AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Happy Birthday Parmeet Sethi | अर्चना पूरन सिंह आणि परमीत सेठी यांची कुंडली पाहून ज्योतिषी हैराण झाले, जाणून घ्या काय होते कारण?

अभिनेता परमीत सेठी (Parmeet Sethi) 14 ऑक्टोबर रोजी आपला 60वा वाढदिवस साजरा करत आहेत. या वयात ती आजही खूप तंदुरुस्त दिसतो. त्याच्या फिटनेसबरोबरच तो त्याच्या प्रेमकथेसाठी देखील प्रसिद्ध आहे.

Happy Birthday Parmeet Sethi | अर्चना पूरन सिंह आणि परमीत सेठी यांची कुंडली पाहून ज्योतिषी हैराण झाले, जाणून घ्या काय होते कारण?
Parmeet Sethi
| Edited By: | Updated on: Oct 14, 2021 | 8:16 AM
Share

मुंबई : अभिनेता परमीत सेठी (Parmeet Sethi) 14 ऑक्टोबर रोजी आपला 60वा वाढदिवस साजरा करत आहेत. या वयात ती आजही खूप तंदुरुस्त दिसतो. त्याच्या फिटनेसबरोबरच तो त्याच्या प्रेमकथेसाठी देखील प्रसिद्ध आहे. अर्चना पूरन सिंग (Archana Puran Singh) आणि परमीत सेठी ही अशी जोडी आहे, ज्यांनी जुनी विचारसरणी सोडून एकमेकांचा हात धरला. वास्तविक, अर्चनाचे एक लग्न मोडले होते. असे असूनही, परमीतने अर्चनाला आपली जीवनसाथी बनवण्याचा निर्णय घेतला होता.

परमीत केवळ अर्चनाच्या प्रेमात पडला नाही, तर कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्नही केले. पण, त्याच्या आयुष्यात असा एक किस्सा देखील आहे की, तो आठवून आजही त्याला हसू येते. एकदा त्या दोघांची कुंडली पंडिताने पाहिली. त्याची कुंडली पाहून पंडित खूप हैराण झाले.

अशी होती पहिली भेट…

परमीत सेठीची अर्चनासोबतची पहिली भेट एका पार्टीत झाली होती. अर्चना त्यावेळी पत्रिका वाचत होती. परमीतने तिच्या हातातून पत्रिका काढून घेतली. त्याला ही पत्रिका दुसऱ्या कुणाला द्यायची होती. त्यानंतर अर्चना खूप चिडली. पण नंतर परमीतने अर्चनाची माफी मागितली. तिथून दोघांमध्ये संभाषण सुरु झाले.

चार वर्षे लपवले लग्न

परमीत सेठीच्या आई-वडिलांना त्यांच्या मुलाने अर्चनाशी लग्न करावे असे वाटत नव्हते. ते या विवाहाच्या विरोधात होते. तसेच, अर्चना एक अभिनेत्री आहे, यावर त्यांचा आक्षेप होता. परमीतने आई-वडिलांना न कळवताच अर्चनाशी लग्न केले होते आणि चार वर्षे त्याच्या लग्नाबद्दल कोणालाही कळूही दिले नाही.

रात्री 11 वाजता घेतला लग्न करण्याचा निर्णय

लग्नाआधी परमीत आणि अर्चना लिव्ह-इनमध्ये राहत होते आणि मग एक दिवस ते अचानक रात्री 11 वाजता लग्न करण्यासाठी एका पंडितकडे पोहोचले. दोघांनी अचानक एकमेकांना आपले जीवनसाथी बनवण्याचा निर्णय घेतला.

जन्मकुंडली पाहून ज्योतिषी हैराण झाले!

अर्चनाने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, लग्नाच्या बऱ्याच वर्षानंतर ती या दोघांची कुंडली तिच्या जुन्या ज्योतिषाला दाखवण्यासाठी गेली होती. ज्योतिषाने कुंडली बघताच त्याला मोठा धक्का बसला होता. कुंडली पाहून ज्योतिष्याने दोघांना सांगितले की, हे नाते कसे जुळू शकते? ज्योतिषी म्हणाले की, जर या दोन्ही कुंडली लग्नापूर्वी माझ्याकडे आल्या असत्या, तर मी हे नाते स्पष्टपणे नाकारले असते. यातील कोणतेच गुण एकमेकांशी जुळत नाहीत.

हेही वाचा :

समीर वानखेडेंच्या डोक्यावर नेमका कुणाचा हात?, पाहा पत्नी क्रांती रेडकर काय म्हणाली…

Corona on Film Set : ‘ओह माय गॉड 2’च्या सेटवर कोरोनाचा उद्रेक, 7 जणांना कोरोनाची लागण, मुंबईतील शुटिंग स्थगित!

Death Anniversary | धार्मिक चित्रपट करणं निरुपा रॉय यांच्या करिअरला ठरलं बाधक, पाहा कशी झाली होती बॉलिवूडमध्ये एंट्री…

’बाबू’मध्ये पाहायला मिळणार ॲक्शनचा तडका, हटके लूकमध्ये दिसणार अंकित मोहन!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.