोतात आले नाही. या दोघांचे लग्न झाले तेव्हा त्यांचे फोटो सोशल मीडियावर खूप चर्चेत आले होते. चला तर जाणून घेऊया या जोडीची लव्हस्टोरी...

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Rohit Dhamnaskar

Jun 19, 2021 | 7:11 AM

मुंबई : टीव्ही इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध जोड्यांपैकी एक आहे कॉमेडीयन कपिल शर्मा (Kapil Sharma) आणि गिन्नी चतरथ (Ginni). दोघेही एकमेकांसोबत केवळ आनंदी क्षण जगात नाहीत तर, प्रत्येक दु:खाच्या क्षणीदेखील ते एकमेकांचे आधार बनले आहेत. प्रत्येकजण कपिल शर्माच्या कॉमेडीचा चाहता आहे. कपिल आपल्या व्यावसायिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. तथापि, त्याचे लव्ह लाईफ फारसे प्रकाशझोतात आले नाही. या दोघांचे लग्न झाले तेव्हा त्यांचे फोटो सोशल मीडियावर खूप चर्चेत आले होते. चला तर जाणून घेऊया या जोडीची लव्हस्टोरी…(Cute and sweet love story of Comedian Kapil Sharma And his Wife Ginni)

अशी झाली पहिली भेट

कपिलने आपण कॉलेजमधील ऑडिशन दरम्यान गिन्नीला भेटल्याचे सांगितले होते. कपिल म्हणाला, ‘गिन्नी एचएमव्ही कॉलेजमध्ये शिकत होती. त्यावेळी मी थिएटरमध्ये राष्ट्रीय विजेता होतो. मी एपीजे कॉलेजमध्ये शिकत होतो आणि पॉकेट मनीसाठी नाटकांचे दिग्दर्शन करण्यास सुरुवात केली होती. 2005 मध्ये एकदा मी ऑडिशनसाठी गिन्नीच्या कॉलेजला गेलो होतो आणि तिथेच तिला भेटलो.’

पहिल्या भेटीचे वर्णन करताना कपिल म्हणाला,’ त्यावेळी मी 24 वर्षांचा होतो आणि ती 19 वर्षांची होती. मी ऑडिशन घेऊन आणि त्यातील पात्रे मुलींना समजावून सांगून कंटाळलो होतो. गिन्नी इतकी चांगली होती की, मी तिच्यावर खूप प्रभावित झालो आणि तिला मी मुलींची ऑडिशन घेण्यास सांगितले. जेव्हा आमची तालीम झाली, तेव्हा ती माझ्य्साठी जेवण आणायची.’

टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना गिन्नी म्हणाली होती की, ती नंतर कपिलला पसंत करू लागली आणि म्हणूनच ती त्याच्यासाठी जेवण आणत. मग कपिल म्हणाला की, त्यावेळी त्याच्या एका मित्राने त्याला सांगितले की गिन्नीला तो आवडतो, पण त्याचा त्यावर विश्वास बसत नव्हता.

कपिलने गिन्नीला विचारला प्रश्न

कपिल म्हणाला, ‘एक दिवस मी गिन्नीला थेट विचारलं, तुला मी आवडतो का? आणि गिन्नीने याला नकार दिला. यानंतर मी पुन्हा कॉलेज फेस्टिव्हलमध्ये माझ्या आईला गिन्नीची ओळख करून दिली आणि सांगितलं की, ती माझी विद्यार्थी आहे. त्यानंतर पुन्हा मी मुंबईला आलो. इतक्या लहान वयात मी अभ्यासाबरोबरच काम करत आहे, हे ऐकून गिन्नी माझ्यावर खूप प्रभावित झाली होती.

गिन्नीपासून दूर झालो!

कपिल म्हणाला की, ‘जेव्हा लाफ्टर चॅलेंजमध्ये मला नाकारले गेले, तेव्हा मी गिन्नीला फोन केला आणि म्हणालो की, कृपया मला फोन करु नका. मला वाटले की आमच्या मैत्रीचे कोणतेही भविष्य नाही, कारण गिन्नीची आर्थिक परिस्थिती माझ्यापेक्षा चांगली होती आणि आम्ही वेगवेगळ्या जातीतील होतो. म्हणून आम्ही या नात्यातून ब्रेक घेतला. जेव्हा, मी लाफ्टर चॅलेंजच्या ऑडिशनसाठी निवडलो गेलो, तेव्हा गिन्नीने माझे अभिनंदन केले आणि आमचे बोलणे पुन्हा सुरु झाले.

त्यानंतर कपिलला ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या विनोदी कार्यक्रमातून लोकप्रियता मिळाली. पण, जेव्हा त्याचा कॉमेडी नाईट्स विथ कपिल हा शो आला, तेव्हा त्याने त्याच्या स्वत:च्या ‘के 9’ प्रॉडक्शन अंतर्गत त्याची निर्मिती केली. या दरम्यान त्याच्या करिअरचा आलेख झपाट्याने वाढला.

गिन्नीच्या वडिलांनी प्रस्ताव फेटाळला!

सुरुवातीला कपिलचा लग्नाचा प्रस्ताव गिन्नीच्या वडिलांनी फेटाळून लावला. तथापि, 24 डिसेंबर 2016 रोजी कपिलने गिन्नीला फोन केला आणि सांगितले की, आपल्याला तिच्याशी लग्न करायचे आहे. कपिलविषयी बोलताना गिन्नी एका मुलाखतीत म्हणाली होती की, ‘कपिल खूप गोड आणि चांगला माणूस आहे. तो सर्वांची काळजी घेतो. त्याच्यासारखा दुसरा कोणीही नाही. मी विचार केला जर तो त्याच्या आईवर आणि बहिणीवर खूप प्रेम करतो, तर तो त्याच्या जोडीदारावरही असेच प्रेम करेल. तो माझ्यासाठी नव्हे तर प्रेक्षकांसाठी एक स्टार होता. माझ्यासोबत तो तसाच आहे, जसा आधी होता.’ 10 वर्षे डेट केल्यानंतर 2017 मध्ये कपिलने सोशल मीडियावर आपल्या नात्याला अधिकृत केले.

आणि गिन्नीवरील प्रेम जाणवलं!

कपिल म्हणाला, जेव्हा मी माझ्या करिअरच्या उतरत्या टप्प्यात होतो, तेव्हा गिन्नी नेहमीच माझ्याबरोबर

होती. मग, मला वाटलं की, जर माझ्या वाईट दिवसांत गिन्नी माझ्याबरोबर असेल, तर ती नेहमीच मला साथ देईल. कपिल आणि गिन्नी यांनी 2018 मध्ये लग्न केले आणि आज दोघेही आपल्या मुलांसमवेत आयुष्याचा आनंद लुटत आहेत.

(Cute and sweet love story of Comedian Kapil Sharma And his Wife Ginni)

हेही वाचा :

Photo : ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाला 22 वर्षे पूर्ण, अजय देवगणनं शेअर केले खास क्षण

Shweta Tiwari | रात्रभर व्हिडीओ कॉल सुरु, केपटाऊनमध्ये शूट करणाऱ्या श्वेता तिवारीला येतेय मुलांची आठवण!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें