AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Idol 12 | इंडियन आयडॉल 12च्या मंचावर आशा भोसलेंची हजेरी, सायली कांबळेने घेतले आपल्या दैवताच्या हातांचे ठसे!

आपल्या आदर्श व्यक्तींची स्मृती आपल्याजवळ ठेवण्याचे प्रत्येकाचे आपापले मार्ग असतात. कोणी त्यांचे फोटो ठेवतं, तर कोणी स्वाक्षरी. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉलच्या आगामी भागात या संदर्भात एक वेगळीच गोष्ट बघायला मिळणार आहे.

Indian Idol 12 | इंडियन आयडॉल 12च्या मंचावर आशा भोसलेंची हजेरी, सायली कांबळेने घेतले आपल्या दैवताच्या हातांचे ठसे!
आशा भोसले-सायली कांबळे
| Edited By: | Updated on: Jul 10, 2021 | 9:42 AM
Share

मुंबई : आपल्या आदर्श व्यक्तींची स्मृती आपल्याजवळ ठेवण्याचे प्रत्येकाचे आपापले मार्ग असतात. कोणी त्यांचे फोटो ठेवतं, तर कोणी स्वाक्षरी. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉलच्या आगामी भागात या संदर्भात एक वेगळीच गोष्ट बघायला मिळणार आहे. या शोचे स्पर्धक, परीक्षक आणि प्रेक्षक यांना भारून टाकत संगीताची महाराणी खुद्द गायिका आशा भोसले या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत (Indian Idol 12 contestant Sayali Kamble takes the handprints of legend Asha Bhosle).

या ‘आशा भोसले’ स्पेशल भागात सर्व स्पर्धक आशाजींची अजरामर गाणी सादर करतील. याभागात सर्वांनीच आशाजींचे आशीर्वाद मिळवले, पण ‘देश की बेटी’ म्हणून नावाजली गेलेली स्पर्धक अर्थात सायली कांबळे हिला आशाजींकडून एक मौल्यवान भेट मिळवता आली आहे.

रंगणार आशा भोसले स्पेशल भाग!

‘दैया ये मैं कहां आ फंसी’, ‘खतूबा’ आणि ‘हंगामा हो गया’ ही गाणी दमदारपणे सादर केल्यावर सायलीला आशाजींनी कौतुकाच्या रूपात आशीर्वाद दिले. ‘दैया ये मैं कहां आ फंसी’ गाणे गायला किती कठीण आहे, हे स्वतः आशाजींनी नमूद केले आणि त्याच वेळी सायलीने ते छान निभावले असेही म्हटले.

आशाजी या सायलीच्या आदर्श आहेत, तिचे दैवत आहेत आणि त्यांचा वरदहस्त आपल्यावर सदैव असावा, ही तिची इच्छा आहे. यावेळी आशाजींच्या हातांचे ठसे घेऊन ते आपल्या घरी देव्हार्‍याच्या शेजारी ठेवण्याची आपली इच्छा तिने बोलून दाखवली. ‘देश की बेटी’ सायलीची ही इच्छा आशा भोसले यांनी आनंदाने पूर्ण केली आहे.

माझे स्वप्न सत्यात उतरले!

या खास क्षणानंतर सायली कांबळे म्हणते, “आशाजींसमोर गाणे सादर करण्याचे माझे पाहिल्यापासूनचे स्वप्न होते आणि इंडियन आयडॉल 12 मुळे ते पूर्ण होऊ शकले. माझ्यासाठी आशाजी म्हणजे देवच आहेत. म्हणूनच त्यांच्या हाताचे ठसे माझ्यासाठी अत्यंत पूजनीय आहेत. हे ठसे मी माझ्या घरी देवघराच्या शेजारीच ठेवीन. मी जेव्हापासून संगीत क्षेत्रात कारकीर्द करण्याचे ठरवले, तेव्हापासून मी बहुतांशी आशाजींचीच गाणी गात आलेय. आज मला जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटते आहे.”

पवनदीपबरोबर धरला ठेका!

पवनदीपने आशाजींसमोर आपली इच्छा व्यक्त केली. त्याच्या इच्छा पूर्ण करत आशाजींनी त्याच्याबरोबर ‘ये रातें ये मौसम’ या गाण्यावर ताल धरला. आशाजींबरोबर नृत्य केल्यावर पवनदीप म्हणाला की, ‘माझा आत्तापर्यंतचा हा सर्वात चांगला क्षण आहे. मी ही संधी सोडू इच्छित नव्हतो आणि इंडियन आयडल 12चे आभार मानतो की आम्हाला केवळ आपले कलागुण दाखवण्यासाठीच व्यासपीठ दिले नाही, तर चित्रपटसृष्टीतील दिग्गजांना भेटण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी देखील दिली.

(Indian Idol 12 contestant Sayali Kamble takes the handprints of legend Asha Bhosle)

हेही वाचा :

Video | ‘ते निघून गेले पण त्यांच्या आठवणी राहतील…’, दिलीप कुमारांच्या आठवणीने भावूक झाले धर्मेंद्र

Khatron Ke Khiladi 11 | श्वेता तिवारी ते अर्जुन बिजलानी, ‘खतरों के खिलाडी 11’ ग्रँड प्रीमिअरआधीच कलाकारांचा जलवा!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.