प्रेग्नेंसीमुळेच देवोलीना भट्टाचार्जी हिने शाहनवाज शेख याच्यासोबत बांधली लग्न गाठ? चर्चांना उधाण

देवोलीना भट्टाचार्जी हिने शाहनवाज शेख याच्यासोबत लग्न केल्याने अनेकांचा पारा चढला आहे.

प्रेग्नेंसीमुळेच देवोलीना भट्टाचार्जी हिने शाहनवाज शेख याच्यासोबत बांधली लग्न गाठ? चर्चांना उधाण
Follow us
| Updated on: Dec 24, 2022 | 9:51 PM

मुंबई : गोपी बहु या नावाने एक खास ओळख मिळवलेली टीव्ही अभिनेत्री अर्थात देवोलीना भट्टाचार्जी ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. देवोलीना भट्टाचार्जी हिने कोणाला खबर न लागू देता. अगदी गुपचूप पध्दतीने आपला विवाहसोहळा उरकून घेतला. देवोलीना भट्टाचार्जी हिने तिच्या लग्नाचे काही फोटो हे सोशल मीडियावर शेअर केल्याने चाहत्यांना मोठा धक्का लागला. परंतू देवोलीना भट्टाचार्जी हिचा नवरा बघितल्यापासून लोक हिला टार्गेट करत आहेत. देवोलीनाचा पती शाहनवाज शेख हा जिम ट्रेनर आहे.

देवोलीना भट्टाचार्जी हिने शाहनवाज शेख याच्यासोबत लग्न केल्याने अनेकांचा पारा चढला आहे. इतकेच नाहीतर अनेकांनी यानंतर देवोलीना हिला ट्रोल करण्यास सुरूवात केलीये. यांच्या लग्नाच्या फोटोंवर लोक काहीही कमेंट करताना दिसत आहेत.

अनेकांनी लग्नाच्या फोटोंवर कमेंट करत म्हटले की, आलिया भट्ट हिच्याप्रमाणेच देवोलीना भट्टाचार्जी ही लग्नाच्या अगोदरच प्रेग्नेंट होती आणि म्हणूनच हिने कोणाला काहीही कळू देण्याच्या अगोदरच लग्न करून घेतले आहे. सोशल मीडियावर सतत चर्चा रंगत आहे की, खरोखरच देवालीना ही प्रेग्नेंट आहे का?

प्रेग्नेंसीच्या सर्व चर्चांवर आता देवोलीना भट्टाचार्जी हिने सडेतोड उत्तर दिले आहे. यावेळी देवोलीनाने ट्रोल करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. देवोलीना भट्टाचार्जी म्हणाली, मुळात म्हणजे मला कोणाला सफाई देण्याची अजिबातच गरज नाहीये. परंतू माझ्या जवळच्याच लोकांना वाटते आहे मी प्रेग्नेंट आहे.

मी खरोखरच या सर्व चर्चांमुळे आश्चर्यचकित झालीये. परंतू अशाप्रकारे कमेंट करणाऱ्या लोकांची मला दया देखील येते. म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्रास देण्यासाठी हे काय करू शकतात. लोक दुसऱ्यांना आनंदी पाहू शकत नाहीत. एका विशिष्ट वेळेनंतर याचा राग येतो.

एखाद्या व्यक्तीच्या पर्सनल आयुष्यामध्ये किती लक्ष द्यावे ना? मला तर कधी कधी या कमेंट वाचून हसू देखील येते. मी यासर्व गोष्टींकडे लक्षच देणे मुळात बंद केले आहे. मी सध्या माझ्या पर्सनल लाईफमध्ये खूप जास्त बिझी आहे. बिग बाॅसमध्ये जाण्यासाठी मी लगेचच तयार नसल्याचे देखील देवोलीना भट्टाचार्जी म्हणाली आहे.

'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....