‘खतरों के खिलाडी 11’च्या सेटवर मोठी दुर्घटना, अभिनेता वरुण सूदला गंभीर दुखापत

'खतरों के खिलाडी' सीझन 11 (Khatron Ke Khiladi 11) या रिअॅलिटी शोच्या सेटवरून एक वाईट बातमी समोर आली आहे. 'खतरों के खिलाडी 11'चा स्पर्धक आणि अभिनेता वरुण सूद (Varun Sood) गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे त्याला थेट रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.

'खतरों के खिलाडी 11'च्या सेटवर मोठी दुर्घटना, अभिनेता वरुण सूदला गंभीर दुखापत
वरूण सूद

मुंबई : ‘खतरों के खिलाडी’ सीझन 11 (Khatron Ke Khiladi 11) या रिअॅलिटी शोच्या सेटवरून एक वाईट बातमी समोर आली आहे. ‘खतरों के खिलाडी 11’चा स्पर्धक आणि अभिनेता वरुण सूद (Varun Sood) गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे त्याला थेट रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. या शोच्या धोकादायक स्टंटचे शूटिंग सध्या दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये सुरू आहे. या शोमधील सगळे स्टंट्स हे तज्ज्ञांच्या देखरेखीखाली केले जातात, परंतु तरीही नेहमी कोणीना कोणी जखमी होते (Actor contest Varun Sood injured on  Khatron Ke Khiladi 11 set).

ईटाइम्सच्या अहवालानुसार, अभिनेता वरुण सूद तीन चार दिवसांपूर्वी एक धोकादायक स्टंट करत असताना जखमी झाला आहे. या अपघातानंतर वरुणला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याच्यावर आवश्यक ते उपचार करण्यात आले. वरुणच्या हाताला दुखापत झाली होती. प्रत्येकाला असे वाटत होते की, त्याला फ्रॅक्चर झाले आहे, परंतु काही तासांनी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्याची तब्येत बरी झाली. मात्र, वरुणला 2 ते 3 दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला होता, पण त्याच दिवशी तो सेटवर पोहोचला.

रोहित शेट्टी सतर्क

त्याचवेळी, या अपघातानंतर शोचा होस्ट आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी अशी घटना पुन्हा घडू नये याची काळजी घेतली आहे. कोणत्याही सेलिब्रिटी स्पर्धकाला दुखापत होणार नाही, यासाठी आता अधिक खबरदारी घेतली जाणार आहे.

अभिनेता वरुण सूद रोडीज आणि स्प्लिट्सविलासारख्या रियॅलिटी शोचा देखील एक भाग होता. वरुण ‘खतरों के खिलाडी 11’च्या सेटवरून नेहमी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो, ज्यामध्ये तो त्याच्या साथीदारांसोबत बरीच मस्ती करताना दिसतो. नुकतेच वरुण सूदने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर काही पोस्ट्स शेअर केल्या आहेत, ज्यात तो आपल्या स्टंटची तयारी करताना दिसला आहे. या पोस्टमध्ये तो दोरीने उडी मारत होता. या संदर्भात सांगताना तो म्हणाला की, खतरों के खिलाडी 11 मध्ये येण्यापूर्वी त्याला रणविजय सिंघा याने हा व्यायाम शिकवला होता.

सध्या या शोचे स्पर्धक स्टंटसमवेत केपटाऊनच्या सौंदर्याचा आनंद घेत आहेत. पण ही मजा आता त्यांच्यासाठी धोकादायक असल्याचे सिद्ध होत आहे. नुकतीच या शोमधील स्पर्धक आणि अभिनेत्री अनुष्का सेन हिला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तिला सर्व स्पर्धकांपासून अलग ठेवण्यात आले आहे आणि इतर लोकांचीही कोरोना चाचणी घेण्यात आली होती. अद्याप या टीममधील इतर कोणालाही कोरोनाची लागण झालेली नाही.

(Actor contest Varun Sood injured on  Khatron Ke Khiladi 11 set)

हेही वाचा :

Anushka Sen | अभिनेत्री अनुष्का सेनला कोरोनाची लागण, ‘खतरों के खिलाड़ी’वर स्थगितीचे सावट!

PHOTO | ‘सारेगमप लिटील चॅम्प’ फेम गायक रोहित राऊत प्रेमात, पाहा कोण आहे ‘ही’ खास व्यक्ती…