AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kapil Sharma | ‘द कपिल शर्मा शो’साठी कपिलने वाढवलं मानधन, प्रेक्षकांना हसवण्यासाठी आकारणार ‘इतकी’ रक्कम!

अभिनेता कपिल शर्मा (Kapil Sharma) सर्वात लोकप्रिय आणि प्रतिभावान कॉमेडीयन आहे, हे आता सर्वांना माहित आहे. त्याच्या कॉमेडीचे लाखो चाहते आहेत. कॉमेडियनचा प्रसिद्ध शो ‘द कपिल शर्मा शो’ प्रेक्षकांनाही खूप आवडतो. मात्र, कपिलने मागील काही दिवसांनपासून या शोसह ब्रेक घेतला आहे. पण आता तो लवकरच या कार्यक्रमासह परत येणार आहे.

Kapil Sharma | ‘द कपिल शर्मा शो’साठी कपिलने वाढवलं मानधन, प्रेक्षकांना हसवण्यासाठी आकारणार ‘इतकी’ रक्कम!
कपिल शर्मा
| Edited By: | Updated on: Jul 01, 2021 | 9:50 AM
Share

मुंबई : अभिनेता कपिल शर्मा (Kapil Sharma) सर्वात लोकप्रिय आणि प्रतिभावान कॉमेडीयन आहे, हे आता सर्वांना माहित आहे. त्याच्या कॉमेडीचे लाखो चाहते आहेत. कॉमेडियनचा प्रसिद्ध शो ‘द कपिल शर्मा शो’ प्रेक्षकांनाही खूप आवडतो. मात्र, कपिलने मागील काही दिवसांनपासून या शोसह ब्रेक घेतला आहे. पण आता तो लवकरच या कार्यक्रमासह परत येणार आहे. या वेळी कपिलने आपले मानधन देखील वाढवल्याचे वृत्त समोर येत आहे. बातमीनुसार कपिलने केवळ 10-20च नव्हे तर, तब्बल 50 लाखांनी आपली फी वाढवली आहे (Kapil Sharma increased his per day fees for The Kapil Sharma Show).

न्यूज 18च्या एका अहवालानुसार, कपिल आता एका आठवड्यासाठी तब्बल 1 कोटी रुपये घेणार आहे. पूर्वी कपिल प्रत्येक एपिसोड साठी 30 लाख रुपये मानधन आकारत असे आणि आता प्रत्येक एपिसोडमागे 50 ते 70 लाखांची वाढ झाली आहे. याचा अर्थ असा की, पूर्वी कपिल आठवड्याला 60 लाख रुपये घेत होता, मात्र आता तो 1 कोटी रुपये घेईल.

तथापि, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. याविषयी कपिल किंवा शोच्या निर्मात्यांनीही कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. त्याचबरोबर बातमी अशीही आहे की, कपिलचे बाकीचे साथीदार कॉमेडियनसुद्धा चांगली तगडी रक्कम घेणार आहेत.

कपिलचा शो बर्‍याच वेळा टीआरपीच्या यादीमध्ये सर्वात अग्रक्रमी होता. या शोमध्ये शाहरुख खान, अक्षय कुमार, सलमान खान, दीपिका पदुकोण, करीना कपूर सारख्या अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती.

अर्चना पूरन सिंग शोमध्ये दिसणार का?

अलीकडेच अशी चर्चा रंगली होती की, आपल्या हास्यानं प्रत्येकाचे मन जिंकणारी अर्चना पूरन सिंग यावेळी शोमध्ये भाग घेणार नाहीय. ही बातमी आल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू परत येणार का? अशी ही चर्चा सुरु झाली आहे. पण स्वत: अर्चनानेही या वृत्तावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अर्चना म्हणाली, ‘मला याविषयी काहीही माहिती नाही. आतापर्यंत मी या शोचा एक भाग आहे. असं असलं तरी, मी जेव्हा जेव्हा नवीन प्रोजेक्टवर साईन करते, तेव्हा ही बातमी चर्चेत येऊ लागते. यापूर्वी ही बातमी माझ्या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळीही आली होती आणि आता मी एका मालिकेच्या शूटिंगला सुरुवात केली आहे, कदाचित म्हणूनच ही बातमी पुन्हा चर्चेत आली असावी.’

या शोबद्दल अर्चना पुढे म्हणाली की, हा शो तिच्यासाठी खूप खास आहे आणि तिला या शोमध्ये भाग घेण्यासाठी खुप उत्सुक आहे.

(Kapil Sharma increased his per day fees for The Kapil Sharma Show)

हेही वाचा :

Bigg Boss 15 | Khatron Ke Khiladi 11 नंतर अर्जुन बिजलानी सलमान खानच्या ‘बिग बॉस 15’मध्ये जाणार?

Happy Birthday Nilesh Sabale | ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’चा स्पर्धक ते ‘चला हवा येऊ द्या’चा कॅप्टन, वाचा निलेश साबळेचा ‘डॉक्टर ते अॅक्टर’ प्रवास

मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.