कपिल शर्माची Onscreen बायको म्हणते, आजारानं त्रस्त, उदरनिर्वाह चालू आहे, सुमोनाला नेमकं काय झालंय?

कपिल शर्माच्या या शोमध्ये पहिल्या सीजनपासूनच त्याच्यासोबत काम करणारी सुमोना चक्रवर्ती (Sumona Chakravarti) प्रेक्षकांना आणि चाहत्यांना खूप आवडते.

कपिल शर्माची Onscreen बायको म्हणते, आजारानं त्रस्त, उदरनिर्वाह चालू आहे, सुमोनाला नेमकं काय झालंय?
सुमोना चक्रवर्ती

मुंबई : लोकप्रिय टीव्ही शो ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस उतरला. शोच्या सर्व कलाकारांना यामुळे एक विशेष ओळख मिळाली आहे. कपिल शर्माच्या या शोमध्ये पहिल्या सीजनपासूनच त्याच्यासोबत काम करणारी सुमोना चक्रवर्ती (Sumona Chakravarti) प्रेक्षकांना आणि चाहत्यांना खूप आवडते. सुमोनाने तिच्या विनोदाने आणि अभिनयाने चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. अलीकडेच सुमोनाने सोशल मीडियावर स्वतःशी संबंधित एक मोठा खुलासा केला आहे (The Kapil Sharma Show fame actress Sumona Chakravarti revealed she is unemployed and battling endometriosis).

सुमोना चक्रवर्ती सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. कपिलची ऑनस्क्रीन पत्नी सुमोना अनेकदा सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांना मंत्रमुग्ध करत असते. चाहते तिच्या प्रत्येक अपडेटची उत्सुकतेने वाट बघत असतात. अशा परिस्थितीत सुमोनाने आता आपण मागील 10 वर्षांपासून आजारी असल्याचे सांगितले आहे.

सुमोनाने केला खुलासा

आपल्या स्टाईलने चाहत्यांना घायाळ करणाऱ्या सुनोमाने नुकतीच एक पोस्ट टाकून चाहत्यांमध्ये खळबळ उडावली आहे. तिच्या आजराविषयी ऐकून अभिनेत्रीचे चाहते खूप अस्वस्थ झाले आहेत. अलीकडेच सुमोनाने सोशल मीडियावर आपल्या आरोग्याबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे.

सुमोनाने अलीकडेच इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये ती पोस्ट-वर्कआउट लूकमध्ये दिसली आहे. फोटोमध्ये ती खूप थकलेली दिसत आहे. या फोटोसह अभिनेत्रीने देखील लांब लचक पोस्ट शेअर केली आहे आणि सांगितले की ती दीर्घ काळापासून या आजाराशी संघर्ष करत आहे (The Kapil Sharma Show fame actress Sumona Chakravarti revealed she is unemployed and battling endometriosis).

सध्या मी बेरोजगार, पण…

सुमोनाने आपल्या या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, बर्‍याच दिवसानंतर मी खूप कसरत केली आहे आणि मला आता खूप चांगले वाटत आहे. याक्षणी मी बेरोजगार आहे. परंतु, मी स्वत: ची आणि कुटुंबाची काळजी घेण्यास सक्षम आहे, या बद्दल मला कधीकधी खूप चांगले वाटते. व्यायामामुळे मला बरं वाटतं आणि माझे मूड स्विंग देखील कमी होतात.

अभिनेत्रीने पुढे आपल्या या आजाराबद्दल लिहिताना म्हटले आहे की, 2011 पासून मी एंडोमेट्रिओसिस नावाच्या आजाराशी लढत आहे. अभिनेत्रीने सांगितले की, ती बर्‍याच वर्षांपासून या आजाराच्या चौथ्या टप्प्यावर आहे. तिने पुढे असेही लिहिले आहे की, चांगल्या खाण्याच्या सवयी, व्यायाम करणे आणि ताण न घेणे हे माझ्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. परंतु, लॉकडाऊन माझ्यासाठी भावनिकदृष्ट्या फार कठीण आहे.

माझ्यासाठी हे सगळं सोपं नव्हतं!

पुढे ती लिहिते की, हे सर्व सांगणे माझ्यासाठी सोपे नाही, परंतु जर माझी पोस्ट एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य आणते आणि प्रेरणा देते, तर ती माझ्यासाठी मोठी गोष्ट असेल. प्रत्येकजण आयुष्यात काही समस्येशी लढा देत असतो, परंतु जीवनात प्रेम कुठेही जाऊ देऊ नका. सुमोनाची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, चाहते त्यावर भरभरून कमेंट करत आहेत.

(The Kapil Sharma Show fame actress Sumona Chakravarti revealed she is unemployed and battling endometriosis)

हेही वाचा :

गंगा नदीत तरंगणारे मृतदेह नाजयेरियाचे; कंगना रनौतचा जावईशोध

PHOTO | ‘तू, मी आणि पुरणपोळी’, ओम आणि स्वीटूची लव्हस्टोरी आता चित्रपट रुपात प्रेक्षकांच्या भेटीला!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI