Shweta Tiwari | रात्रभर व्हिडीओ कॉल सुरु, केपटाऊनमध्ये शूट करणाऱ्या श्वेता तिवारीला येतेय मुलांची आठवण!

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) सध्या केपटाऊनमध्ये 'खतरों के खिलाड़ी 11' चे (Khatron Ke Khiladi 11) शूटिंग करत आहे. दरम्यान, अभिनेत्रीने आपली मुलं पलक आणि रेयांश यांच्यासह व्हिडीओ कॉलची एक झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Shweta Tiwari | रात्रभर व्हिडीओ कॉल सुरु, केपटाऊनमध्ये शूट करणाऱ्या श्वेता तिवारीला येतेय मुलांची आठवण!
श्वेता तिवारी

मुंबई : टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) सध्या केपटाऊनमध्ये ‘खतरों के खिलाड़ी 11’ चे (Khatron Ke Khiladi 11) शूटिंग करत आहे. दरम्यान, अभिनेत्रीने आपली मुलं पलक आणि रेयांश यांच्यासह व्हिडीओ कॉलची एक झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहण्यापेक्षा श्वेता तिवारी तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी चर्चेत राहिली आहे. नुकतीच श्वेता तिचा माजी पती अभिनव कोहली याच्याशी सुरु असलेल्या वादांबाबत चर्चेत आली होती (Shweta Tiwari missing her childrens share video call screen shot on social media).

श्वेता तिवारीने नुकतेच आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर चाहत्यांसह तिच्या व्हिडीओ कॉल सेशनचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. पलक आणि रेयांश यांच्याशी झालेल्या संभाषणाचा आनंद श्वेताच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतो आहे. श्वेताने ही स्टोरी शेअर केली आणि लिहिले की, ‘कधीही न संपणारी कथा (हार्ट इमोजिस).’  अभिनेत्री मुलांपासून दूर असली तर, दररोज अशाच प्रकारे व्हिडीओ कॉलवर ती आपल्या मुलांशी बोलते. एका मुलाखतीत श्वेताने सांगितले होते की, ती रात्रभर आपल्या मुलांबरोबर व्हिडीओ कॉलवर राहते.

पाहा फोटो :

Shweta

श्वेताची पोस्ट

यापूर्वी श्वेता तिवारीला तिच्या मेक-अप आर्टिस्टसह सर्वांनी तिला “मम्मा” म्हणून संबोधले होते. तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात श्वेता स्वतःला “जगत मम्मा” आणि “साउथ आफ्रिका की मा” असे म्हणत आहे. श्वेता आपल्या व्हिडीओमध्ये म्हणते, ‘जर तुम्हा लोकांना माहिती नसेल, तर मला सांगायला आवडेल की, माझे निक नेम “मम्मा” आहे. प्रत्येकजण मला मम्मा म्हणतो. म्हणूनच मी येथे ‘जागतिक आई’ बनले आहे. मी मदर ऑफ आफ्रिका देखील आहे.

कोण आहे श्वेता तिवारी ?

श्वेता तिवारीने 2001 साली ‘कसौटी जिंदगी की’ मालिकेतून करिअरला सुरुवात केली. ‘बिग बॉस’च्या चौथ्या पर्वाची ती विजेतीही ठरली होती. याशिवाय अनेक मालिका, रिअॅलिटी शो आणि चित्रपटांमध्ये ती झळकली आहे. श्वेता तिवारीने नऊ वर्षांच्या संसारानंतर 2007 मध्ये पहिला पती राजा चौधरीसोबत घटस्फोट घेतला होता. दारुच्या नशेत राजा मारहाण करत असल्याचं श्वेता सांगत असे.

2010 पासून श्वेता अभिनवला डेट करत होती. 2013 मध्ये श्वेता आणि अभिनव विवाहबंधनात अडकले. नोव्हेंबर 2016 मध्ये श्वेता आणि अभिनव यांना मुलगा झाला. मात्र दोघांच्या नात्यात वितुष्ट आल्याने त्यांनी घटस्फोट घेतला.

‘खतरों के खिलाडी सीजन 11’चे स्पर्धक

यावेळी टीव्हीच्या प्रसिद्ध स्टंट बेस्ड रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी सीजन 11’ मध्ये बरेच मोठे टीव्ही स्टार सहभागी झाले आहेत. श्वेता तिवारी, दिव्यांका त्रिपाठी, अभिनव शुक्ला, अर्जुन बिजलानी, वरुण सूद, सौरभ जैन, अनुष्का सेन, मेहक चहल, आस्था गिल, निक्की तांबोळी आणि अनुष्का सेन या शोचा भाग आहेत.

(Shweta Tiwari missing her childrens share video call screenshot on social media)

हेही वाचा :

Hot & Bold : ‘गंदी बात’ फेम फ्लोरा सैनीनं चक्क 3 वेळा बदललं नाव, ‘हा’ रेकॉर्डही केला नावावर

‘खतरों के खिलाडी 11’च्या सेटवर मोठी दुर्घटना, अभिनेता वरुण सूदला गंभीर दुखापत