AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तारक मेहतामध्ये दयाबेन परतणार? निर्माता असित मोदी म्हणाले…

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत जेठालालची पत्नी दयाबेनने प्रेक्षकांचे तुफान मनोरंन केले आहे. मात्र मागील काही काळापासून दयाबेन या लोकप्रिय मालिकेचा भाग नाही.

तारक मेहतामध्ये दयाबेन परतणार? निर्माता असित मोदी म्हणाले...
dayaben
| Updated on: Jun 15, 2025 | 11:02 PM
Share

छोट्या पडद्यावरील सर्वांची आवडती मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा गेल्या 17 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. यातील कलाकारांना आपल्या चाहत्यांच्या मनात घर केलेलं आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये शोच्या कलाकारांमध्येही बदल झाले आहेत. अनेक जुन्या कलाकारांची जागा नव्या कलाकारांनी घेतली आहे. याचा फटकाही शो ला बसला आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत जेठालालची पत्नी दयाबेनने प्रेक्षकांचे तुफान मनोरंन केले आहे. मात्र मागील काही काळापासून दयाबेन या लोकप्रिय मालिकेचा भाग नाही. त्यामुळे मालिकेत आता जुनी मजा राहिली नाही असे अनेक प्रेक्षकांचे म्हणने आहे. अशातच आता शोच्या निर्मात्यांनी अलीकडेच दयाबेनच्या शोमध्ये परतण्याबद्दल खुलासा केला आहे.

दयाबेन परतणार?

देशातील बऱ्याच लोकांच्या आठवणी, भावना आणि बालपणीचाही तारक मेहता शोशी खास संबंध आहे. दयाबेनची व्यक्तिरेखा नेहमीच मालिकेत आकर्षणाचे केंद्र राहिली आहे.मात्र गेल्या एक दशकापासून दयाबेन या शोमध्ये परतलेली नाही किंवा तिची जागाही दुसऱ्या कलाकाराने घेतलेली नाही. त्यामुळे निराश झाले आहेत आणि त्यांनी निर्मात्यांकडे अनेकदा याबद्दल तक्रारही केलेली आहे. आता दयाबेल शोमध्ये पुन्हा परतणार असल्याची चर्चां रंगली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

असित मोदी काय म्हणाले?

मालिकेचे निर्माते असित मोदी दयाबेनच्या परतण्याबद्दल म्हणाले की, ‘आम्ही लवकरच तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये दयाबेनला आणू.’ दयाबेन जुनी असेल का? असे विचारले असता मोदी म्हणाले – “हे शक्य होणे कठीण आहे पण ती परत यावी अशी माझी इच्छा आहे. काहीही झाले तरी आम्ही दयाबेनला शोमध्ये परत आणण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही त्यावर कामही करत आहोत.” या मालिकेत दयाबेनची भूमिका दिशा वकानीने साकारली होती मात्र ती गेल्या काही वर्षांपासून शोमध्ये दिसलेली नाही.

मालिकेच्या टीआरपीवर असित मोदींचे भाष्य

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या टीआरपीबद्दल बोलताना असित मोदी म्हणाले की, “कधीकधी इतर चॅनेलकडून अधिक स्पर्धा मिळते, तसेच कधीकधी काही बातम्यांमुळे लोकांचे लक्ष दुसरीकडे जाते. परंतु सोनी लिव्ह आणि यूट्यूबवर आमचे निष्ठावंत प्रेक्षक आहेत, त्यामुळे ही चिंतेची बाब नाही.”

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.