करण मेहरा आणि निशा रावलच्या नात्यातील दरीला 2015 पासूनच सुरुवात, घटस्फोटापर्यंत पोहोचलं होतं प्रकरण!

अभिनेता करण मेहरा (Karan Mehra) आणि अभिनेत्री निशा रावल (Nisha Rawal) यांचे नाते जवळपास तुटण्याच्या मार्गावर आहे, ही गोष्ट आता कुणापासून लपून राहिलेली नाही. दोघांनी एकमेकांवर अनेक आरोप केले आहेत. निशाने करणवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप केला होता.

करण मेहरा आणि निशा रावलच्या नात्यातील दरीला 2015 पासूनच सुरुवात, घटस्फोटापर्यंत पोहोचलं होतं प्रकरण!
करण मेहरा आणि निशा रावल

मुंबई : अभिनेता करण मेहरा (Karan Mehra) आणि अभिनेत्री निशा रावल (Nisha Rawal) यांचे नाते जवळपास तुटण्याच्या मार्गावर आहे, ही गोष्ट आता कुणापासून लपून राहिलेली नाही. दोघांनी एकमेकांवर अनेक आरोप केले आहेत. निशाने करणवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप केला होता, तेव्हापासून सर्वांना त्यांच्या नात्यातल्या सुरु असलेल्या अडचणींबद्दल माहिती मिळाली. परंतु, ही समस्या आताची नाही. गेल्या 5-6 वर्षांपासून निशा आणि करणमध्ये वाद दूरू आहेत. 2015 पासून दोघांमध्ये वाद सुरू झाल्याचे निशाचा खास मित्र आणि डिझायनर रोहित वर्मा यांनी सांगितले आहे (Karan Mehra and Nisha Rawal controversy rohit verma reveals that the couple fighting since 2015).

टीव्ही 9 शी खास संभाषणात रोहित वर्मा यांनी सांगितले की, निशाने करणला आधीच अनेक वेळा संधी दिली आहे. रोहित म्हणाला की, टीव्हीवर दाखवलेल्या अभिनेत्याची प्रतिमा तो कथेनुसार जुळवून घेतो, परंतु वास्तविक जीवनात तो व्यक्ती तसा नसतो. निशा कधीही आपले घर तोडू इच्छित नव्हती. पण, यावेळी करणने प्रत्येक मर्यादा ओलांडली होती. ज्यामुळे निशाला एवढे मोठे पाऊल उचलावे लागले.

2015पासून सुरु झाले वाद

रोहितने सांगितले की, निशा आणि करण यांच्यातील नात्यात 2015पासून समस्या सुरू झाल्या. जिथे एका क्षणी निशाने असा विचार केला होता की, ती करणला घटस्फोट देईल. पण त्यावेळी रोहितने करणला फॅमिली प्लॅनिंग विषयी विचार करण्यास सांगितले होते. करण खूप अरसिक व्यक्ती आहे. मी त्याचा प्रवास पाहिला आहे, तो इतर गोष्टींना खूप महत्त्व देतो. पण करणने माझी कल्पना विचारात घेतली आणि बर्‍याच गोष्टी व्यवस्थित झाल्या होत्या. करण बिग बॉसमध्ये गेला तेव्हा निशा गर्भवती होती. त्यानंतर सर्व काही ठीक सुरु झाले होते.

2018 पासून करण पुन्हा पूर्वपदावर

रोहित पुढे म्हणाला की, काही वर्षे सर्वकाही ठीक सुरु होते. पण, 2018 मध्ये करण पुन्हा पूर्वीसारखा झाला होता. आपण, ज्याच्याशी बोलू शकत नाही अशा व्यक्तीबरोबर स्त्री किती काळ राहील? आपण आपल्या गोष्टी शेअर करू शकत नाही. निशाने करणला खूपवेळा चेतावणी दिली होती. मी याचा पुरावा आहे आणि त्यासाठी मलाही ट्रोल केले गेले होते. कारण खूप वाईट नवरा आहे.

नेहमीच मैत्रिणीला साथ देईन!

रोहित आपल्या मुलाखतीत म्हणाला की, तो नेहमीच आपली मैत्रीण निशाच्या पाठीशी उभा राहील. संपूर्ण जग जरी तिच्या विरोधात उभे राहिले, तरी मी नेहमी तिच्या बाजूने असेन. ती मनाने खूप निर्मळ आहे, असे रोहित म्हणाला.

(Karan Mehra and Nisha Rawal controversy rohit verma reveals that the couple fighting since 2015)

हेही वाचा :

Photo : ‘धाकड’ चित्रपटाच्या चित्रीकरणापूर्वी अर्जुन रामपालचं व्हेकेशन, गर्लफ्रेंड आणि मुलासोबत फोटो शेअर

Video | ‘नो रिस्क, नो स्टोरी’, प्रेग्नन्सीच्या चर्चांदरम्यान नुसरत जहांचा स्विमिंग पूलमधील बोल्ड व्हिडीओ चर्चेत!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI