Eijaz Khan Pavitra Punia : गर्लफ्रेंड पवित्रा पुनियाच्या कुटुंबियांना भेटला एजाज खान, लवकरच वाजणार सनई-चौघडा?

ऑनलाईन मीडिया रिपोर्टनुसार, एजाज खान, दिल्लीत पवित्र पुनियाच्या आई -वडिलांबद्दल बोलताना म्हणाला की, मी आधीच तिच्या भावाला मुंबईत भेटलो होतो. यावेळी तिच्या पालकांना भेटण्याची वेळ आली. आम्ही बराच वेळ एकत्र घालवला आणि ते खूप छान आहेत. मी त्यांना पहिल्यांदाच भेटलो होतो याची मला जाणीवही नव्हती. (Eijaz Khan met Girlfriend Pavitra Punia's family, getting married soon?)

Eijaz Khan Pavitra Punia : गर्लफ्रेंड पवित्रा पुनियाच्या कुटुंबियांना भेटला एजाज खान, लवकरच वाजणार सनई-चौघडा?
पवित्रा पुनिया एजाज खान
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: VN

Sep 26, 2021 | 1:51 PM

मुंबई : एजाज खान (Eijaz Khan) आणि पवित्रा पुनिया (Pavitra Punia) बहुधा आता बिग बॉस 14 (Bigg Boss 14) मध्ये फुललेल्या प्रेमाला नवीन नाव देण्याचा प्रयत्न करत आहेत. नुकतंच, एजाज खानने पवित्र पुनियाच्या कुटुंबीयांची भेट घेतली, त्यानंतर दोघं लवकरच विवाहबंधनात अडकतील अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, एजाज खाननं पवित्रा पुनियाच्या आई -वडिलांसोबत त्यांच्या पहिल्या भेटीचा अनुभव शेअर केला. एजाज खान सांगतो की, पवित्राच्या आई -वडिलांना भेटताना त्याला खूप विचित्र वाटत होतं आणि त्याच्या तळव्यांना घाम आला होता.

ऑनलाईन मीडिया रिपोर्टनुसार, एजाज खान, दिल्लीत पवित्र पुनियाच्या आई -वडिलांबद्दल बोलताना म्हणाला की, मी आधीच तिच्या भावाला मुंबईत भेटलो होतो. यावेळी तिच्या पालकांना भेटण्याची वेळ आली. आम्ही बराच वेळ एकत्र घालवला आणि ते खूप छान आहेत. मी त्यांना पहिल्यांदाच भेटलो होतो याची मला जाणीवही नव्हती.

पवित्र पुनियाच्या कुटुंबीयांना भेटल्यानंतर एजाज खान घाबरला

तो पुढे म्हणाला की, त्यांनी मला बिग बॉसमध्ये पाहिलं होतं. ही भेट चांगली झाली होती, पण पुढच्या वेळी मी त्यांच्यासमोर थोडं अधिक मोकळं होण्याचा प्रयत्न करेन. माझ्या तळव्याला घाम फुटला होता आणि मला पण थोडंसं विचित्र वाटत होतं, पण मी पवित्राला अगोदरच सांगितले की जर तु माझ्याकडे शांतपणे बघत असशील तर पुढे ये आणि स्वतः बोलायला सुरुवात कर.

एजाज खान आणि पवित्र पुनिया हे टीव्ही इंडस्ट्रीशी संबंधित आहेत, परंतु दोघंही सलमान खानच्या शो ‘बिग बॉस 14’ मध्ये भेटले होते. दोघांनाही अनेक वेळा एकमेकांशी भांडताना दिसले, दुसरीकडे दोघांनीही त्यांच्या डोळ्यात एकमेकांबद्दल प्रेम पाहिलं.

जेव्हा पवित्रा शोमधून बाहेर पडली होती, तेव्हा एजाजनं पवित्राबद्दलच्या भावना व्यक्त केल्या होत्या. यानंतर, जेव्हा पवित्रा घरात पुन्हा पाहुणी म्हणून दाखल झाली, तेव्हा तिने एजाजवरील प्रेमही व्यक्त केलं होतं. हा शो संपल्यापासून हे दोघं अनेकदा एकत्र दिसले आहे. दोघांनीही एकत्र गणेशोत्सव साजरा केला. एवढंच नाही तर अलीकडेच दोघंही एकत्र जिम कॉर्बेट नॅशनल पार्कच्या सहलीला गेले होते.

आता ही बातमी ऐकून दोघांचेही चाहते आनंदी झाले आहेत. सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.

संबंधित बातम्या

Romantic Song : अभिनेता अक्षय वाघमारे पहिल्यांदाच झळकणार रोमँटिक गाण्यात, ‘हळवेसे’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Suhana Khan: दिल, दोस्ती, दुनियादारी… मैत्रिणींसोबत ‘सुहाना’ सफर; पाहा सुहाना खानचा शॉर्ट ड्रेसमध्ये नाइट आऊट

Iconic Gold Awards 2021 : सुरभी, दिव्या आणि हीनासह टीव्ही स्टार्सनं रेड कार्पेटवर केली ग्लॅमरस अंजादात एंट्री, पाहा फोटो

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें