आधी युवराज सिंग आणि आता युविका चौधरी, हरियाणात जातीवाचक शिवीगाळ, अटक, वाचा नेमकं काय झालं?

बिग बॉस फेम युविका चौधरी (Yuvika Choudhary) आजकाल सतत चर्चेचा एक भाग बनली आहे. तिने काही काळापूर्वी एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यात तिने एक जातीवादी हा शब्द वापरला होता. त्यानंतर तिच्या विरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती.

आधी युवराज सिंग आणि आता युविका चौधरी, हरियाणात जातीवाचक शिवीगाळ, अटक, वाचा नेमकं काय झालं?
Yuvika Choudhary

मुंबई : बिग बॉस फेम युविका चौधरी (Yuvika Choudhary) आजकाल सतत चर्चेचा एक भाग बनली आहे. तिने काही काळापूर्वी एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यात तिने एक जातीवादी हा शब्द वापरला होता. त्यानंतर तिच्या विरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. एवढेच नाही तर तिला सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात आले होते. मात्र, आता तिला जातीय शब्द वापरल्याप्रकरणी सोमवारी अटक करण्यात आली आहे.

हरियाणा पोलिसांनी युविकाला सोमवारी अटक केली होती. युविकाची हांसी पोलीस स्टेशनमध्ये सुमारे तीन तास चौकशी करण्यात आली. यानंतर युविकाला पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. युविकाविरुद्ध एससी/एसटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

‘या’ दिवशी होणार प्रकरणाची सुनावणी!

युविकाचे वकील अशोक बिष्णोई यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘माझा क्लायंट उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तपासात सामील झाला होता आणि आता तिला अंतरिम जामिनावर सोडण्यात आले आहे. आता या प्रकरणाची सुनावणी उच्च न्यायालयात 24 नोव्हेंबर रोजी होणार आहे.’

नेमकं प्रकरण काय?

युविका चौधरीने या वर्षी मे महिन्यात एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यात तिचा पती प्रिन्स नरुलाही तिच्यासोबत दिसला होता. या व्हिडीओमध्ये युविकाने एक जातिवादी शब्द वापरला होता. त्यानंतर हा गोंधळ उडाला. युविकाचा व्हिडीओ खूप लवकर व्हायरल झाला, त्यानंतर तिला ट्रोल केले जात होते आणि लोक अटक करण्याची मागणी करत होते. हे प्रकरण वाढल्यानंतर अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून माफीही मागितली. ती म्हणाली की, या शब्दाचा नेमका अर्थ आपल्याला माहित नाही. दलित हक्क कार्यकर्ते रजत कलसन यांनी युविकाविरोधात हांसी येथे तक्रार दाखल केली होती. त्यांनी अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल केला होता.

अलीकडेच क्रिकेटपटू युवराज सिंगलाही जातिवादी शब्द वापरल्याबद्दल अटक करण्यात आली होती. त्याला हरियाणा पोलिसांनी अटकही केली होती, युवराज सध्या अंतरिम जामिनावर बाहेर आहे.

युविकाने चुकून वापरला जातीवाचक शब्द

युविकाने सोशल मीडियावर एक व्लॉग शेअर केला होता. ज्यामध्ये तिचा पती प्रिन्स नरुला आपले केस कापून घेताना दिसत असून, अंगावर कापड घेऊन बसला होता. तर, युविका घरभर फिरून एक व्हिडीओ बनवत आहे. व्हिडीओ बनवताना युविका म्हणते की, ‘जेव्हा जेव्हा मी व्लॉग बनवते, तेव्हा मी येऊन ** सारखी का उभी राहते? मला स्वत:ला तयार करण्यासाठी पुरेसा वेळ देखील मिळत नाही. मी खूप बेकार दिसत आहे आणि प्रिन्स मला तयार होण्यास वेळ देत नाही.’

युविकाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि #ArrestYuvikaChodhhary ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला. बरेच लोक युविकावर मीम्स शेअर करत होते.

युविकाआधी मुनमुन दत्ता ट्रोल

अलीकडेच ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील ‘बबिता जी’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) हीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये तिने जातीवाचक अपमानास्पद शब्द वापरला होता. यानंतर तिच्यावर कारवाई करण्याची जोरदार मागणी झाली होती. यानंतर तिच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा :

संजीदा शेख ते मोहित मलिक, अभिनयाव्यतिरिक्त ‘साईड बिझनेस’ म्हणून अनेक व्यवसाय करतात टीव्ही कलाकार!

Happy Birthday Sunny Deol | जेव्हा सनी देओलने खऱ्या आयुष्यातही गुंडांना धडा शिकवला! वाचा मनोरंजक किस्सा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI