Jai Bhim Review : ज्वलंत विषयावर थेट भाष्य, अभिनेता सूर्याचा पॉवरफुल ड्रामा, वाचा कसा आहे ‘जय भीम’ चित्रपट…

केवळ पोलिसांच्या क्रूरतेचा विषय म्हणजे 'जय भीम' नाही. यातून पोलिसांच्या क्रूर हिंसाचाराला जन्म देणार्‍या मानसिकतेत शिरण्याचा प्रयत्न केला जातो. कथा त्या पूर्वग्रहांना समोर आणते, जे एकमेकांना समजण्यापलीकडे विचार करण्याचा अधिकार देतात.

Jai Bhim Review : ज्वलंत विषयावर थेट भाष्य, अभिनेता सूर्याचा पॉवरफुल ड्रामा, वाचा कसा आहे ‘जय भीम’ चित्रपट...
Jai Bhim
Follow us
| Updated on: Nov 03, 2021 | 11:09 AM

मुंबई : अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’  चित्रपट 5 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. ‘सिंघम’ आणि ‘सिम्बा’ नंतर रोहित शेट्टीचा कॉप युनिव्हर्समधील पुढचा चित्रपट. पूर्वीच्या पोलिसांप्रमाणेच ‘सूर्यवंशी’ही कायदा हातात घेताना दिसणार आहे. तुमच्यापैकी अनेकजण हा चित्रपट पाहायलाही जातील. त्यांनी कायदा हातात घेतल्याच्या दृश्यांवर टाळ्या वाजतील, शिट्ट्या वाजतील. पण, जर तुम्ही साऊथ चित्रपटांचे चाहते असाल तर, तुम्ही हे करण्यापूर्वी तामिळ चित्रपट ‘जय भीम’ (Jai Bhim) पाहण्याचा विचार कराल…

जिथे पोलीस काही आदिवासी समाजातील पुरुषांना जबरदस्तीने घेऊन जातात. त्यांचा अतोनात छळ करतात आणि पडद्यावर असे दृश्य पाहून तुम्ही देखील रागाने दात चावू लागाल. पोलीस त्यांना न केलेल्या गुन्ह्याची कबुली देण्यास सांगतात. त्या आदिवासींपैकी एक म्हणजे राजकानू. ज्याची पत्नी आपल्या पतीला वाचवण्यासाठी चंद्रू नावाच्या वकिलाची मदत घेते. चंद्रू मानवाधिकार प्रकरणांवर विशेष लक्ष देतो. पण या प्रकरणाचा तळ गाठताना कोणते घृणास्पद सत्य समोर येते, ही या चित्रपटाची कथा आहे. एक असे सत्य, जे शतकानुशतके आपल्यासोबत आहे. आपण फक्त सोयीस्करपणे त्याच्यापासून नजर फिरवून घेतली आहे.

सामान्यपणाचा आव न आणता थेट भाष्य

केवळ पोलिसांच्या क्रूरतेचा विषय म्हणजे ‘जय भीम’ नाही. यातून पोलिसांच्या क्रूर हिंसाचाराला जन्म देणार्‍या मानसिकतेत शिरण्याचा प्रयत्न केला जातो. कथा त्या पूर्वग्रहांना समोर आणते, जे एकमेकांना समजण्यापलीकडे विचार करण्याचा अधिकार देतात. असा भेदभावाचा थीमवर आधारित अनेक अनेक सिनेमे याआधीही चर्चेत आले आहेत. जिथे ही थीम साधी ठेवली गेली होती. जेणेकरून प्रेक्षकांना स्वतःला यातील फरक जाणवू शकेल. पण ‘जय भीम’ असे करत नाही. उच्च आणि नीच असा भेदभाव सामान्यपणे न मांडता तो स्पष्टपणे समोर ठेवतो. जसे की या कथेत राजकनू साप पकडण्याचे काम करतो. एकदा गावातील एका प्रभावशाली माणसाचा नोकर त्याला बोलावायला येतो. त्याला त्याच्या मोपेडवर बसायला सांगतो. बसलेला असताना राजकनू आधारासाठी त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. याने चिडलेला तो व्यक्ती मागे वळून पाहतो. त्याच्या नजरेतच राजकनूला आपली चूक कळते आणि तो हात मागे घेतो.

वातावरण निर्मितीतही अव्वल!

चित्रपटात पोलिसांच्या छेडछाडीची दृश्ये सर्वात त्रासदायक वाटत. प्रेक्षक म्हणून ती दृश्ये पाहत असताना एक गिल्ट तुम्हाला आतून खायला उठेल की, तुम्हीही गप्प बसून अत्याचार करणाऱ्याच्या पाठीशी घालत आहात. आणि त्या भावनिकदृष्ट्या या दृश्यांमध्ये प्रवेश केला तर, त्या आदिवासींच्या वेदना जाणवल्याशिवाय राहाणार नाही, जी कोणालाही अस्वस्थ करण्यासाठी पुरेशी आहे. असे वातावरण निर्माण करण्यासाठी चित्रपटाच्या छायांकनालाही इथे श्रेय द्यायला हवे.

सिनेमॅटोग्राफीचे यश

जर, तुम्ही संपूर्ण चित्रपट पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की, त्याची सिनेमॅटोग्राफी कथानकासोबत चालते. चंद्रू आणि आयजी पेरुमलसामी यांच्या पात्रांप्रमाणे. ज्यांची भूमिका सूर्या आणि प्रकाशराज यांनी केली आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला दोन्ही पात्रांची विचारसरणी एकमेकांपासून उत्तर-दक्षिण दिशेने सरकते. तर, एका सीनमध्ये दोघेही समोरासमोर कारजवळ उभे आहेत. अशा स्थितीत गाडीच्या दुसऱ्या बाजूला कॅमेरा लावला होता. जेणेकरून फ्रेममध्ये चंद्रू आणि पेरुमलसामी समोरासमोर दिसतील आणि त्यांच्या दरम्यान, वाहनाच्या खिडकीची चौकट अडथळा म्हणून दर्शविली जाऊ शकते. जणू दोन्हीचा विचार योग्यरीतीने केला गेला आहे. त्यांच्या विचारसरणीत फक्त फरक आहे. पुढे दोघांच्या विचारसरणीतील हा फरक मिटायला लागतो. अशा सीनमध्ये दोघे एकाच कारमध्ये बसलेले दाखवले आहेत. तेही एकमेकांच्या शेजारी! या दृष्टीला खरंच दाद द्यायला हवी!

चित्रपटाचा स्टार ‘सूर्या’ नाही तर….

सुर्या हे या चित्रपटातील सर्वात मोठे नाव होते. पण, इथे तो चित्रपटाचा सर्वात मोठा स्टार नाही. या चित्रपटाची स्टार सेंगानी आहे. म्हणजे राजकनुची पत्नी. अभिनेत्री लिझो मॉल जोसने हे पात्र साकारले आहे. राजकनू तुरुंगात गेल्यावर कथेचा भार सेंगानीवर पडतो. जी तिने उत्तम रित्या स्कारली आहे. त्याच्यासमोर सूर्या आणि प्रकाशराजसारखे अभिनेते होते. पण तरीही ती काहीशी वेगळी ठरली आहे.

‘जय भीम’ हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. चित्रपटाला मास अपील देण्यासाठी काही भाग नाट्यमय करण्यात आले आहेत. ज्यांची काही ठिकाणी गरज वाटत नाही. यामुळेच चित्रपट काही भागांमध्ये संथ वाटू शकतो. हा चित्रपट त्यातील सामाजिक संदेशाला पुरेपूर न्याय देतो. अशा इतर विषयांवरील पूर्वीच्या चित्रपटांशी तुलना करणे शहाणपणाचे ठरणार नाही. तुम्ही जर दाक्षिणात्य चित्रपटांचे चाहते असाल तर Amazon Prime Video वर हा चित्रपट एकदा नक्कीच पहा!

हेही वाचा :

Prithviraj Kapoor Birth Anniversary | हिंदी चित्रपटसृष्टीचे ‘मुघल-ए-आझम’, वाचा पृथ्वीराज कपूर यांच्याशी संबंधित खास किस्से…

Happy Birthday Sonali Kulkarni | हिंदी-मराठीच नाही तर इटालियन चित्रपटातही झळकलीये सोनाली कुलकर्णी, जाणून घ्या अभिनेत्रीबद्दल…

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.