AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KBC 13 | 16 वर्ष प्रयत्न केले, अखेर स्वप्न पूर्ण झालं!, ‘करोडपती’ बनल्यानंतर गीता सिंहंनी व्यक्त केल्या भावना!

‘कौन बनेगा करोडपती’च्या 13व्या (KBC 13) पर्वात एक कोटी जिंकल्यानंतर स्पर्धक गीता सिंह (Geeta Singh) म्हणतात की, ‘वय कितीही असो, स्वप्न पाहणे सोडू नये. तुमच्या स्वप्नाकडे हळू हळू वाटचाल करत रहा आणि जेव्हा तुम्ही गंतव्यस्थानावर पोहोचाल तेव्हा तुम्हाला कल्पना देखील येईल.

KBC 13 | 16 वर्ष प्रयत्न केले, अखेर स्वप्न पूर्ण झालं!, ‘करोडपती’ बनल्यानंतर गीता सिंहंनी व्यक्त केल्या भावना!
Geeta Singh-Amitabh Bachchan
| Edited By: | Updated on: Nov 10, 2021 | 1:34 PM
Share

मुंबई : ‘कौन बनेगा करोडपती’च्या 13व्या (KBC 13) पर्वात एक कोटी जिंकल्यानंतर स्पर्धक गीता सिंह (Geeta Singh) म्हणतात की, ‘वय कितीही असो, स्वप्न पाहणे सोडू नये. तुमच्या स्वप्नाकडे हळू हळू वाटचाल करत रहा आणि जेव्हा तुम्ही गंतव्यस्थानावर पोहोचाल तेव्हा तुम्हाला कल्पना देखील येईल. अगदी तसंच माझ्या बाबतीतही घडलं आहे.’

गीता सांगतात, ‘जेव्हापासून केबीसी प्रसारित झाला तेव्हापासून मी त्यात सहभागी होण्याचे स्वप्न पाहिले आहे. त्यासाठी मी दरवर्षी प्रयत्न करायचे. मी सतत गेली 16 ते 17 वर्षे प्रयत्न केले. जेव्हा कधी हरायचे, त्यावेळी मी खूप निराश व्हायचे. माझी मुलं मला हताश झालेलं बघायची आणि म्हणायची की, आई तू प्रयत्न करूच नकोस,  कारण जेव्हा तुझी निवड होत नाही, तेव्हा तुला दुःखी पाहून आम्हाला खूप वाईट वाटतं. पण आयुष्य निघून गेले तरी मी प्रयत्न करत राहीन असा निर्धार केला होता. ‘

आयुष्याची दुसरी इनिंग सुरू करण्याची वेळ…

आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना गीता म्हणतात, ‘मी लग्न करून ग्वाल्हेरला शिफ्ट झाले आहे. मी एलएलबी पूर्ण केले आहे पण मुले आणि कुटुंबाच्या जबाबदारीमुळे मी माझ्या करिअरशी तडजोड केली होती. तथापि, मला याबद्दल आता कोणतीही खंत वाटत नाही. मला आनंद आहे की, जेव्हा माझ्या मुलांना माझी गरज असते, तेव्हा मी त्यांच्यासाठी भावनिकदृष्ट्या उपलब्ध होतो. माझ्या दोन्ही मुलींची लग्न झाली आहेत आणि माझ्या मुलाचे लग्न येत्या 8 डिसेंबरला आहे. आत मी 54 वर्षांची आहे, त्यामुळे आता सर्वांना सेटल केल्यानंतर मी माझी दुसरी इनिंग सुरू करणार आहे.’

कुठे खर्च करणार पैसा?

‘माझ्या दुसऱ्या इनिंगमध्ये मदत केल्याबद्दल मी केबीसीची आभारी आहे. इथून लोक मला ओळखू लागले आहेत आणि याहून आनंदाचे म्हणजे मी एक कोटी रुपये जिंकले आहेत. जर मला 8 डिसेंबरपूर्वी पैसे मिळाले तर, त्यातील काही रक्कम मी माझ्या मुलाच्या लग्नात खर्च करेन आणि उरलेल्या पैशातून व्यवसायाची योजना आखेन. सध्या मी एलएलबीचा सराव करेन कारण मला माझी पदवी वाया घालवायची नाही’, असे गीता म्हणाल्या.

एक कोटीचा प्रश्न माझ्यासाठी खूप सोपा होता!

एक कोटींचा प्रश्न जिंकल्यानंतरच्या भावना व्यक्त करताना गीता म्हणतात, ‘पैसे जिंकल्यानंतर मी थरथरत होतो. कोणाचाही विश्वास बसणार नाही,  पण जो प्रश्न मला एक कोटीसाठी विचारला गेला तो माझ्यासाठी खूप सोपा होता. त्यासाठी मला जास्त वेळ लागला नाही. राजीव गांधी खेलरत्न कोणाला देण्यात आला हा प्रश्न खेळाचा होता आणि त्याचे उत्तर मला चांगलेच माहीत होते. मात्र, त्याच वेळी ती मुघल राजवटीशी संबंधित असलेल्या सात कोटींच्या प्रश्नात अडकले.’

समोर अमिताभ बच्चन यांना पाहिल्यानंतर….

समोर महानायकाला पाहिल्यानंतर मी अमिताभजींच्या आवाजाचा फॅन झाले. त्यांचा आवाज अप्रतिम आहे. एवढं प्रभावी व्यक्तिमत्व आपल्या समोर पाहून अस्वस्थ वाटणं स्वाभाविक आहे. ज्यांना मी आयुष्यभर टीव्हीवर पाहिलं त्यांच्यासोबत आज बसलेय, यावर माझा विश्वासच बसत नव्हता. अमिताभजींचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते समोरच्या व्यक्तीला मोकळेपणाने बोलू देतात. त्यांच्याशी बोलताना मला वाटले जणू मी माझ्या ओळखीच्या कोणाशी बोलत होते. शो दरम्यानचा प्रत्येक क्षण माझ्यासाठी कधीही न विसरण्यासारखा आहे.’

हेही वाचा :

मराठी चित्रपटांची मांदियाळी, हास्याची मेजवानी घेऊन येणारा ‘इमेल फिमेल’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

Satyamev Jayate 2 | ‘दिलबर’नंतर नोरा फतेहीचे ‘दिलरुबा’वर ठुमके, डान्स मुव्ह्स पाहून चाहतेही झाले घायाळ!

पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.