Happy Birthday Sumona Chakravarti | 22 वर्षांपूर्वी आमीर खानच्या चित्रपटातून पदार्पण, कपिल शर्माची ‘पत्नी’ बनून सुमोना गाजवतेय छोटा पडदा!

‘द कपिल शर्मा शो’मध्ये (The Kapil Sharma) कॉमेडियन कपिल शर्माच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती (Sumona Chakravarti) हिचा आज (24 जून) वाढदिवस आहे. 33 वर्षांच्या सुमोनाने 22 वर्षांपूर्वी म्हणजेच 1999मध्ये वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी ‘मन’ या चित्रपटाद्वारे मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते.

Happy Birthday Sumona Chakravarti | 22 वर्षांपूर्वी आमीर खानच्या चित्रपटातून पदार्पण, कपिल शर्माची ‘पत्नी’ बनून सुमोना गाजवतेय छोटा पडदा!
सुमोना चक्रवर्ती

मुंबई : ‘द कपिल शर्मा शो’मध्ये (The Kapil Sharma) कॉमेडियन कपिल शर्माच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती (Sumona Chakravarti) हिचा आज (24 जून) वाढदिवस आहे. 33 वर्षांच्या सुमोनाने 22 वर्षांपूर्वी म्हणजेच 1999मध्ये वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी ‘मन’ या चित्रपटाद्वारे मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते. उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये जन्मलेल्या सुमोनाचा आज संपूर्ण भारत फॅन आहे. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये दिसण्यापूर्वी सुमोनाने बर्‍याच टीव्ही शोमध्ये काम केले होते. ‘बडे अच्छे लगते हैं’ या मालिकेत तिने साकारलेली नताशाची व्यक्तिरेखा लोकांना आवडली होती (Happy Birthday Sumona Chakravarti actress enters in industry 22 years ago).

‘बडे अच्छे लगते हैं’ या मालिकेपासून ते विनोदी कार्यक्रमांपर्यंत सुमोनाचा प्रवास खूपच रंजक होता. मालिकेनंतर सुमोनाने कपिल शर्मा सोबत सोनी टीव्हीचा कॉमेडी शो ‘कहानी कॉमेडी सर्कस की’मध्ये भाग घेतला होता. कपिल आणि सुमोना यांनीही आपल्या धमाकेदार केमिस्ट्री आणि कॉमेडी टायमिंगमुळे हा शो जिंकला. जून 2013 ते 2017 पर्यंत तिने कपिल शर्माबरोबर ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’मध्ये मंजू शर्माच्या भूमिकेत काम केले. कलर्स टीव्हीवर ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’च्या समाप्तीनंतर, कपिल शर्माने सोनी टीव्हीवर ‘द कपिल शर्मा शो’ नावाच्या नवीन शोची सुरूवात केली, ज्यामध्ये ती सरला गुलाटीची भूमिका साकारत आहे.

नुकताच केला मोठा खुलासा

महिन्याभरापूर्वी सुमोना चक्रवर्ती हिएन एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये तिच्या संघर्षाबद्दल लिहिले होते. सुमोनाचा हा संघर्ष तिच्या मानसिक आणि शारीरिक दोन्ही बाजूंचा लढा होता. आपला एका वर्कआऊट सेल्फी शेअर करताना तिने म्हटले होते की, ‘बर्‍याच दिवसानंतर मी खूप कसरत केली आहे आणि मला आता खूप चांगले वाटत आहे. याक्षणी मी बेरोजगार आहे. परंतु, मी स्वत: ची आणि कुटुंबाची काळजी घेण्यास सक्षम आहे, या बद्दल मला कधीकधी खूप चांगले वाटते. व्यायामामुळे मला बरं वाटतं आणि माझे मूड स्विंग देखील कमी होतात.’

अभिनेत्रीने पुढे आपल्या या आजाराबद्दल लिहिताना म्हटले आहे की, ‘2011 पासून मी एंडोमेट्रिओसिस नावाच्या आजाराशी लढत आहे. अभिनेत्रीने सांगितले की, ती बर्‍याच वर्षांपासून या आजाराच्या चौथ्या टप्प्यावर आहे. तिने पुढे असेही लिहिले आहे की, चांगल्या खाण्याच्या सवयी, व्यायाम करणे आणि ताण न घेणे हे माझ्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. परंतु, लॉकडाऊन माझ्यासाठी भावनिकदृष्ट्या फार कठीण आहे.’

सुमोनाचा आजार चौथ्या टप्प्यावर

जेव्हा अभिनेत्रीने सांगितले की, ती 2011पासून एंडोमेट्रिओसिस नावाच्या आजाराशी झुंज देत आहे. तेव्हा तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. या आजारात स्त्रीला गर्भधारणा न होण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. सुमोनाने सांगितले होते की, ती आता या आजाराच्या चौथ्या टप्प्यावर आहे.

(Happy Birthday Sumona Chakravarti actress enters in industry 22 years ago)

हेही वाचा :

Krrish 4 | ‘क्रिश’ला 15 वर्ष पूर्ण, हृतिक रोशनची चाहत्यांना मोठी भेट, पाहा ‘क्रिश 4’ची झलक

फॅशन नाही तर ‘या’ कारणामुळे अमिताभ बच्चन यांनी बांधली होती शर्टाची गाठ! वाचा ‘दीवार’चा किस्सा…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI