‘या पुरस्काराच्या लायक मी आहे की नाही..’; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेची पोस्ट चर्चेत

'या पुरस्काराच्या लायक मी आहे की नाही..'; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची पोस्ट चर्चेत
Gaurav More
Image Credit source: Instagram

गौरवने 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या मालिकेतून पदार्पण केलं. यामध्येही त्याने विनोदी भूमिका साकारली होती. पण महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून तो प्रकाशझोतात आला.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

May 25, 2022 | 2:43 PM

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमातील गौरव मोरे (Gaurav More) याला नुकतंच एका पुरस्काराने गौरविण्यात आलं. हा पुरस्कार स्वीकारतानाच फोटो त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. गौरवला ‘भिमरत्न पुरस्कार’ (Bhimratna Award) प्रदान करण्यात आला असून त्याच्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. ‘खरंच मी या पुरस्काराच्या लायक आहे की नाही अजुनही कळत नाहीये. सामाजिक क्षेत्रात स्वतःला झोकून देणाऱ्यांसाठीचा हा पुरस्कार सोहळा आहे आणि त्यांच्याच बरोबरीने आपल्यासारख्याला पण एवढा मोठा मान आपण दिलात,’ अशा शब्दांत त्याने आभार मानले आहेत. गौरवच्या दमदार अभिनयाचे असंख्य चाहते आहेत. मराठी चित्रपटांमधील त्याच्या अभिनयालाही प्रेक्षकांकडून दाद मिळाली.

गौरव मोरेची पोस्ट-

‘भिमरत्न पुरस्कार सोहळा 2022, खरंच मी या पुरस्काराच्या लायक आहे की नाही अजुनही कळत नाहीये. सामाजिक क्षेत्रात स्वतःला झोकून देणाऱ्यांसाठीचा हा पुरस्कार सोहळा आहे आणि त्यांच्याच बरोबरीने आपल्यासारख्याला पण एवढा मोठा मान आपण दिलात. खूप आभारी आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब यांच्याहस्ते हा पुरस्कार देन्यात आला. सोबत महाराष्टाचे ख्यातनाम गायक आनंद शिंदेसाहेब, मिलिंद शिंदेसाहेब आणि मधुर शिंदे उपस्थित होते,’ अशी पोस्ट त्याने लिहिली.

पहा फोटो-

 

View this post on Instagram

 

A post shared by Gaurav More (@im_gaurav_more20)

गौरवने ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतून पदार्पण केलं. यामध्येही त्याने विनोदी भूमिका साकारली होती. पण महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून तो प्रकाशझोतात आला. ‘फिल्टर पाड्याचा बच्चन’ म्हणून तो ओळखला जाऊ लागला. मराठी मालिका आणि चित्रपटांसोबतच त्याने हिंदीतही काम केलंय. संजू, झोया फॅक्टर यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये त्याने भूमिका साकारल्या आहेत.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें