नवरा-बायको मिळून करणार प्रेक्षकांचे मनोरंजन, ‘The Indian Game Show’मध्ये भारती सिंह-हर्ष लिंबाचियाची धमाल!

प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहचे (Bharti Singh) लाखो चाहते आहेत. भारती तिच्या जबरदस्त कॉमेडीने चाहत्यांची मने जिंकण्यात कोणतीही कसर सोडत नाही. त्याचबरोबर तिने पती हर्ष लिंबाचियासोबत (Harsh Limbachia )टेलिव्हिजनवर अनेक शो होस्ट केले आहेत.

नवरा-बायको मिळून करणार प्रेक्षकांचे मनोरंजन, 'The Indian Game Show'मध्ये भारती सिंह-हर्ष लिंबाचियाची धमाल!
Harsh-Bharti


मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहचे (Bharti Singh) लाखो चाहते आहेत. भारती तिच्या जबरदस्त कॉमेडीने चाहत्यांची मने जिंकण्यात कोणतीही कसर सोडत नाही. त्याचबरोबर तिने पती हर्ष लिंबाचियासोबत (Harsh Limbachia )टेलिव्हिजनवर अनेक शो होस्ट केले आहेत. दोघांची जोडी आणि कॉमेडीही प्रेक्षकांना खूप आवडली आहे. याच क्रमाने आता दोघेही प्रेक्षकांसाठी नवीन शो घेऊन आले आहेत. ‘द इंडियन गेम शो’ असे या शोचे नाव आहे. या शोमध्ये अनेक मजेशीर आणि मजेदार खेळ पाहायला मिळणार आहेत.

या शोबद्दल सांगताना हर्ष लिंबाचियाने एका मुलाखतीत सांगितले की, ‘मी गेल्या दोन वर्षांपासून या शोमध्ये काम करत आहे. आम्ही प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत आहोत. या शोमध्ये सर्व सेलेब्स आले आणि आमच्यासोबत खेळ खेळले. मी, भारती आणि आदित्य नारायण हा शो होस्ट करणार आहोत.’

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Siddharth Nigam (@thesiddharthnigam)

भारती सिंहनेही या शोच्या सेटवरील अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये जास्मिन भसीन, अली गोनी आणि प्रियांका शर्मा सारखे सेलिब्रिटी देखील त्यांच्यासोबत धमाल-मस्ती करताना दिसत आहेत. हा शो पाहण्यासाठी चाहते देखील खूप उत्सुक आहेत.

यासोबतच भारती सिंहने नुकतेच स्वतःचे यूट्यूब चॅनलही सुरू केले आहे. त्यांच्या या चॅनेलचे नाव ‘भारती टीव्ही’ आहे. त्याबद्दल बोलताना ती म्हणाला की, ‘प्रेक्षकांना भारती टीव्ही बघायला खूप आवडतोत. त्याचवेळी दडपण देखील आहे, कारण चाहत्यांना चॅनेलकडून खूप अपेक्षा असतील. मी माझ्या करिअरची सुरुवात स्टँडअप कॉमेडियन म्हणून केली होती. भारती टीव्ही सुरू करण्याची कल्पना हर्षची आहे, त्याने हे नाव दिले आहे.’ त्यांचा ‘The Indian Game Show’ हा शो फक्त त्यांच्याच यूट्यूब चॅनलवर प्रसारित केला जाईल.

वजन कमी केल्यामुळे भारती सिंह चर्चेत!

भारती सध्या तिच्या वजन कमी करण्याच्या प्रवासामुळे प्रसिद्धीच्या झोतात आहे. तिच्या या आश्चर्यकारक बदलासाठी प्रत्येकजण तिचे कौतुक करत आहे. तिच्या वजन कमी करण्याच्या प्रवासात तिने कोणत्याही विशेष आहाराऐवजी आठवड्याच्या काही दिवसांमध्ये उपवास करण्याचा पर्याय निवडला. सुप्रसिद्ध विनोदी अभिनेत्रीने अधूनमधून उपवास करून स्वतःला बदलले आहे. पूर्वी 91 किलो असलेली भारती आता 76 किलो झाली आहे. भारती तिच्या परिवर्तनाबद्दल खूप आनंदी आहे आणि तिला स्वतःदेखील खूप चांगले वाटत आहे.

अभिनेत्री भारती सिंह सध्या टीव्ही शो ‘डान्स दीवाने 3’ होस्ट करत आहेत. त्याचबरोबर ‘द कपिल शर्मा शो’ तिच्या कॉमेडीने लोकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. भारती सिंह सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव्ह असतात आणि ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते.

हेही वाचा :

Jai Bhim Review : ज्वलंत विषयावर थेट भाष्य, अभिनेता सूर्याचा पॉवरफुल ड्रामा, वाचा कसा आहे ‘जय भीम’ चित्रपट…

Prithviraj Kapoor Birth Anniversary | हिंदी चित्रपटसृष्टीचे ‘मुघल-ए-आझम’, वाचा पृथ्वीराज कपूर यांच्याशी संबंधित खास किस्से…

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI