Good News | ‘द कपिल शर्मा शो’ कमबॅकसह मोठा धमाका करणार, या कलाकाराचे शोमध्ये पुनरागमन!

‘द कपिल शर्मा’ (The Kapil Sharma) शोच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसांपासून प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) त्याच्या काॅमेडीने सर्वांना हसवत होता.

Good News | 'द कपिल शर्मा शो' कमबॅकसह मोठा धमाका करणार, या कलाकाराचे शोमध्ये पुनरागमन!

मुंबई : ‘द कपिल शर्मा’ (The Kapil Sharma) शोच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसांपासून प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) त्याच्या काॅमेडीने सर्वांना हसवत होता. मात्र, कपिल शर्माच्या शो अचानक बंद झाला. हा शो अचानक बंद झाल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. आता कपिल शर्माच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. (The Kapil Sharma show will have a comeback)

 

View this post on Instagram

 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

रिपोर्ट्सनुसार कपिल शर्मा सुनील ग्रोव्हरसोबत पुनरागम करण्याची शक्यता आहे. काही काळासाठी कपिल शर्माचा शो बंद करण्यात आला होता. पण जुलैमध्ये हा शो पुन्हा एकदा प्रसारित होणार आहे. कॉमेडियन कपिल शर्मा टीव्ही इंडस्ट्रीचे एक प्रसिद्ध नाव आहे. त्याने केवळ टेलिव्हिजनवर आपली क्षमता सिद्ध केली नाही, तर बॉलिवूड सेलिब्रिटींमध्येही तो खूप लोकप्रिय आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

कपिल लवकरच वेब सीरिजच्या माध्यमातून डिजिटलमध्ये पदार्पण करणार आहे, याची चर्चा सर्वत्र आहे. कपिल त्याच्या डिजिटल पदार्पणासाठी 20 कोटी रुपये घेत असल्याचे अलिकडेच कृष्णा अभिषेकने सांगितलं. मात्र तो एक विनोद असल्याचे नंतर सांगण्यात आले. परंतु कपिल शर्मा डिजिटलमध्ये पदार्पणासाठी एवढी मोठी रक्कम घेणार आहे. हे ऐकल्यावर अनेकांना धक्काच बसला होता.

कपिल शर्माच्या अनेक चाहत्यांनी याबद्दल कपिलला विचारण्याचा प्रयत्नही केला, मात्र कपिलकडून कोणतेही उत्तर मिळू शकले नाही. कपिल शर्मा त्याच्या डिजिटल पदार्पणासाठी खरोखरच २० कोटी घेणार आहे का? याचे कुतूहल मात्र त्याच्या चाहत्यांना अजूनही आहे.
नव्या वर्षात कपिल शर्मा दुसऱ्यांदा ‘बाबा’ झाला आहे. कपिलची लेक ‘अनायरा’ डिसेंबर महिन्यात एक वर्षाची झाली आहे.

संबंधित बातम्या : 

ॲक्शन सीन दरम्यान जॉन अब्राहमला दुखापत, व्हिडीओ शेअर करत दिली माहिती! 

‘धोनी’ सिनेमातील अभिनेत्याची आत्महत्या, सुशांतचे चाहते सोशल मीडियावर आक्रमक

माझ्या ट्विटमुळे कुठलाही हिंसाचार झाला नाही; कंगना रनौतचा युक्तिवाद

(The Kapil Sharma show will have a comeback)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI