Happy Birthday Sunny Deol | जेव्हा सनी देओलने खऱ्या आयुष्यातही गुंडांना धडा शिकवला! वाचा मनोरंजक किस्सा

बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेता सनी देओल (Sunny Deol)  याला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. त्याने आपल्या दमदार कामगिरीने मोठ्या पडद्यावर एक अमिट छाप सोडली आहे. हिंदी चित्रपटांमध्ये सनी देओलची राग आणि धडाकेबाज शैली त्याला एक वेगळा कलाकार बनवते.

Happy Birthday Sunny Deol | जेव्हा सनी देओलने खऱ्या आयुष्यातही गुंडांना धडा शिकवला! वाचा मनोरंजक किस्सा
Sunny Deol
Follow us
| Updated on: Oct 19, 2021 | 8:07 AM

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेता सनी देओल (Sunny Deol)  याला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. त्याने आपल्या दमदार कामगिरीने मोठ्या पडद्यावर एक अमिट छाप सोडली आहे. हिंदी चित्रपटांमध्ये सनी देओलची राग आणि धडाकेबाज शैली त्याला एक वेगळा कलाकार बनवते. सनी देओलचा जन्म 19 ऑक्टोबर 1956 रोजी प्रसिद्ध अभिनेता धर्मेंद्र यांच्या घरी झाला. त्याचे खरे नाव अजय सिंह देओल आहे.

अभिनेता सनी देओलने आपले शिक्षण भारत आणि लंडनमधून पूर्ण केले आहे. यानंतर त्याने चित्रपट जगतात पाऊल ठेवले. सनी देओलचा कल नेहमीच अभिनयाकडे होता, कारण तो चित्रपट विश्वात वावरणाऱ्या कुटुंबातील होता. त्याने 1984 मध्ये ‘बेताब’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री अमृता सिंह मुख्य भूमिकेत होती. सनी देओलची प्रतिमा हिंदी चित्रपट जगतातील अॅक्शन हिरोची आहे.

कशी मिळाली अॅक्शन हिरोची ओळख?

सनी देओलला त्याच्या करिअरच्या दुसऱ्या चित्रपट ‘अर्जुन’ मधून ही ओळख मिळाली आहे. त्याचा हा चित्रपट 1985 मध्ये आला. सनी देओलने ऐंशी आणि नव्वदच्या दशकात अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले. 1986 मध्ये तो वडील-अभिनेते धर्मेंद्र यांच्यासोबत पडद्यावर दिसला. यानंतर सनी देओलने ‘डकैत’ (1987), ‘यतीम’ (1988), ‘त्रिदेव’ (1988) आणि ‘चालबाज’ (1989), ‘घायल’ (1990), ‘घातक’ (1996) आणि ‘गदर’ (2001) हे चित्रपट केले आणि प्रशंसा मिळावली.

खऱ्या आयुष्यातही गुंडांशी सामना

त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर, सनी देओल, ज्यांनी चित्रपटांमध्ये बऱ्याच गुंडाशी सामना केला, त्यांना एकदा वास्तविक जीवनातही गुंडांचा सामना करावा लागला. हा खुलासा सनी देओलचा भाऊ अभिनेता बॉबी देओलने कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये केला होता. बॉबी देओलने सांगितले की, एकदा सनी देओल त्याच्या मित्रांसोबत पेट्रोल पंपावर थांबला होता.

या दरम्यान, त्याला 3-4 गुंडांनी घेरले आणि त्यांच्यात हाणामारी सुरू झाली. सनी देओलने त्या सर्व गुंडांचा एकट्याने सामना केला होता आणि त्याचा कोणताही मित्र कारमधून बाहेर आला नाही. अभिनेत्याने सर्व गुंडांना बेदम मारहाण केली होती.

वैयक्तिक जीवन

सनी देओलच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलताना त्याच्या पत्नीचे नाव पूजा देओल आहे. सनी देओल आणि पूजा यांना करण आणि राजवीर ही दोन मुले आहेत. सनीचा मुलगा करण देओलने चित्रपटांमध्ये पदार्पण केले आहे. सध्या सनी देओल गुरदासपूरमधून भाजपच्या जागेवर खासदार आहेत.

हेही वाचा :

जमिनीवर पडली आणि काही मिनिटांतच गमावला जीव, अभिनेत्रीच्या मृत्यूने मनोरंजन विश्वावर शोककळा!

‘हे एक बाईच कसं बोलू शकते”,  ‘पदर नीट घेतला असतास तर…’ म्हणणाऱ्या चाहतीला हेमांगी कवीने सुनावले खडे बोल!

Birthday Celebration | पती आणि मुलांसोबत हेमा मालिनी यांनी साजरा केला वाढदिवस, सोशल मीडियावर शेअर केले फोटो!

Karnan | ‘इनोव्हेटिव्ह इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये धनुषच्या चित्रपटाची बाजी, ‘कर्णन’ने पटकावला ‘सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटा’चा बहुमान!

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.